प्रजासत्ताक दिन निबंध मराठी | Republic day essay in marathi

Republic day essay in marathi : आपल्या देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. वर्ष 1950 मध्ये याच दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला होता. म्हणजेच देशाची सत्ता इंग्रजांच्या हातून भारतीयांच्या हातात आली होती. आजच्या या लेखात आपण Prajasattak din Nibandh मिळवणार आहोत. हा प्रजासत्ताक दिन मराठी निबंध आपण आपल्या शाळेत वापरू शकतात.



1) प्रजासत्ताक दिन मराठी निबंध - Prajasattak din marathi nibandh

(230 शब्द)

आपला देश भारत दीर्घकाळापर्यंत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, भारतीय स्वतंत्र सैनिकांच्या अथक परिश्रमातून भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र मिळाले. व यांच्या जवळपास दीड वर्षानंतर भारताने आपली घटना लागू केली. यालाच भारताचे संविधान ही म्हटले जाते. यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखले जावू लागले. जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांनंतर भारताचे संविधान तयार झाले. व 26 जानेवारी 1950 भारतीय संसद द्वारे या संविधानाला पास करण्यात आले. 

भारतात तसेच विदेशात राहत असलेल्या भारतीयांसाठी प्रजासत्ताक दिवस साजरा करणे सन्मानाची गोष्ट आहे. या उत्सवाची तयारी एक महिना आधीच सुरू होऊन जाते. यादरम्यान दिल्लीतील इंडिया गेट जवळ लोकांचे येणे जाणे बंद करण्यात येते. यामुळे त्या दिवशी तेथे असलेल्या लोकांना सुरक्षा प्रदान होते. 

दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील होतात. या कार्यक्रमात भारताची विविधता प्रस्तुत केली जाते. यानंतर भारतीय सैनिकांची परेड, पुरस्कार वितरण इत्यादी गोष्टी घडतात. व कार्यक्रमाच्या शेवटी शांत वातावरणात राष्ट्रगीत म्हटले जाते.

प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी शासकीय तसेच खासगी दोन्ही क्षेत्रांना सुट्टी असतात. भारतीय लोक आपले घर, ऑफिस व गाड्यांना तिरंगी रंगाचे फुले व झेंडे लाऊन सजवतात. विविध शाळांमध्ये निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. शालेय विद्यार्थी एक महिना आधीच प्रजासत्ताक दिन भाषण तयार करून ठेवतात. 

या दिवशी विविध संस्था व शाळेकडून विद्यार्थ्यांना खेळ, शिक्षण व इतर क्षेत्रात चांगले प्रदर्शन केल्याबद्दल पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात येते. कुटुंबातील सदस्य या दिवशी आपले मित्र मंडळी सोबत सामाजिक स्थानांवर भेट देतात. सकाळी आठ वाजेला राजपथवर होत असलेला कार्यक्रम संपूर्ण देशात लाईव्ह दाखवला जातो.

***



2) प्रजासत्ताक दिन निबंध मराठी - Republic day essay in Marathi

(250 शब्द)

प्रजासत्ताक दिन भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे. हा दिवस भारत प्रजासत्ताक झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 ला भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या दिवशी स्वतंत्र 

भारताची नवीन राज्य घटना लागू करण्यात आली. हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय घटनेनुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. या निर्णयानंतर देशभरात आनंद साजरा केला गेला. व तेव्हापासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 

26 जानेवारीचा हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा दिवस आहे. यादिवशी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, कॉलेज, कार्यालय तसेच सर्वच प्रमुख स्थानांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो. शालेय मुले या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लोकनृत्य, लोकगीत, राष्ट्रगीत इत्यादी सादर केले जातात. 

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्ली येथे होतो. या दिवशी देशाच्या विजय चौक वर मंच स्थापन करण्यात येतो. या ठिकाणी देशाचे राष्ट्रपती येऊन तिरंगा फडकवतात. यांनतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येते. भारतीय सेनेद्वारे आपली सैन्य शक्तीचे प्रदर्शन केले जाते. सैनिकांच्या परेड होतात. ही परेड पाहण्यासाठी राष्ट्रपती सोबत, नेता व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. बऱ्याचदा या दिवशी इतर देशांच्या पंतप्रधानांना अतिथी म्हणून बोलावण्यात येते. 

प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण केले जाते. हजारो व लाखो लोकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस इत्यादी अनेक महान नेत्यांनी आपले संपूर्ण जीवन लावले. यांनी भारतीयांसमोर एक आदर्श निर्माण केला. आपला देश या महान स्वतंत्र सैनिकामुळेच कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत एक आहे.

***


तर मित्रांनो हा होता प्रजासत्ताक दिन मराठी निबंध तुम्हाला हा prajasattak din marathi nibandh कसा वाटला आम्हाला  कमेन्ट मध्ये नक्की कळवा. व या निबंधाचा योग्य उपयोग करून आपण आपला स्वतः चा Republic day essay in marathi देखील लिहू शकतात. धन्यवाद.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने