महान क्रांतिकारी भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीती महत्वाचे योगदान दिले. आजच्या या लेखात Bhagat singh essay in Marathi देण्यात आला आहे.
हा भगतसिंग मराठी निबंध (bhagat singh nibandh in marathi) तुम्हाला शाळा कॉलेज मध्ये खूप उपयुक्त राहील. तर चला सुरू करूया..
भगत सिंह मराठी निबंध | Bhagat singh essay in Marathi (400 शब्द)
भगतसिंग हे एक महान भारतीय क्रांतिकारी होते. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध च्या लढ्यात त्यांनी केलेला दोन हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या तेविसाव्या वर्षी इंग्रजांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली. भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 ला पंजाबच्या ल्यालपुर जिल्ह्यातील बंगा या छोट्याश्या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती तर वडिलांचे नाव किशन सिंग होते. भगत सिंग यांचे वडील, किशन सिंग आणि काका, सरदार अजित सिंग हे दोघी त्याकाळचे लोकप्रिय स्वातंत्र्य सेनानी होते. दोघी गांधीजींच्या विचारांचे समर्थक होते.
आपले वडील व काकांच्या कार्याने भगतसिंग खूप प्रभावित झाले. लहानपणापासून त्यांच्यात देशाविषयी निष्ठा आणि भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करणे ही इच्छा निर्माण झाली. 13 एप्रिल 1999 ला जेव्हा अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरण घडले तेव्हा भगतसिंग हे बारा वर्षाचे होते या घटनेचा खोल प्रभाव त्यांच्या मनावर पडला. भगतसिंग यांच्या नसानसात देश प्रेम पळू लागले होते. 13 वर्षाच्या वयात शाळा सोडून भगतसिंग यांनी लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या काळात त्यांची ओळख अनेक राजकीय नेत्यांशी झाली. याच कॉलेजमध्ये त्यांनी युरोपियन क्रांतिकारी आंदोलनाचा अभ्यास केला, या अभ्यासातून त्यांना खूप प्रेरणा मिळाली.
1921 साली जेव्हा गांधीजींनी असहयोग आंदोलन सुरू केले तेव्हा भगतसिंग त्या आंदोलनात सामील झाले. परंतु चौरीचौरा येथील घटनेने व्यथित होऊन गांधीजींनी आपले आंदोलन थांबवले. हे सर्व पाहून भगतसिंग निराश झाले. त्यांनी विचार केला की अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवणे कठीण आहे, म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निश्चय केला.
सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आजाद यांनी पोलिस अधिकारी सौंडर्स ची गोळी मारून हत्या केली. या घटनेनंतर इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावली. परंतु भगतसिंग व चंद्रशेखर आजाद दोघी शिक्षेपासून वाचण्यासाठी रूप पालटून हावडा येथे गेले.
याच्या काही काळानंतर इंग्रजांना भारतीयांची शक्ती दाखवून देशवासीयांना जागृत करण्यासाठी त्यांनी विधानसभेत बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला ठरलेल्या योजनेनुसार ते आपले सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत विधान सभेच्या सत्रात पोहोचले व त्यांनी बॉम्ब फेकला. या हल्यात कोणीही ठार होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. बॉम्ब फुटल्यानंतर त्यांनी इंकलाब झिंदाबाद चे नारे दिले. यानंतर त्यांनी स्वताला पोलिसांच्या ताब्यात दिले. इंग्रजांनी त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. परंतु जेव्हा इंग्रजांना कळाले की भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनीच पोलिस अधिकारी सौंडर्स ची हत्या केली तेव्हा त्यांनी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली.
23 मार्च 1931 ला आपल्या फाशीच्या दिवशी हे तिघी वीर इंकलाब झिंदाबाद, भारत माता की जय हे नारे देत जात होते. सरदार भगत सिंग हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांनी दिलेले बलिदान खरोखर प्रशंसनीय आहे. आज जरी भगत सिंग आपल्या सोबत नाही आहेत, तरी त्यांची देशभक्ती ची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत असते.
***
भगत सिंह यांची संपूर्ण माहिती वाचा येथे
मित्रहो हा होता भगतसिंग मराठी निबंध. आशा आहे की Bhagat singh essay in Marathi तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरला असेल. अधिक निबंध आणि मराठी भाषणे मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट bhashanmarathi.com ला.
useless...
उत्तर द्याहटवाvery usefulllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
उत्तर द्याहटवाvery usefulllllllllllllllllllllllllllllllllllll
उत्तर द्याहटवाKhup chan👍👌
उत्तर द्याहटवा