बेरोजगारी- एक समस्या निबंध मराठी | Berojgari essay in marathi

Berojgari essay in marathi: आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत berojgari nibandh marathi हा बेरोजगारी मराठी निबंध शाळा कॉलेज च्या विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त आहे.  unemployement marathi essay


बेरोजगारी मराठी निबंध | Berojgari essay in marathi

आज भारतात स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतरही दररोज काही न काही समस्या निर्माण होत आहे. आणि या मधीलाच एक सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची आहे. बेरोजगारी व्यक्तीला गरिबी व दारिद्र्यात नेते आणि या समस्यांमुळे व्यक्तीच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण करणेही कठीण होते. आज भारतात बेरोजगारीच्या समस्येला कंटाळून अनेक तरुण आत्महत्या करीत आहेत. देशातील बेरोजगारी मुळे देशापुढे अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात. बेरोजगारी मुळे अर्थव्यवस्था खालावते. 


आज ज्या पद्धतीने देशात बेरोजगारी वाढत आहेत त्या मागे अनेक करणे आहेत. ज्यातील एक सर्वात मोठे कारण म्हणजे लोकसंख्या वृध्दी आहे. जस जशी देशातील लोकसंख्या वाढत आहे, तस तशे संसाधनांची कमतरता होत आहे. पैश्याच्या कमी मुळे कुटुंबातील प्रत्येकाला उच्च शिक्षण देणे शक्य होत नाही. ज्यामुळे अनेक तरुण आशिक्षित राहून बेरोजगार होतात. ज्या पद्धतीने लोकसंख्येत वृध्दी झाली त्या पद्धतीने उद्योगधंदे व व्यापार वाढले नाहीत. हेच वाढत्या बेरोजगारीचे कारण आहे. 


देशातील वाढत्या बेरोजगारी मागील दुसरे कारण आपली शिक्षण पद्धती आहे. आज भारतात अनेक तरुण इंजिनीयर बेरोजगार आहेत. या मागे कारण आहे त्यांची शिक्षण पद्धती. आपल्या देशात प्रात्यक्षिक आभ्यासाऐवजी फक्त पुस्तकी ज्ञान दिले जाते. परिणामी त्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संख्या सोबत बेरोजगारीही वाढते. आजकाल छोट्याशा सरकारी नोकरीसाठी अनेक विद्यार्थी अर्ज करतात. देशात वाढत्या बेरोजगारी च्या परिस्थितीत ही त्यांची मजबुरी आहे.


देशातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यासाठी शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. जर या योजनांची माहिती जनसामान्य पर्यंत योग्य पद्धतीने पोहचली तर देशातील बेरोजगारीची समस्या कमी करण्यात फार मदत होईल. जास्तीत जास्त घरगुती उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे. आज आपल्या देशात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून बिझनेस लोन दिले जाते. मशिनिकरणावर नियंत्रण आणायला हवे. प्रत्येक ठिकाणी मशीन चा उपयोग करण्यापेक्षा आपल्याला मजदुरांचा वापर करायला हवा. 


बेरोजगारी कमी करण्यासाठी दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण पद्धतीत सुधार करणे होय. शिक्षण पद्धतीतील परिवर्तनावर लक्ष द्यायला हवे. शाळा कॉलेज मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक माहिती शिकवायला हवी. या शिवाय लोकसंख्या नियंत्रणही बेरोजगारी समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचे आहे. लोकसंख्या वृध्दी शिवाय आपल्या देशात जातीनुसार आरक्षण आहे. आरक्षण लवकरात लवकर समाप्त करून सरकारी नोकरी मध्ये सर्वांना समान जागा मिळाल्याला हव्यात. जेणेकरून प्रतिभावान लोकांना आधी नोकरी मिळेल.


तर मित्रांनो हा होता Berojgari essay in marathi. आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल. या निबंधाला आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद.... 


Read More

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने