नदीची आत्मकथा/मनोगत/आत्मवृत्त मराठी निबंध | Nadi ki atmakatha in marathi

Nadi chi atmakatha in marathi : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक स्त्रोतापैकी एक आहे नदी आणि नदीचे पाणी. नदी ही मनुष्याच्या अस्तित्वासाठी उपयुक्त आहे. असे म्हटले जाते की जल हेच जीवन आहे. 

म्हणूनच आजच्या या लेखात आपण नदीचे आत्मवृत्त/आत्मकथा/ मनोगत मराठी निबंध किंवा नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी पाहणार आहोत. तर चला सुरू करूया...


Nadi ki atmakatha in marathi

1) नदीची आत्मकथा | Nadi ki atmakatha in marathi 

मी एक नदी आहे. नदी हा शब्द तुम्हाला तर परिचितच असेल. पण तरीही मी आज तुम्हाला माझा परिचय देणार आहे मी कोण आहे? कुठून आले आहे? माझे अस्तित्व काय आहे? भारतासह मला जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. जसे सरिता, जीवनदायिनी, रिव्हर इत्यादी. स्वभावतः मी खूप चंचल आहे परंतु कधीकधी शांत देखील होऊन जाते. खळखळ करत मी वाहत राहते. सतत- न थांबता, न अडकता मी वाहते. माझा जन्म पर्वतांमध्ये झाला होता, तेथून झऱ्यांच्या मदतीने मी जंगल आणि गावांमधून वाहत वाहत पुढे समुद्राला जाऊन मिळते.


माझ्या प्रवाह कधी कमी तर कधी जास्त होतो. माझा आकार स्थानानुसार कधी लहान तर कधी मोठा होत असतो. माझ्या मार्गात खूप अडचणी येतात, कधी दगड गोटे तर कधी मोठ मोठे पर्वत पण मी कधीही थांबत नाही. माझा मार्ग मी स्वतः तयार करून वाहत राहते. मनुष्य अनेक प्रकारांनी माझ्याशी जुळलेला आहे. तुम्ही असेही म्हणू शकतात की मी मनुष्यासाठी खूप उपयुक्त आहे. मनुष्याला अनेक पद्धतीने जीवन जगण्यासाठी मी मदत करते. माझ्या पाण्यात अनेक जलचर जीवजंतू राहतात मनुष्य त्यांना पकडून खातो. अश्या पद्धतीने मी मनुष्याची अन्नाची भूक भागवते. माझ्यामुळे भूतलावावरील सर्व घरांमध्ये पाण्याची व्यवस्था होते. मनुष्याला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पाणी हे अतिशय उपयुक्त आहे.


मी पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत करते. माझ्या पाण्याच्या मदतीने मनुष्य वीज तयार करतो आणि याच विजेच्या मदतीने अनेक उपकरणे कार्य करतात. शेतकरी माझे पाणी शेतात पिकांसाठी वापरतो, ज्यामुळे शेतातील पिके लहरायला लागतात. जंगलातून वाहताना मी जंगली पशु पक्ष्यांची तहान भागवते व यासोबतच जंगलातील झाडांना पाणी पुरवठा करते. 


माझ्या बद्दल सांगायचे झाले तर मलाही भावना आहेत, मला देखील आनंद व दुःख होते आणि मनुष्य मला अतिशय लोभी जाणवतो. आपले स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तो काहीही करू शकतो. मनुष्या द्वारे मला देवीच्या रूपात पूजले जाते, लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला प्रार्थना करतात, उपवास ठेवतात, फुले चढवतात. आणि मग दुसरी कडे तेच माझ्या पाण्यात कचरा व घाण टाकतात, मला प्रदूषित करतात. आता तुम्हीच सांगा की कोणी देवीला प्रदूषित करत का? माझी इच्छा फक्त एवढीच आहे की जर मनुष्य मला देवी मानत असेल तर त्याने मला प्रदूषित करायला नको. 


आजच्या परिस्थितीत नदीचे पाणी अतिशय प्रदूषित झाले आहे. मोठमोठ्या कारखान्यातून निघणारा विषारी पदार्थांचा कचरा, घरातून निघणारा केर, प्लास्टिक, मृत लोकांची राख, विविध सण व कार्यक्रमांचा कचरा इत्यादी अनेक वस्तू माझ्या पाण्यात मिसळून मला प्रदूषित करीत आहे. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की मला प्रदूषित करणे म्हणजे मनुष्याचाच नाश करणे होय. कारण जर मी अति प्रमाणात प्रदूषित झाले तर मनुष्याला प्यायला स्वच्छ पाणी मिळणार नाही व अशुद्ध पाणी पिल्याने अनेक रोग वाढायला लागतील. म्हणून सर्वांनी आजच आपले कर्तव्य लक्षात घेऊन नदी व संपूर्ण पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या निर्णय घ्यायला हवा.

***


2) नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी | Nadi che atmavrutta 

मी एक नदी आहे. मला अनेक नावांनी ओळखले जाते जसे नदी, नहर, सरिता, प्रवाहिनी, जीवनदायिनी इत्यादी. ही सर्व नावे माझा स्वभाव आणि गती च्या आधारावर ठेवली आहेत. सर सर आवाज करीत वाहिल्याने मला सरिता म्हटले जाते. नेहमी प्रवाहात वाहिल्याने मला प्रवाहिणी म्हणतात. मी पाण्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेते. पाण्याला जीवन म्हटले जाते आणि मी पाण्याचा स्त्रोत असल्याने मला जीवनदायिनी म्हणतात. 


साधारण भाषेत तुम्ही मला नदी म्हणू शकतात. माझे दररोजचे काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत, पृथ्वीवरील पशुपक्षी, मनुष्य व झाडाझुडपांची तहान भागवणे आहे. मी जेथे जाते तेथे मनुष्य, पशु पक्षी आणि झाडांची तहान भागवून त्यांना तृप्त करते. माझ्या पाण्यामुळे झाले हिरवी व टवटवीत बनतात. मी हे कार्य नित्य करीत असते व यातच माझ्या जीवनाची सार्थकता आहे. 


आज मैदानी भागात मी ज्या रूपात दिसते, त्या रूपात मी नेहमी पासून नव्हते. माझी सुरुवात हिमालय मधील बर्फाच्या पर्वतात दगडांच्या खाली झाला होता. मी एका शिलालेखातून उत्पन्न होऊन मधुर संगीत करीत पुढे सरकू लागले. जेव्हा मी प्रवाहाने वाहत होते तेव्हा माझ्या मार्गात अनेक अडथळे यायला लागले. या मध्ये लहान मोठे दगडगोटे, झाडे झुडपे आणि मोठ मोठ्या पर्वतांचा समावेश होता. या सर्वांनी एक एक करून माझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझे संपूर्ण बळ लाऊन त्यांच्यातून मार्ग काढला. 


अशा पद्धतीने मोठमोठी पर्वते आणि जंगल पार करीत मी शेवटी मैदानी प्रदेशात येऊन पोहचले. मी जेथून जेथून वाहू लागले त्या त्या ठिकाणी माझ्या दोन्ही बाजूंना तट बनवण्यात आले.  दिवसेंदिवस माझा विस्तार होत होता. हळू हळू माझ्या तटावर वस्तू बसू लागली. अनेक लोक आपापली घरे आणि झोपड्या माझ्या किनाऱ्यावर बनवू लागले. आज मी ज्या ज्या ठिकाणांहून वाहते तेथे अनेक लहान मोठी गावे आहेत. हे सर्व लोक माझ्या पाण्यावर अवलंबून असतात. शेती आणि पिण्यासाठी ते माझे पाणी वापरतात. लोकांनी आपल्या सुविधेसाठी माझ्या वरून अनेक लहान मोठे पुल बनवले आहेत. या पुलावरून गाड्या मोटारी वाहतूक करीत असतात. 


बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी मुळे माझे पाणी वाढते. मला महापूर येतो अश्या वेळी पुल तसेच अनेक लहान मोठ्या गावांमध्ये पाणी शिरते. या पाण्यामुळे लोकांनी त्रास होतो. परंतु मी देखील काय करू शकते माझा प्रवाह माझ्या ताब्यात थोडीच असतो. मी माझ्या जीवन काळात अनेक गावं आणि शहरांमधून वाहिले आहे. अनेक सैनिक, राजे महाराजे, डाकू आणि साधू संतांना मी पाहिले आहे. जुनी घरे नष्ट होताना आणि नवीन वस्ती स्थापित होतांना मी पाहिली आहे. 


मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. अनेक संकटे व दुःखाचा मी सामना केला आहे. तुम्हा सर्वांना माझा सल्ला आहे की तुम्ही देखील संकटाना घाबरता व धीर न सोडता सामोरे जा आणि आपल्या आयुष्यात हवे ते प्राप्त करा.


या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणे देखील असू शकते...

  • नदीची आत्मकथा मराठी निबंध
  • नदीचे आत्मवृत्त निबंध मराठी
  • नदीचे मनोगत
  • मी नदी बोलतेय..
  • nadiche atmavrutta
  • nadiche manogat
  • nadichi atmakatha
  • autobiography of river in marathi 


तर मित्रांनो हे होते nadi chi atmakatha marathi nibandh तुम्हाला हे निबंध कसे वाटले तुम्ही आम्हाला कमेन्ट मध्ये सांगू शकतात, या शिवाय इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध आणि मराठी भाषण मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट भाषणमराठी.कॉम 


विडियो पहा:


Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने