डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | Apj abdul kalam essay in marathi

आजच्या या लेखात भारताचे राष्ट्रपति व 'मिसाईल मॅन' या नावाने ओळखले जाणारे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा मराठी निबंध पाहणार आहोत हा abdul kalam marathi essay आपल्याला शाळा शाळा कॉलेज मध्ये उपयुक्त राहील. 



डॉ. अब्दुल कलाम निबंध मराठी abdul kalam nibandh in marathi (निबंध 1)

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला रामेश्वरम मध्ये झाला होता. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आणि भारतात त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 2002 पासून तर 2007 पर्यंत होता. अब्दुल कलाम यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच ते आभ्यासात हुशार होते. त्यांनी आधी फिजिक्स विषयाचा अभ्यास केला आणि नंतर एरोस्पेस अभियांत्रिकी क्षेत्रातून शिक्षण पूर्ण केले. 


अब्दुल कलाम यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये खूप मेहनत केली. त्यांनी डीआरडीओ आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) मध्ये महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून देखील संबोधले जाते. त्यांनी भारताची सैन्य क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. 1998 साली त्यांनी भारतात यशस्वी अणु चाचणी घेतली. 


अब्दुल कलाम 2002 पर्यंत खूप लोकप्रिय झाले होते. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली होती की 2002 साली त्यांना देशाचे राष्ट्रपती बनण्यासाठी निवडण्यात आले. ते स्वतंत्र भारताचे 11 वे राष्ट्रपती होते आणि या पदावर ते 2007 पर्यंत कार्यरत राहिले. राष्ट्रपतींच्या रूपात त्यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. ते एक लोकप्रिय राष्ट्रपतींच्या रूपात ओळखले जातात. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखतो व त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. 


27 जुलै 2015 रोजी 83 वर्षाच्या वयात अब्दुल कलाम यांचे निधन झाले. त्या वेळी ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे लेक्चर देत होते अचानक आलेल्या हृदय रोगाने त्यांचा मृत्यू झाला. अब्दुल कलाम एक खरे देशभक्त होते. उच्च पदावर कार्यरत असतानाही ते अतिशय साधे जीवन जगत असत. म्हणूनच त्यांना आपल्या देशात नेहमी आठवण केले जाईल.

*-*-*-*


डॉ. अब्दुल कलाम निबंध मराठी Apj abdul kalam essay in marathi (निबंध 2)

डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 ला तमिळनाडूमधील रामेश्वरम मध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुल्लाब्दीन नाविक व मत्स्य व्यवसाय करत असत‌. त्यांच्या आईचे नाव असिम्मा होते. अब्दुल कलाम यांना तीन मोठे भाऊ आणि एक बहिण होती. 


अब्दुल कलाम यांचे पूर्वज धनिक व्यापारी होते. परंतु 1920 च्या दशकात त्यांना व्यापारात भरपूर नुकसान झाले व जेव्हा अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. तेव्हा त्यांना अतिशय गरिबीत दिवस काढावे लागले. लहान असताना शिक्षणासाठी ते संघर्ष करू लागले, घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटू लागले व मिळालेले पैसे आपल्या शिक्षणासाठी लावू लागले. 


अब्दुल कलाम त्यांच्या वडिलांकडे इमानदारी, शिस्त व उदारता शिकले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण रामेश्वरम् मधील एलिमेंट स्कूलमध्ये झाले. 1950 मध्ये त्यांनी BSC ची परीक्षा St. Joseph's College मधून पूर्ण केली. यानंतर 1954 ते 57 मध्ये त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनीरिंग मध्ये डिप्लोमा केला. 


1958 मध्ये अब्दुल कलाम यांनी D.T.D. and P. मधील तंत्रज्ञान केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्य करणे सुरू केले. त्यांनी DRDO चे लहान होवर्क्राफ्ट डिझाईन करून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवाती दिवसात त्यांनी भारतीय सेनेसाठी एक हेलिकॉप्टर तयार केले. त्यांनी इसरो मध्ये पहिला उपग्रह प्रक्षेपण यान आणि ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान बनविण्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणून संबोधले जाऊ लागले. 


10 जून 2002 ला एनडीए सरकारने राष्ट्रपतिपदासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव सुचवले. राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना 922,884 मत मिळाले व लक्ष्मी सहगल यांना हरवून ते निवडणूक जिंकले. अब्दुल कलाम यांनी 15 जुलाई 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले. ते राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले अविवाहित शास्त्रज्ञ होते.


27 जुलै 2015 ला अब्दुल कलाम एका कार्यक्रमासाठी शिलाँग गेले होते. या दरम्यान त्यांची तब्येत खराब झाली. तेथील एका कॉलेजमध्ये मुलांना ते लेक्चर देत आसतांना ते अचानक खाली पडले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु काही तासातच त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला.  


अब्दुल कलाम यांची संपूर्ण माहिती वाचा येथे 


तर मित्रांनो हे होते abdul kalam marathi nibandh या लेखाद्वारे मी तुमच्यासोबत 2 निबंध शेयर केले आहेत. या शिवाय इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध मिळवण्यासाठी तुम्ही आमची वेबसाइट वर सर्च करू शकतात. धन्यवाद.. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने