पेट्रोल संपले तर मराठी निबंध | Petrol Sample tar Marathi Nibandh

पेट्रोल संपले तर मराठी निबंध - Petrol Sample tar : मित्रांनो आजकाल पेट्रोल खूप चर्चेत आहेत. कारण दिवसागणिक पेट्रोल चे भाव वाढत आहेत. आता तर हे पेट्रोल 100 चा आकडा पार करीत 103 रुपये लीटर ला पोहचले आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर एक दिवस पेट्रोल संपले तर? 

जर petrol sample tar तर देशात व जगभरात अनेक समस्या निर्माण होतील, परंतु पेट्रोल संपले तर काय फक्त समस्याच निर्माण होतील? तर नाही Petrol Sample tar निर्माण होणाऱ्या समस्या सोबत याचे निसर्गाला फायदे देखील होतील. तर पेट्रोल संपल्या वर होणाऱ्या या सर्व बदलांची माहिती आजच्या या लेखात देण्यात आलेली आहे. तर चला सुरू करूया...


petrol sample tar marathi nibandh
पेट्रोल संपले तर निबंध

पेट्रोल संपले तर मराठी निबंध | Petrol Sample tar 

(300 शब्द)

पृथ्वीवर ऊर्जेचे वेगवेगळे स्त्रोत अस्तित्वात आहेत. यातील काही स्त्रोत हे पारंपरिक तर काही अपारंपारिक आहेत. पारंपरिक स्त्रोतांमध्ये कोळसा, पेट्रोल, डिझेल इत्यादींचा समावेश होतो तर सूर्य प्रकाश, हवा, बायोमास हे ऊर्जेचे अपारंपारिक स्त्रोत आहेत. या सर्वांमध्ये महत्त्वाचे नैसर्गिक खनिज म्हणजे पेट्रोल आणि डिझेल होय. कारण यांच्यामुळेच आपल्याला आपली वाहने चालवण्यात मदत मिळते. पेट्रोल-डिझेल शिवाय वाहने चालवणे अशक्य आहे. मनुष्य शेकडो वर्षांपासून पेट्रोलचा उपयोग करीत आहे. परंतु पेट्रोल हे पारंपारिक स्त्रोत असल्याने, येत्या काळात ते संपुष्टात येईल आणि मग पेट्रोल संपले तर आपले काय होईल... आपली वाहने कशी चालणार? आपण एका गावून दुसऱ्या गावी कशे जाणार??


शास्त्रज्ञांनुसार सन 2080 पर्यंत जगातील पेट्रोल डिझेल चा पुरवठा पूर्णपणे बंद होईल. आज पेट्रोल हे मानवी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहे आणि पेट्रोल शिवाय सरल जीवनाची कल्पना करणे देखील कठीण आहे. पेट्रोल संपल्याने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था खालावेल. आजकाल जगातील सर्वाधिक प्रवास, एका देशातून दुसऱ्या देशात वस्तुंची देवाण-घेवाण ट्रक, रेल्वे, विमान, जहाज इत्यादी वाहतुकीच्या साधनांद्वारे केली जाते. परंतु पेट्रोल आणि डिझेल संपल्याने ही सर्व वाहने चालणार नाहीत, ज्यामुळे कोणत्याही देशातून आयात निर्यात होणार नाही परिणामी विदेशी व्यापार ठप्प पडतील. 


जर पृथ्वीच्या गर्भातील पेट्रोल डिझेल व सर्व खनिज तेल संपले तर आपण पुन्हा एकदा प्राचीन काळात पोहचून जाऊ. आपल्याला प्रवासासाठी मोटार वाहनाच्या ऐवजी बैलगाडी आणि घोडा गाडीचा वापर करावा लागेल. ज्या लोकांना वेगवान गतीने गाडी पडवीत एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची सवय असेल त्यांना तर आपली सवय कायमची विसरावी लागेल.  


पेट्रोल डिझेल संपल्यानंतर आपल्या समोर अनेक समस्या उभ्या राहणार आहेत म्हणून या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आज पासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्युत वाहनाच्या वापरावर भर द्यायला हवी. शासनासोबत देशातील नागरिकांनीही आपली जवाबदारी समजायला हवी. खाजगी वाहन वापरण्याऐवजी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनाचा उपयोग करायला हवे. असे केल्याने देशातील प्रदूषणाची समस्या देखील कमी होईल. याशिवाय सौर उर्जेवर चालणारी अनेक दुचाकी व चारचाकी वाहने बाजारात उपलब्ध आहेत. पेट्रोल डिझेल वर चालणारी वाहने न घेता या विद्युत वाहनांना प्राधान्य द्यायला हवे. जर अश्या पद्धतीने प्रत्येकजण आपली जवाबदारी समजून प्रयत्न करेल तर पेट्रोल संपल्यावर निर्माण होणारे दुष्परिणाम टाळता येतील. व निसर्गाला ही प्रदूषण मुक्त करता येईल.

***


पेट्रोल संपले तर निबंध | Petrol Sample Tar Marathi Nibandh

(250 शब्द)

मानव हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. निसर्गाने मानवाची जशी निर्मिती केली, त्याच पद्धतीने मानवाच्या मूलभूत गरजाही निसर्गाने पूर्ण केल्या आहेत. हवा, पाणी, सूर्यप्रकाश या अमर्यादित स्त्रोतांपासून तर खनिज तेल, लाकूड, इंधन अश्या नैसर्गिक साधनसंपत्ती निसर्गाने आपल्याला भरपूर प्रमाणात पुरवल्या आहेत. 


या नैसर्गिक साधन संपत्ती पैकी पेट्रोल हे एक महत्त्वाचे इंधन आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मानवाच्या जीवनाची गती हे पेट्रोल ने दिलेले एक वरदान आहे. पेट्रोल या इंधनामुळे मानवाची अनेक कामे सोपी झाली आहेत. आज प्रत्येक घरात कमीत कमी एक तरी वाहन पाहायला मिळून जाते. अशा खाजकी वाहणांपासून तर सार्वजनिक वाहने ही पेट्रोल वरच अवलंबून असतात. अशा वाहनांमुळे दळणवळण वाहतूक सोपी झाली आहे. परंतु दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि वाढणारे वाहनाचे प्रमाण यामुळे अश्या मर्यादित खनिज तेलाचे प्रमाण कमी होत आहे. पृथ्वीवरील या इंधनांचा साठा संपत चालला आहे. 


खरंच पेट्रोल संपले तर...? याचा गांभीर्याने विचार करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. पेट्रोल संपले तर दळणवळणाची प्रक्रिया पूर्णपणे थांबेल. स्कूटर्स, मोटारी यासारखी पेट्रोल वर अवलंबून असणारी वाहने जागीच थांबतील. एका गावातून दुसऱ्या गावातील प्रवास संथ होईल. गतिरोधकामुळे वाहनाला वाहनाला जसा ब्रेक लावावा लागतो तसाच ब्रेक पेट्रोल संपल्यावर आपल्या धावत्या जिवणालाही लावावा लागेल. पेट्रोल संपल्याने इंधनावर अवलंबून असलेले सर्वच व्यापार संपुष्टात येतील. त्यामुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होईल. आणि याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था वर होईल. देशांतर आयात निर्यात बंद होईल. जेथे जे पिकत नाही तेथे ते पोहचवणे अशक्य होईल. परकीय चलन बुडेल. वाहतुकीसाठी घोडागाडी, बैलगाडी, सायकल यांचा वापर करावा लागेल.


परंतु पेट्रोल संपण्याचे काही फायदेही होतील. पेट्रोल संपले तर वाहनांमुळे होणारे प्रदुषण थांबेल. पायी प्रवास केल्याने मानवाचा चांगलाच शारीरिक व्यायाम होईल. तो निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ येईल. निसर्ग प्रदूषणाच्या छायेतून मुक्त होईल. पेट्रोल संपले तर? याचा सर्वांनी प्राकृतिक दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. आजच्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे इंधनाचे साठे कमी होत आहेत. यासाठी आपण उपाय करणे गरजेचे आहे. जसे की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनाचा वापर करणे, गर्जेशिवाय खाजगी वाहनांचा जास्त वापर न करणे जवळ व शक्य असणाऱ्या ठिकाणी पायी जाणे असे अनेक उपाय करून आपण इंधन बचत करू शकतो. 


पेट्रोल संपले तर आपण मांडून ठेवलेल्या पसार्याचा आपल्याला अडथळा निर्माण होईल. निसर्गाने निस्वर्थपणे आपल्याला सर्व मूलभूत गरजा पुरवल्या आहेत. पण आपण स्वार्थी आणि लबाडीपणाने त्यांचा अतिवापर करत आहोत. अशा मर्यादित साधनसंपत्तीचा जपून वापर करणे आवश्यक आहे. पेट्रोल संपले तर भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल पण याशिवाय निसर्गावरही त्याचा परिणाम होईल म्हणून अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा जपून वापर करणे आवश्यक आहे.

***


तर मित्रहो आशा करतो या लेखातील ही मराठी माहिती आपणास आवडली असेल व हा पेट्रोल संपले तर मराठी निबंध आपल्यासाठी उपयोगी ठरला असेल . या  Petrol Sample tar Marathi निबंधाला इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद...


अधिक वाचा :

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने