मी पाहिलेला अपघात निबंध मराठी | An Accident I Saw Essay in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण मी पाहिलेला अपघात या विषयावरील निबंध व मराठी प्रसंग लेखन पाहणार आहोत. हा मी पाहिलेला अपघात मराठी निबंध (Mi pahilela apghat nibandh) तुम्ही शाळा कॉलेज मध्ये अभ्यासासाठी वापरू शकतात. व यातून योग्य कल्पना घेऊन आपला स्वतः चा निबंध देखील बनवू शकतात. तर चला सुरू करूया.


mi pahilela apghat in marathi
Mi pahilela apghat

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela apghat Nibandh Marathi

(400 शब्द)

एके दिवशी मला काहीतरी कामा निमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते. माझ्याकडे मोटारसायकल होती. तिच्यावर बसून मी निघालो घरापासून थोड्या अंतरावर पेट्रोल पंप होते. बाइक मध्ये पेट्रोल कमी होते मी विचार केला की अगोदर पेट्रोल टाकून घेतो मग पुढील प्रवासाला निघतो. यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन मी पेट्रोल भरवून घेतले. 

जसेही मी पेट्रोल भरून बाहेर पडलो. पाहतो तर काय समोरून तुफान वेगात तीन व्यक्ती एका मोटारसायकल वर बसून येत होते. आणि त्यांच्याच विरुद्ध बाजूने एक व्यक्ती ट्रॅक्टर चालवत येत होता. आणि क्षणातच मोटरसायकल आणि ट्रॅक्टर दोघे एकमेकांसमोर आले. ट्रॅक्टरस्वार ने अर्जंट ब्रेक मारला. परंतु मोटरसायकलस्वार व्यक्तींचा वेग ताब्यात आला नाही. आणि दोघांची जोरदार टक्कर झाली. एक भीषण अपघात माझ्या पाहत झाला होता.

मी माझ्या बाईक वरून उतरून तेथे पोहोचतो तेवढ्यात अनेक लोक त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले होते. पोलिस आणि सरकारी रुग्णवाहिकेला सूचना देण्यात आली. दहा मिनिटांनंतर रुग्णवाहिका आली. बाईक चालवणारा व्यक्ती तर जागीच ठार झाला होता. मध्ये बसलेला व्यक्ती कापत होता. आणि मागे बसलेल्या व्यक्तीचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. मी पाहिलेला हा अपघात खूप भयानक होता. मला खूप वाईट वाटत होते. मी देवाला त्यांना जीवन दान देण्यासाठी प्रार्थना केली. रुग्णवाहिकेतून काही लोक बाहेर आले त्यांनी बाईक स्वरांना आत टाकले. व रुग्णालयात घेऊन गेले. 

त्यांना नेल्यावर रस्त्यावर खूप रक्त सांडलेले दिसत होते. ते सर्व पाहून माझे मन विचलित झाले. मी या आधी कधीही असा अपघात पहिला नव्हता. ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर वर बसलेला असल्याने त्याला जास्त मार बसला नाही. परंतु त्यालाही दवाखान्यात नेण्यात आले. मी थोडा वेळ तेथे थांबलो. आता माझी बाहेर गावी जाण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली होती. मी गाडीवर बसलो व हळुवार बाईक चालवत तेथूनच घरी परतलो. 

घरी आल्यावर मी विचार करू लागलो की लोक एवढ्या वेगाने गाडी का चालवत असतील बरं... त्यांच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला दुःख सहन करावे लागते. आता त्या तिन्ही व्यक्तींच्या घरातील आई-वडील, पत्नी-मुले किती शोक व्यक्त करीत असतील. या शिवाय आपल्या देशात दररोज किती अपघात होतात या अपघातांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात, तर काही लोक कायमचे अपंग होतात. आपल्याला मिळालेले मनुष्य जीवन अतिशय अनमोल आहे. एकदा मिळालेले शरीर पुन्हा मिळत नाही. म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करायला हवे. 

जर आपल्याला कोठे जायचे असेल तर नेहमी हळुवार गतीने वाहन चालवायला हवे. कारण आपल्या जीवनापेक्षा आवश्यक कोणतेही काम नसते. कधीही दारू पिऊन आणि नशा करून वाहने चालवू नये. नेहमी डाव्या बाजूने चालायला हवे. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यानी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. याशिवाय भारत शासनाने देखील वाहतुकीचे नियम अधिक कठोर करायला हवेत. जेणेकरून कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही.

***

Watch Video


तर मित्रांनो मी पाहिलेला अपघात मराठी निबंध (Mi pahilela apghat) हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हास कमेंट करून नक्की सांगा. मी पाहिलेला अपघात हे मराठी प्रसंग लेखन आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद


READ MORE: 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने