प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan ek samasya in Marathi

Pradushan ek samasya essay in Marathi : आजकाल वाढत असलेल्या महानगरातील समस्या पैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. हवा अर्थात वायु प्रदूषणा  नंतर ध्वनी व जल प्रदूषण देखील मोठी समस्या बनल्या आहे. 

म्हणूनच आज आपण प्रदूषण एक समस्या (pradushan ek samasya Nibandh marathi) या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया..  


प्रदूषण एक समस्या मराठी निबंध  pradushan ek samasya in marathi
pradushan ek samasya

प्रदूषण एक समस्या निबंध - Pradushan ek samasya

(150 words)

प्रदूषण हे एक हळू हळू प्रभाव दाखवणारे विष आहे. आणि ते प्रत्येक दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते. प्रदूषणाला मुख्यतः तीन भागात विभाजित केले आहे वायू प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि जल प्रदूषण.

वायुप्रदूषण हे वाहनांमधून निघणारे इंधनाचे धूर, औद्योगिक कारखाने, उडणारी धूळ इत्यादी कारणांमुळे होते. या दूषित वायू ला श्वासाद्वारे आत घेतल्याने हृदय संबंधी रोग निर्माण होतात. 

निसर्गाला हानी पोहोचवणारे दुसरे प्रदूषण ध्वनिप्रदूषण आहे, हे प्रदूषण वाहनांचे हॉर्न, औद्योगिक कारखान्यातील मशीन चे आवाज, लग्न तसेच इतर समारंभातील डीजे इत्यादी अनेक कारणांमुळे होते. अत्याधिक ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा आणि काना संबंधी रोग वाढतात.

जल प्रदूषण ही सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या आहे. नदी व तलावात कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ व प्लास्टिक कचरा टाकल्याने जल प्रदूषण होते. 

आज प्रदूषण हे अनेक पद्धतीने होत आहे. या प्रदूषणाच्या समस्येला कमी करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत व लोकांना प्रदूषणाने होणाऱ्या समस्यांविषयी जागृत करायला हवे.

__समाप्त__


प्रदूषण मराठी निबंध (Pradushan Marathi Nibandh)

(300 words)

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. जस-जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहेत. 'प्रदूषण' हा असाच तंत्रज्ञानाच्या एक दुष्परिणाम आहे. आज प्रदूषण एक समस्या बनलेली आहे.

आपल्या धरतीवर आज तीन तऱ्हेचे प्रदूषण आहे: जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. विकसनशील देश जसे भारत, थायलँड, पाकिस्तान आणि अन्य अनेक देश प्रदूषणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचे योग्य वापर न करणे आणि अधिक तांत्रिक माहिती माहीत नसलेले हे देश आपल्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास असमर्थ आहेत. याचा परिणाम नागरिकांना अशुद्ध पानी प्यायल्याने अनेक रोग होतात आणि हे रोग आरोग्याला धोकादायक ठरतात. म्हणून अशुद्ध पाणी हा प्राणघातक शत्रू आहे.

आज मोठ मोठे शहर वाढते मोटरसायकल, चारचाकी वाहने आणि इतर मोटार वाहनामुळे वायु प्रदूषणाचा सामना करत आहेत. विकसित झालेल्या शहरात औद्योगिकरणाच्या दर हा खूप अधिक असतो. यामुळे निसर्ग आपले संतुलन वाचवण्यात अयशस्वी होतो. कारखान्यांच्या धुराड्यातून निघणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो आणि ऑक्सिजनच्या आभाव झाल्याने श्वासांसंबंधी रोग व्हायला लागतात. बऱ्याचदा हे प्रदूषण अधिक झाल्याने हृदय विकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

ध्वनि प्रदूषण हे सुद्धा वायुप्रदूषणा एवढेच घातक आहे. मोठ मोठ्या महानगरात वाहनांचे हॉर्न आणि कारखान्यांमुळे ध्वनि प्रदूषण वाढते. बहिरेपणा, मानसिक गोंधळ आणि मानसिक असंतुलन हे ध्वनी प्रदूषणाचे काही दुष्परिणाम आहेत. आज ध्वनि प्रदूषण रोखण्यासाठी कडक कायदे तयार करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या आवाजात स्पीकर आणि बँड वाजविण्यावर बंदी आणायला हवी. मनुष्य निसर्गाला विषारी करीत आहे, जर मनुष्य स्वतः वेळीच सावध झाला नाही तर त्याला या प्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्यापासून कोणीच वाचवू शकत नाही.

प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असो ते मनुष्य जीवनासाठी धोकादायक तर आहेच पण या सोबत वनस्पती आणि प्राण्यांना ही ते घातक आहे. प्रदूषण मानवजातीसाठी एक समस्या आहे. जोपर्यंत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने होणाऱ्या या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी उपाय शोधून घेत नाही तोपर्यंत मानवी जीवन धोक्यात आहे. शासनाने याची दखल घ्यायला हवी आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी वृक्ष लागवड, जल शुद्धीकरण, गॅस वर चालणारे चुल्हे इत्यादी उपक्रम राबवायला हवेत. आपल्याला प्रदूषणाशी लढा देऊन त्याला कोणत्याही किमतीवर संपवायचे आहे.

--समाप्त-- 


प्रदूषण मराठी निबंध 

(400 words)

आजच्या आधुनिक युगात विज्ञानाच्या प्रगती मुळे मानव जातीला ज्याप्रमाणे काही वरदान मिळाले आहे त्याच पद्धतीने त्याला भौतिक प्रगतीचे काही दुष्परिणाम देखील भोगावे लागत आहेत.

आज पृथ्वीवर वाढत असलेला समस्यांपैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. प्रदूषणाचा अर्थ होतो नैसर्गिक संतुलनात दोष निर्माण होणे. श्वासो श्र्वसासाठी शुद्ध हवा न मिळणे, प्यायला स्वच्छ पाणी न मिळणे, स्वच्छ अन्न न मिळणे आणि शांत वातावरण न उपलब्ध होणे ही प्रदूषणाची काही लक्षणे आहेत. प्रदूषण मानवजातीसाठी किती हानिकारक आहे हे सर्वानाच माहीत झाले आहे. परंतु हे ज्ञान फक्त पुस्तकापर्यंत सीमित आहे. वास्तविक जीवनात मनुष्य आपली प्रगती आणि सुख सुविधामध्ये वृद्धी करण्यासाठी दिवसेंदिवस प्रदूषण करीत आहे. 

पृथ्वी, पानी, हवा, ध्वनि इत्यादींमध्ये आढळणारे तत्व जर असंतुलित असतील तर याला प्रदूषण म्हटले जाते. मनुष्याद्वारे निर्माण झालेला कचरा व टाकाऊ पदार्थ जे निसर्गात फेकले जातात त्या पदार्थांना 'प्रदूषक' म्हटले जाते. प्रदूषण अनेक प्रकारचे असते. प्रदूषणाच्या काही प्रमुख प्रकरांमध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचा समावेश आहे.

भारतातील मोठमोठ्या महानगरामध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरत आहे. 24 तास चालणारे कारखाने, गाड्या मोटारी इत्यादी मधून निघणारा काळा धूर हे सर्व वायुप्रदूषण वाढवण्याचे कार्य करतात. आजकाल दिल्ली-मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये श्वास घेणे सुद्धा कठीण आहे. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढल्याने श्वास संबंधी विकार जडतात. वायू प्रदूषण रोखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावायला हवी. खाजगी वाहनांचा उपयोग कमीत कमी करायला हवा.

वायू प्रदूषण नंतर दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे जल प्रदूषण होय. कारखान्यांमधून निघणारे दूषित पाणी नदीत सोडले जाते हे पाणी प्यायल्याने मनुष्य व प्राण्यांना अनेक रोग जडतात. दूषित पाणी पिल्याने बऱ्याचदा मृत्यू देखील होतात. यामुळे शासन तसेच नागरिकाचे हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूचा नदी व पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा, त्यात घाण व कचरा टाकू नये.

जल प्रदूषणा नंतर सर्वात मोठी प्रदूषण समस्या म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. ध्वनी प्रदुषण कारखाने, गाड्या मोटारी, लाऊड स्पीकर इत्यादीच्या आवाजामुळे वाढत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा सारख्या समस्या वाढत आहेत. सतत मोठ्या प्रमाणात कर्कश आवज ऐकल्याने मानसिक तणाव वाढतो. म्हणून ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कारखाने व नागरिकांनी उच्च दर्जाची मशीने वापरायला हवी. 

वायु, जल व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात. जास्तीत जास्त हिरवळ निर्माण करायला हवी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अधिकाधिक झाडे लावायला हवीत. झाडे लावा झाडे जगवा चा संदेश प्रसारित करायला हवा. कारखान्यांना मनुष्य वस्तीपासून दूर ठेवायला हवे. प्रायव्हेट वाहनाचा वापर कमी प्रमाणात करायला हवा. इत्यादी उपाय जर आपण केलेत तर प्रदूषण सारख्या समस्येला दूर करण्यासाठी खूप मदत होईल.

प्रदूषण हे हळू हळू परिणाम करणारे एक विष आहे. ते हवा, पाणी व धुळीच्या माध्यमाने फक्त मनुष्यच नव्हे तर जीव जंतु, पशू पक्षी, झाडे झुडपे या वनस्पतींना देखील नष्ट करते. वाढत्या प्रदूषणामुळे झाडांच्या तसेच प्राण्यांच्या अनेक प्रजाती विलुप्त झाल्या आहेत. जर वेळीच प्रदूषणावर उपाय शोधले नाहीत तर एक वेळ अशी येईल जेव्हा मनुष्याला चांगले अन्न मिळणार नाही. प्यायला शुद्ध पाणी आणि श्वास घ्यायला हवा मिळणे कठीण होईल. आशा परिस्थिति पासून वाचण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करायला हवे.   

--समाप्त-- 


तर मित्रानो हे होते प्रदूषण एक समस्या या विषयावर लिहिलेले काही मराठी निबंध आशा करतो की तुमच्यासाठी Pradushan ek samasya nibandh हे निबंध व प्रदूषण विषयावर pradushan ek samasya in marathi लिहिलेली ही माहिती उपयुक्त ठरली असेल. या माहितीला इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने