वकील कसे बनायचे / वकील मराठी माहिती | How to Become Advocate / Lawyer information in marathi
lawyer information in marathi : मित्रांनो प्रत्येकाचा जीवनाचे स्वप्न असते की शिकून काही तरी नाव कमवावे व आपले आणि समाजाचे भले करावे. यासाठी काही जण डॉक्टर बनण्याचे स्वप्न, पाहतात काही इंजिनियर तर काही लोकांचे स्वप्न एक प्रोफेशनल वकील बनण्याचे असते.
आजच्या अपराधीक जगात एक यशस्वी वकील बनणे खूप मोठी गोष्ट आहे. परंतु फक्त कायद्याचे शिक्षण मिळवून तुम्ही वकील बनणार नाहीत. यासाठी तुम्हाला व्यावहारिक ज्ञानाची आवश्यकता आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेतात परंतु त्यातून फक्त 20 टक्के विद्यार्थी प्रशिक्षणासाठी जातात. आजच्या या लेखात आपण वकील कसे बनावे (lawyer in marathi) या बद्दल माहिती प्राप्त करणार आहोत. चला सुरू करूया...
वकील मराठी माहिती | advocate lawyer meaning in marathi
एक यशस्वी वकील बनण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून सर्वात आधी तुम्हाला कायद्याचे शिक्षण घ्यावे लागेल. वकील शिक्षण म्हणून भारतात प्रसिद्ध असलेले LLB शिक्षण प्रत्येक वकील बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला घ्यावे लागते.
एल.एल.बी. (LLB) काय असते ? llb course information in marathi
एल.एल.बी चा इंग्रजी फुलफॉर्म लेगम बॅक्लॅरियस (Legum Baccalaureus) असा होतो. इंग्रजीत याचा अर्थ 'बॅचलर ऑफ लॉ' असाही केला जातो. LLB ही कायद्याची बॅचलर डिग्री असते. वकिली क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी LLB अत्यंत महत्त्वाचे शिक्षण आहे.
LLB मध्ये तुम्हाला भारतीय कायद्यांचे संपूर्ण शिक्षण दिले जाते. LLB करून तुम्ही एक प्रोफेशनल वकील बनू शकतात किंवा इतर क्षेत्रात ही जाऊ शकतात. LLB नंतर असणाऱ्या करिअर ऑप्शन बद्दल आपण पुढे पाहूया. परंतु त्या आधी LLB करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहुया.
LLB कोर्स चे प्रकार
LLB कोर्स चे दोन प्रकार असतात एक 5 वर्षाचा आणि दुसरा 3 वर्षाचा. जर तुम्ही 12 वी नंतर सरळ कायद्यांचे शिक्षण प्राप्त करू इच्छिता तर तुम्हाला पाच वर्षाचा LLB कोर्स करावा लागेल. याशिवाय जर तुम्ही 3 वर्षाचा BA LLB कोर्स करू इच्छिता तर त्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करावे लागेल. LLB चे शिक्षण घेण्यासाठी लागणारी योग्यता पुढीलप्रमाणे आहे.
LLB कोर्स साठीची पात्रता
- जर तुम्ही बारावी नंतर एल एल बी करू इच्छिता तर तुमच्याकडे 12 वी पास चे मार्कशीट असायला हवे.
- बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स असायला हवेत. 50 टक्क्यांपेक्षा कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी LLB साठी अपात्र राहतील.
- LLB करणार्या विद्यार्थ्याची जास्तीतजास्त वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
- जर तुम्ही BA LLB चा तीन वर्षाचा कोर्स करू इच्छिता तर तुमचे शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवे.
- ग्रॅज्युएशन नंतर बी ए एल. एल. बी. करणार्या विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात कमीत कमी 45 टक्के असायला हवेत.
- BA LLB करण्यासाठीची वयोमर्यादा बावीस वर्षे आहे.
वकील कसे बनावे ? lawyer information in marathi
वकील बनण्यासाठी च्या 4 प्रमुख पायर्या पुढील प्रमाणे आहेत.
1) 12 वी पर्यंतचे शिक्षण आवश्यक आहेत. यामध्ये आर्ट्स साईड मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा मिळेल. कारण आर्ट्स मध्ये लॉ शी संबंधित विषय शिकवले जातात.
2) 12 वी नंतर कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. भारतात प्रसिद्ध असलेली CLAT परीक्षा देऊन तुम्ही कोणत्याही एलएलबी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. llb अभ्यासक्रम पहा येथे
3) LLB चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला इंटर्नशिप करावी लागेल. या दरम्यान तुम्हाला कोर्ट कचेरीच्या संपूर्ण प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाईल.
4) स्टेट बार काऊन्सिल मध्ये नावनोंदणी : इंटर्नशिप पूर्ण केल्यावर तुम्हाला आपल्या राज्याच्या स्टेट बार काऊन्सिल मध्ये जाऊन आपली नाव नोंदणी करावी लागते. यानंतर ऑल इंडिया बार काऊन्सिल कढून घेण्यात येणारी परीक्षा AIBE पास करावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही संपूर्ण राज्यात कोठेही वकिली करू शकतात.
LLB पूर्ण केल्यावर जॉब आणि करियर | career options after LLB in marathi
एक वकील हा प्रायव्हेट व सरकारी दोघी क्षेत्रात जॉब करू शकतो. अत्याधिक वकील LLB पूर्ण केल्यावर प्रोफेशनल वकील म्हणून काम करणे पसंद करतात. परंतु एक चांगला वकील याशिवायही अनेक करियर ऑप्शन ची निवड करू शकतो.
1) एन्वॉयरनमेंटल लॉयर : एन्वॉयरनमेंटल अर्थात पर्यावरणाच्या क्षेत्रातील वकील निसर्गाकडून मिळालेल्या वस्तू नष्ट होण्यापासून वाचवतात. या मध्ये बरेचदा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केली जाते. याशिवाय पर्यावरणाशी जुडलेल्या संस्थांमध्येही एन्वॉयरनमेंटल लॉयर ची मागणी असते.
2) सायबर लॉ वकील : वाढत्या इंटरनेट क्रांतीमुळे डिजिटल क्षेत्रातील अपराधी वाढत आहेत. कॉम्प्युटर आणि इंटरनेट ची सुरक्षितता व या क्षेत्रातील होणारे अपराध पकडण्यासाठी सायबर लॉ वकिलाची मागणी वाढत आहे.
3) पेटंट आणि कॉपीराइट लॉयर : पेटंट एक अशी व्यवस्था आहे ज्यात एखादा नवीन शोध लावणाऱ्या व्यक्तीला त्या प्रॉडक्ट चा एकाधिकार दिला जातो. जर इतर एखादी कंपनी तो प्रोडक्ट बनवू इच्छिते तर त्यासाठी पेटंट प्राप्त व्यक्तीकडून परवानगी घ्यावी लागते. या क्षेत्रात असणाऱ्या वकिलांची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.
तर मित्रहो ही होती वकील कसे बनावे या बद्दल ची मराठी माहिती. आशा आहे की ही lawyer information in marathi तुम्हास नक्कीच उपयुक्त ठरली असेल. याशिवाय जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हास कमेन्ट करून विचारू शकतात.
माझे b.com पर्यंत शिक्षण झाले आहे, मला income &taxetion याविषयावर वकीली करायची आहे, मी mh cet 3 years परिक्षा दिली आहे, admission process बदल माहिती हवी आहे, तसेच या कोर्स बदल जाणून घेण्याची उत्सुकता आहे,
उत्तर द्याहटवाThank you so much info was useful .Plz post more info about BA LLB & LLM .
उत्तर द्याहटवामाझे वय 51 आहे मला वकील बनण्याची खूप इच्छा आहे होऊ शकते का ?
उत्तर द्याहटवाBA झाल्यावर CLAT ची परीक्षा असते का.....
उत्तर द्याहटवा