माझा वाढदिवस मराठी निबंध | Essay on my birthday in marathi

माझा वाढदिवस निबंध : वर्षातून एकदा प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला जातो. मित्रांनो तुमचा देखील वाढदिवस दरवर्षी साजरा केला जात असेलच, आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी maza vadhdivas essay in marathi अर्थात माझा वाढदिवस या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आहे. तर चला maza vadhdivas nibandh सुरू करूया.. माझा वाढदिवस निबंध | Maza Vadhdivas Marathi Nibandh

वाढदिवस साजरा करणे प्रत्येकालाच आवडते. वर्षभरातून एकदा प्रत्येकाच्या जिवनात हा दिवस येतो. एखाद्याचा वाढदिवस असणे म्हणजे या दिवशी त्याचा जन्म झालेला असतो. प्रत्येक वाढदिवसाला आपले वय एक एक वर्षाने वाढत जाते. मी माझा वाढदिवस माझे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबासोबत साजरा करतो. माझा वाढदिवस दरवर्षी 16 डिसेंबर ला येतो. 


आपल्या देशात आधीच्या काळात फक्त राजे महाराजे आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करीत असत. परंतु आजच्या काळात वाढदिवस साजरे करण्याचे स्वरूप बदलून गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक व्यक्ती वाढदिवस साजरा करताना दिसतो. आपल्या देशात वाढदिवसाला केक कापून पार्टी देण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे. 


माझ्या वाढदिवसाची सुरुवात माझे मित्र आणि नातेवाईकांच्या शुभेच्छानी होते. मी देखील लवकर उठून आंघोळ वैगरे करून तयार होतो. अनेक मित्र आणि नातेवाईक मला कॉल करून शुभेच्छा देतात. मोबाईल वर तर एक सेकंदही मेसेज चा गॅप पडत नाही.  माझे आई वडील माझ्या वाढदिवसाला दरवर्षी घरात पूजा ठेवतात. नंतर आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतो. संध्याकाळी वाढदिवसाची पार्टी असते त्यासाठी घरात तयारी केली जाते. 


वाढदिवसाच्या दिवशी मी शाळेचा युनिफॉर्म न घालता नवा ड्रेस घालून जातो. शाळेत जाताबरोबर आमच्या शिक्षकांचे पाय पडून आशीर्वाद घेतो. सर्व विषयांचे शिक्षक आणि विद्यार्थी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. शाळेत माझे मित्र वाढदिवसाला कापण्यासाठी केक आणतात. केक कापून मी त्यांना चॉकलेट व केक देतो. अशा पद्धतीने शाळेत माझ्या वाढदिवस साजरा केला जातो.


जशी संध्याकाळ झाली तसा मी नवे कपडे घालून तयार होतो. आमच्या घराला सजवले जाते. आमचे शेजारी, अनेक नातेवाईक आणि मित्र घरी येतात. माझ्या वाढदिवसाची पार्टी खूप भव्य आणि उत्कृष्ट असते. घरात गोड मिठाई व विविध व्यंजन बनवले जातात. सर्वीकडे आनंददायी वातावरण असते. येणारे प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी काही नाही गिफ्ट घेऊन येतात. 


माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. डीजे लावून नृत्य केले जाते. आमच्या घरी सर्व नातेवाईकांना मेजवानी दिली जाते. माझे काही शिक्षक देखील या वाढदिवसाच्या पार्टीत येतात. माझा वाढदिवस साजरा करण्याची सुरुवात संध्याकाळी 6 वाजेपासून होते. आणि जवळपास 9 वाजेपर्यंत हा वाढदिवस साजरा केला जातो.


माझा वाढदिवस खूप छान असतो. मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाची वाट पाहत असतो. कारण या दिवशी मला जो आनंद मिळतो तो इतर कोणत्याही दिवशी प्राप्त होत नाही. या दिवशी मला सर्वांकडून छान छान गिफ्ट मिळतात. इत्यादी अनेक कारणांमुळे मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाची वाट पाहत असतो. 

--समाप्त--


तर मित्रहो हा होता essay on my birthday in marathi. आशा आहे की हा निबंध तुम्हाला आवडला असेल या निबंधाला आपल्या मित्रांसोबत शेअर करून त्यांचेही ज्ञान वाढवा. याशिवाय काही वाढदिवस मराठी शुभेच्छा वाचा येथे


वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश प्राप्त करण्यासाठी पुढील लिंक उघडा 

👇👇👇

Marathi Birthday Wishes


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने