मी वाघ बोलतोय / वाघाची आत्मकथा निबंध | autobiography of tiger in Marathi

वाघाचे मनोगत मराठी निबंध | Waghachi Atmakatha Marathi Nibandh 

autobiography of tiger in Marathi: मित्रांनो वाघ हा भारताचा राष्ट्रीय पशू आहे. वाघ खूप शक्तिशाली असतो. वेळप्रसंगी सिंहालाही हरवणाऱ्या वाघाला जंगलातील सर्वच प्राणी घाबरतात. 

आज आपण अशाच एक वाघाची आत्मकथा/आत्मवृत्त / वाघाचे मनोगत  पाहणार आहोत. हा वाघ त्याचे मनोगत सर्वांसमोर मांडत आहे. तर चला सुरू करूया.  


वाघाची आत्मकथा निबंध

वाघाची आत्मकथा मराठी निबंध | autobiography of tiger in Marathi

मी काय आहे? लोक म्हणतात मी एक पशु आहे. जंगलातील सर्वाधिक शक्तिशाली पशुंपैकी एक... माझे नाव वाघ आहे आणि मी तुमच्या घरात ये-जा करणाऱ्या मांजरीच्या कुटुंबातील आहे. परंतु मी तुमच्या घरात न राहता, मानवी वस्तीपासून दूर अश्या घनदाट जंगलात राहतो. तुमच्यासारखे मनुष्य विचार करतात की मी खूप ताकतवर आहे. परंतु मला असे अजिबात वाटत नाही. मला तर वाटते की माझ्या सारखा दुर्बल प्राणी कोणीही नाही. मी असे का म्हणत आहे हे जाणून घायचे आहे का? हो, तर ऐका मग..


माझा जन्म सुंदरबनच्या घनदाट अंधार असलेल्या एका सुंदर अरण्यात 'बंगाल टायगर' प्रजातीत झाला होता. माझ्या आई माझे नाव शेरू ठेवले. माझे लहानपण खूप आनंदात जात होते. हळू हळू मी मोठा होऊ लागलो. दिवसेंदिवस माझ्या शरीराची वाढ होत होती. माझे मजबूत हात-पाय आणि शक्तिशाली शरीराचे रूप कोणालाही मोहित करीत असे. लहानपणी एकदा मी माझी आई व मोठ्या भावासोबत शिकारीला निघालो. 


त्या दिवशी आई मला व माझ्या भावाला शिकारीचे धडे देत होती. आम्ही एका नदीच्या किनारी झाडांमध्ये जाऊन बसलो. कोणताही आवाज न करता शिकार करण्यासाठी आम्ही सज्ज झालो. थोड्या वेळात हरणीचा एक कळप नदीवर आला. त्या सर्व हरणी पाणी पिण्यात मग्न झाल्या. माझ्या आईने आम्हाला शिकार कशी करावी हे लक्ष देऊन पाहण्यास सांगितले. व ती एक एक पाऊल टाकत पुढे सरकू लागली. हरणीच्या थोड्या जवळ पोहचताच एक जोरदार झेप घेऊन तिने एका हरणीला पकडले. आपले धारदार दात तिच्या पोटात टाकले. वाघिणीचे आक्रमण झाल्याने इतर हरनी सुसाट वेगाने पळत सुटल्या. त्या दिवशी आम्हाला खूप छान मेजवानी मिळाली होती. 


आम्ही मिटक्या मारीत हरणीचे मास खाण्यात गुंग झालो. इतक्यात जोरदार गोळीचा आवाज झाला. आवाजाने मी एकदम घाबरलो. आणि वेगाने आईच्या मागे पडू लागलो. दुर्देवाने ती गोळी माझ्या भावाच्या छातीत लागली. गोळी लागताच क्षणी तो खाली कोसळला. आई आणि मी आपले प्राण वाचवत एका गुहेच्या आत शिरलो. तेथून आम्ही पाहिले दोन शिकारी माझ्या भावाच्या मृत शरीरा जवळ आले. त्यांनी त्याला दोराने बांधून आपल्या ट्रॅक मध्ये ओढले व त्याच्या मृत शरीराला घेऊन शहराकडे निघाले. त्या दिवशी मनुष्याचे हे जग किती कठोर आहे हे मी पहिल्यांदाच अनुभवले. 


दिवसामागून दिवस जाऊ लागले. मी आणखी मोठा आणि शक्तिशाली झालो. आता मी माझ्या आईच्या मदतीशिवाय स्वबळावर शिकार करू लागलो. असाच एक दिवस उगवला. मी शिकारीला निघालो. परंतु आज काही केल्या शिकार मिळत नव्हती. खूप प्रयत्न करूनही एक ससा देखील हाती लागला नाही. शेवटी थकून मी घराकडे परत निघालो. इतक्यात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडांमधून काहीतरी आवाज येऊ लागला. मला शिकाऱ्याच्या वास आला. मी जीव वाचवण्यासाठी जोरात पळालो. मागून कोणीतरी माझे पाय खेचत आहे असे वाटू लागले. आणि एवढ्यातच डोळ्यांपुढे अंधार झाले. माझ्या सोबत काय झाले काहीच माहीत नव्हते. 


जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका पिंजऱ्यात होतो. माझ्या आजूबाजूच्या पिंजर्यांमध्ये माकड, हत्ती असे वेगवेगळे जंगली पशु कैद करून ठेवले होते. हळू हळू सर्वकाही माझ्या लक्षात येऊ लागले. मी एका सर्कशीत होतो आणि त्या दिवशी मी व माझ्यासारख्या इतर जंगली पशूंना पकडून सर्कशीमध्ये आणण्यात आले होते. नंतर मला काही इंजेक्शन टोचण्यात आली. आणि पिंजऱ्यातून बाहेर काढून सर्कशीत केल्या जाणाऱ्या कसरतीचे प्रशिक्षण देण्यात आले.


दिवसामागून दिवस जाऊ लागले. जंगलासारखे येथे शिकार करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. सर्कस चे मालक मला दररोज प्राण्यांचे मास खाऊ घालत असत. मी दररोज सर्कशीच्या कार्यक्रमात माझे कर्तब दाखवायचो. लोकांच्या वाजणाऱ्या टाळ्या आणि त्यांच्या द्वारे माझी तोंडभरून प्रशंसा मला खूप आवडायची. 


सर्कशीत माझे अनेक मित्र बनले. याच मित्रांपैकी एक होता बबलू. बबलू एक गोरीला होता. शरीराने खूप ताकदवान दररोज दहा डझन केळे एकटाच खाणारा. परंतु काही दिवसांपासून मी निरीक्षण केले की बबलू आधी सारखा आनंदी नव्हता. बहुतेक त्याची तब्येत खराब झाली असावी. आजारी असल्याने एके दिवशी सर्कशीत त्याने व्यवस्थित कर्तब केले नाही. या वेळी लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. रिंगमास्टर ला खूप संताप आला. त्याने बबलू ला एका बंद खोलीत नेऊन सोडून दिले. जवळपास दोन दिवसांनी मला त्या खोलीचे दार उघडे दिसले. दोन दिवसांपासून आम्हा दोघांची भेट झाली नव्हती. आजूबाजूला कोणीही नाही अशी खात्री करून मी त्या खोलीत शिरलो. आतून खूप घाणेरडा वास येत होता. तेथे मला बबलू पडलेला दिसला. मी धावत त्याच्या जवळ गेलो. "बबलू, बबलू!" मी त्याला आवाज दिला. पण मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मला लक्षात आले की आता तो आमच्यात राहिला नव्हता. 


बबलू च्या मृत्युने मी खूप उदास झालो. मला मनुष्याच्या लालची स्वभावाची ओळख झाली होती. बबलू आजारी असल्याने तो सर्कशीतील कर्तब करीत नव्हता. म्हणून रागाच्या भारत सर्कस मालकाने त्याला कोंडून दिले. दोन दिवस काहीही खाऊ घातले नाही. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मी विचार करू लागलो की जर मी सुद्धा बबलू प्रमाणे आजारी झालो. तर माझ्यावरही अशीच पाळी येईल. पण मी आता काहीही करू शकत नव्हतो. शिवाय माझ्या तंबूत येऊन निपचित पडून राहण्याऐवजी...

--समाप्त-- 


तर मित्रहो हा होता waghachi atmakatha किंवा waghache manogat या विषयांवरील मराठी निबंध. आशा करतो की हा निबंध तुम्हाला आवडला असेल. ह्या निबंधाला इतरांसोबत शेअर करून आम्हास सहाय्य करा. धन्यवाद.. 


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने