सर आयझॅक न्यूटन मराठी माहिती | Sir isaac newton information in marathi

Newton information in Marathi : सर आयझॅक न्यूटन हे एक गणितज्ञ, भौतिक विज्ञानाचे शास्त्रज्ञ असण्यासोबतच आजवर चे सर्वात प्रभावी व्यक्ती मानले जातात. आजच्या या लेखात आपण सर आयझॅक न्यूटन यांचा संपूर्ण जीवन परिचय व मराठी माहिती पाहणार आहोत तर चला सुरू करुया.


isaac newton information in marathi
न्यूटन मराठी माहिती

Isaac newton information in marathi | न्यूटन मराठी माहिती 

प्रारंभिक जीवन

न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 ला इंग्लंड मधील लिंकनशायर शहरातील वुलस्टोर्प मध्ये झाला. प्राचीन ज्युलियन कॅलेंडर चा उपयोग करता. न्यूटन ची जन्मतिथी 25 डिसेंबर 1642 म्हणूनही वापरली जाते. न्यूटन यांचे वडील एक समृद्ध स्थानीय शेतकऱ्याचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या वडिलांचे नाव इसहाक होते. न्यूटन च्या जन्माच्या 3 महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वेळेआधी जन्मल्याने न्यूटन यांचे शरीर कमजोर होते.


वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा न्यूटन 3 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या आजीकडे सोडून दुसरे लग्न करून घेतले. न्यूटन जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या सावत्र वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई दुसऱ्या विवाहाच्या तीन मुलांना घेऊन परत आली.


आयझॅक न्यूटन यांचे शिक्षण

न्यूटन यांनी आपले शिक्षण लिंकनशायर शहराच्या एका शाळेत केले. त्यांना रसायन विज्ञान विषयात आवड होती. त्यांच्या आईने 12 वर्षाच्या वयात त्यांना शाळेतून काढून घेतले. त्यांची इच्छा न्यूटन ला एक यशस्वी शेतकरी बनवायची होते. परंतु शेतीच्या कामात न्यूटन अतिशय वाईट तऱ्हेने असफल झाले. शेवटी त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा इंग्लंड ग्रंथम च्या किंग्ज स्कूल मध्ये प्रवेश घेतला. तेथे ते एका फार्मसिस्ट च्या घरात राहत असत. त्यांचे नाव क्लार्क होते. न्यूटन यांना क्लार्क ची प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आवडत असे.


19 वर्षाच्या वयात त्यांनी इंग्लंड मधील ट्रिनिटी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला, या कॉलेज मधून 1665 मध्ये त्यांनी बीए ची पदवी मिळवली. त्यांना मास्टर डिग्री ही प्राप्त करायची होती परंतु प्लेग च्या साथीमुळे त्यांना आपल्या गावी परत यावे लागले. येथे ते लहान मोठे प्रयोग करू लागले. एका वर्षानंतर 1667 मध्ये केंब्रिज परत जाऊन त्यांनी मास्टर डिग्री मिळवली.


शिक्षण घेत असताना त्यांचे गणिताचे शिक्षक त्यांच्या बुद्धिमत्तेने खूप प्रभावित होते, 1669 मध्ये त्यांच्या गणिताच्या प्रोफेसरांनी काही कारणास्तव आपल्या पदावरून राजीनामा दिला व न्यूटन ला आपल्या जागी लागण्यास सांगितले. यानंतर न्यूटन गणिताचे प्रोफेसर बनून गेले.


न्यूटन यांचे प्रयोग व शोध

न्यूटन ने प्रकाश, गती आणि गणितात शोध केले. न्यूटन ने सांगितले की पांढरा रंग इंद्रधनुष्यातील सात रंगांचे मिश्रण आहे.


त्यांची पहिली सर्वात मोठी उपलब्धि प्रतिबिंबित टेलिस्कॉप च्या रूपात 1668 मध्ये झाली. रॉयल सोसायटी ने 1671 मध्ये त्यांना त्यांच्या प्रतिबिंबित टेलिस्कॉप चे प्रदर्शन करण्यास सांगितले. 1665 ते 1667 मध्ये प्लेग च्या साथीमुळे न्यूटन यांनी आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी गावी परत येण्याचे ठरवले.


गुरुत्वाकर्षण चा सिद्धांत

असे म्हटले जाते की गावी परत आल्यावर न्यूटन एके दिवशी बागेत बसून काहीतरी विचार करीत होते. इतक्यात झाडावरून एक फळ खाली पडले. त्या फळाला हातात धरून ते विचार करू लागले की हे फळ खालीच का पडले? वर आकाशात का नाही गेले? त्यांनी ही गोष्ट अनेक लोकांना विचारली. व ते सांगू लागले की पृथ्वीवर कोणतीतरी शक्ती कार्यरत आहे जी या फळाला खाली खेचत आहे. परंतु त्यांच्या या गोष्टीला कोणीही गंभीरपणे घेतले नाही. दीर्घकाळापर्यंत अभ्यास करीत शेवटी न्यूटन ने सूर्याच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला. त्यांनी सांगितले की समुद्रात येणाऱ्या लहरी, चंद्र, सूर्य, पृथ्वी, ग्रह हे सर्व एका शक्तीच्या सहाय्याने कार्य करतात. त्यांनी या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे नाव दिले. न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांतात सांगितले आहे की दोन वस्तू एक दुसऱ्याला गुरुत्वाकर्षणाचा बळावर आकर्षित करतात.


न्यूटन चे गतिविषयी नियम | newton law of motion in marathi

न्यूटन चा पहिला नियम

जर एखादी वस्तू स्थिर अवस्थेत आहे किंवा समान गतीने चालत आहे तर तिच्या गती किंवा अवस्थेत परिवर्तन तेव्हाचे येईल जेव्हा तिच्यावर बाहेरील बळ लावले जाईल. जर बळ लावले गेले नाही तर परिवर्तन येणार नाही. हा नियम न्यूटन चा गतिविषयक प्रथम नियम होता.


न्यूटनचा दुसरा नियम

या नियमानुसार एखाद्या वस्तूवर कार्य करणार्या बळाचे मूल्य हे वस्तूच्या वस्तुमान आणि वस्तूमध्ये तयार होणाऱ्या प्रवेगाच्या (acceleration) गुणाकार एवढे असते. या नियमाला वेग बदलण्याच्या नियम म्हणतात.


न्यूटनचा तिसरा नियम

या नियमानुसार प्रत्येक क्रियेच्या उलट किंवा समान एक क्रिया असते. म्हणजेच जर एखाद्या वस्तूवर बळ लावले गेले तर ती वस्तूही त्या बळाच्या विपरित बळ लावते. या क्रियेला प्रतिक्रिया म्हटले जाते. आणि या नियमाला क्रिया प्रतिक्रियेचा नियम म्हटले जाते.


तर मित्रांनो ही होती महान शास्त्रज्ञ सर न्यूटन यांच्याबद्दल मराठी माहिती. आशा करतो की isaac newton marathi information तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. ही माहिती आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने