झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती | zashichi rani information in marathi

 Zashichi rani in Marathi: भारत देश ही वीरांची भूमी आहे. ज्या प्रमाणे येथील महान राजांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर इतिहासात नाव अमर केले त्याच पद्धतीने भारतातील महिला पराक्रमाच्या देखील अनेक गोष्टी आपल्या इतिहासात प्रचलित आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई या अश्याच पराक्रमी महीलांपैकी एक होत्या. आजच्या या लेखात आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती मिळवणार आहोत. 


एका इंग्रज अधिकाऱ्याने लक्ष्मीबाई बद्दल लिहिताना म्हटले होते की "त्या अतिशय अदभुत आणि बहादूर स्त्री होत्या. परंतु आमचे नशीब चांगले होते की त्यांच्या कडे त्यांचाच सारखा विचार करणारी लोक नव्हती. आजच्या या लेखात आपण zashichi rani information in marathi मिळवणार आहोत. तर चला सुरू करुया…झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती | zashichi rani information in marathi

लक्ष्मीबाई प्रारंभिक जीवन

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्म 19 नोव्हेंबर 1828 ते 1835 या दरम्यान उत्तर प्रदेश मधील काशी येथे झाला. त्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात जन्मल्या त्यांचे जन्म नाव मनिकर्णिका होते, कुटुंबातील सर्वजण तिला मनु म्हणून संबोधित असत. मनूच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे तर आईचे नाव भागीरथी बाई होते. मोरोपंत तांबे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. चार वर्षाच्या वयात मनु च्या आईचा मृत्यू झाला. यानंतर त्या आपला अत्याधिक वेळ वडिलांसोबत पेशवा दरबारात घालवू लागल्या.


मोरोपंत यांनी मनुला प्रत्येक कार्यात स्वतंत्रता दिली होती. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासोबत आत्मरक्षा, घोडस्वारी, निशानेबाजी, घेराव इत्यादीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी तात्या टोपे सारख्या सहकार्‍यांसोबत मिळून आपली एक सेनाही तयार केली.


राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह

14 वर्षाच्या वयात सन 1842 मध्ये मनु चे लग्न झाशीचे महाराज गंगाधर राव नेवाळकर यांच्याशी करण्यात आले. तेव्हा तिचे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशी मधील प्रजेत लक्ष्मीबाई विषयी विशेष प्रेम निर्माण झाले. परंतु दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधर राव यांना पसंद नव्हते. आपल्याला मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी व्यायाम, कसरत, घोडस्वारी, तलवारबाजी इत्यादी मध्ये घालवला.


लग्नाच्या काही वर्षांनी सन 1851 मध्ये गंगाधर राव व लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला. परंतु चार महिन्यातच या मुलाचा मृत्यू झाला. असे म्हटले जाते की पुत्राच्या मृत्यूने महाराज गंगाधर खूप दुःखी झाले. सन 1853 मध्ये ते आजारी पडले. तेव्हा त्यांनी आपले भाऊ वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेतले. या मुलाचे नाव दामोदर ठेवण्यात आले. 21 नोव्हेंबर 1853 मध्ये गंगाधर रावांचे निधन झाले.


इंग्रजांशी संघर्ष

गंगाधर रावांच्या मृत्यूनंतर लक्ष्मीबाईंनी झाशीची कार्यभार स्वीकारला. 18 वर्षाच्या वयात त्या झाशीच्या उत्तराधिकारी बनल्या. त्या काळी भारताचा गवर्नर लॉर्ड डलहौसी होता. त्या काळात नियम होता की कोणत्याही राज्याचा उत्तराधिकारी राजाचा मुलगाच राहील. जर एखाद्या राज्याला मुलगा नसेल तर ते राज्य ईस्ट इंडिया कंपनी मध्ये मिळून जाईल. व राजाच्या कुटुंबाला आर्थिक खर्चांसाठी पेन्शन देण्यात येईल.


लॉर्ड डलहौसी ने गंगाधर रावांच्या मृत्यूचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने झाशीची राणी व गंगाधर राव यांचे स्वतःचे पुत्र नाही असे म्हणून झाशी संस्थानाला खालसा करण्यास सांगितले. 13 मार्च 1854 रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला, त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्या वेळी स्वाभिमानी राणीने "मी माझी झाशी देणार नाही", असे स्फूर्तीदायक उद्गार काढले.


लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश शासनाविरुद्ध लंडन मध्ये खटला दाखल केला. परंतु इंग्रजांनी त्यांच्या खटल्याला खारीज केले व सोबत आदेश दिला की महाराणी ने झाशीच्या किल्ल्याला सोडून राणी महालात जाऊन राहावे. त्यांना दरमहा 60,000/- रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही लक्ष्मीबाई झाशी न देण्याच्या निर्णयावर ठाम होत्या.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना काही काळ किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले राणी लक्ष्मीबाई यांना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले.


इ.स. 1857 चे स्वातंत्र्यसमर

इ.स. 1857 चा उठाव हा संपूर्ण हिंदुस्तानात झाला. या विद्रोहाची सुरुवात मेरठ मध्ये झाली. ज्या मागील कारण होते की बंदुकांच्या नव्या गोळ्यांवर डुक्कर व गाईचे मास लावण्यात आले होते. यामुळे हिंदूच्या धार्मिक भावनांना ठेस पोहचली. परिणामी हा विद्रोह देशभरात पसरला, झाशी मधील केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या विद्रोहाला दाबण्यासाठी इंग्रजांनी तात्पुरती झाशी राणी लक्ष्मीबाई च्या हाती सोडण्याचा निर्णय घेतला. 22 जुलै 1857 ला लक्ष्मीबाई यांना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेतली.


इंग्रजांचे झाशीवर आक्रमण 

राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि त्यांचा खजिनाही रिकामा होता. प्रजे मध्ये असंतोष, असुरक्षितता व भविष्याबद्दलची भीती निर्माण झालेली होती. लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून अधिकाराची पदे दिली. 1857 मध्ये झाशीच्या शेजारील राज्यांनी झाशिवर आक्रमण केले. राणी लक्ष्मीबाईना शेजारी राज्य ओरछा आणि दतिया च्या राजाशी युद्ध करावे लागले.


याच्या काही काळानंतर 21 मार्च 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यु रोज याने उत्तम प्रतीचे सेनानी आणि कर्तबगार राजकारणी यांच्या मदतीने झाशीवर आक्रमण केले. झाशिकडून तात्या टोपे यांच्या नेतृत्वाखाली 20,000 सैनिकांनी युद्ध केले. जवळपास 2 हप्ते चाललेल्या या युद्धात इंग्रजांची विजय झाली. इंग्रजांनी किल्ल्याचे द्वार तोडून आत प्रवेश केला. संपूर्ण राज्यात लूट पाट सुरू झाली. राणी लक्ष्मीबाई कश्यातरी आपला मुलगा दामोदर याला वाचवून बाहेर पडाल्या.


काल्पी येथील युद्ध

झाशी येथील युद्धात हार झाल्यानंतर लक्ष्मीबाई ने तात्या टोपे व आपल्या दलासोबत जवळ पास 24 तासाच्या प्रवासात 102 किलोमीटर अंतर पार केले. व त्या काल्पी येथे येऊन पोहचल्या. तेथील पेशव्याने परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना शरण दिली व आपले सैन्य बलही उपलब्ध करून दिले.


22 मे 1858 मध्ये इंग्रज अधिकारी सर ह्यु रोज याने काल्पी वर आक्रमण केले. तेव्हा राणी लक्ष्मीबाई ने अदभुत वीरता दाखवत त्यांना हरवले. काही काळानंतर सर ह्यु रोज ने पुन्हा एकदा आक्रमण केले परंतु या वेळी लक्ष्मीबाई ला पराभवाचा सामना करावा लागला.


युद्धात हरल्यानंतर लक्ष्मीबाई ने आपल्या प्रमुख सैनिकांना ग्वालियर वर अधिकार प्राप्त करण्यास सांगितला. तात्या टोपे व इतर प्रमुख सैनिकांना एकत्रित करून लक्ष्मीबाई ने ग्वालियर आक्रमण केले. ग्वालियर च्या राजाला पराजित करून हे राज्य काल्पी च्या पेशव्याच्या स्वाधीन केले.


राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू 

१८ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ याने सैन्यासह ग्वालियर वर हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. परंतु काहीही केल्या इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणार नव्हते. त्याच वेळी इंग्रजांची नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. लक्ष्मीबाईंचा घोडा काही केल्या शेवटच्या युद्धात पुढे सरकत नव्हता. 


या युद्धात इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. शेवटी त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.


READ HERE > झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी भाषण 


तर मित्रहो ही होती zashichi rani information in marathi अर्थात झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती आशा आहे की ही मराठी माहिती तुम्हास नक्कीच उपयुक्त ठरली असेल. राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन चरित्र तुम्हास कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या