कोरोना पीड़ित ची आत्मकथा मराठी निबंध | autobiography of corona victim in marathi

कोरोना पीडित ची आत्मकथा मराठी निबंध | corona pidit ki atmakatha in marathi

मित्रांनो कोरोनाव्हायरस ही महामारी भारतासह संपूर्ण जगात धुमाकूळ माजवीत आहे. योग्य काळजी आणि योग्य वेळीच उपचार केल्यास कोरोना ला हरवणे फार सोपे आहे. कोरोना वायरस ची माहिती कोरोना एक महामारी येथे आपण वाचू शकतात. 


जच्या या लेखात आम्ही एका कोरोना पीडित ची आत्मकथा मराठी निबंध देत आहोत. याला तुम्ही एका कोरोना योद्धाची आत्मकथा मराठी असेही म्हणू शकतात. तर चला निबंधला सुरूवात करूया...


कोरोना पीड़ित ची आत्मकथा मराठी निबंध

कोरोना ग्रस्त / पीड़ित ची आत्मकथा | Corona grast chi atmakatha 

माझे नाव नमन चव्हाण आहे. मी एका खाजगी बँकेत कामाला आहे. आजच्या जवळपास 4 महिन्याआधी मी covid 19 ने संक्रमित झालो होतो. या कठीण रोगाने मी कसा संक्रमित झालो आणि कसा या रोगातून बाहेर आलो याबद्दलची माझी आत्मकथा मी आपणास सांगणार आहे. त्या वेळी हा व्हायरस भारतात फार जास्त प्रमाणात पसरला नव्हता. देशभरात एका दिवसात फक्त 100-200 रुग्ण आढळत होते. 


अश्यातच एके दिवशी सकाळी मी झोपेतून उठलो तर संपूर्ण शरीर दुखत होते. थोडाफार ताप देखील जाणवत होता. संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला होता. परंतु बँकेत कामाला असल्याने मला कामावर जाणे भागच होते. मी उठलो अंघोळ न करता तयार होऊन कामावर गेलो. चेहऱ्याला मास्क आणि सोशल डिस्टन्सींग ची सवय तर झालीच होती. संध्याकाळ होत होत ताप आणखीनच वाढला. शेवटी घरी जाण्याआधी मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटून जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी काम संपल्यावर मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर साहेबांनी मला ताप कमी करण्यासाठी काही औषधे दिली. 


घरी आल्यावर जेवण करून औषधे वगैरे घेऊन मी झोपी गेलो. परंतु औषधांच्या माझ्या शरीरावर काहीही उपयोग झाला नाही. सकाळी तब्येत एवढी खराब झाली की माझ्याकडून उठलेच जात नव्हते. शरीर तापाने पूर्ण गरम झाले होते यासोबत सर्दी-खोकला देखील जाणवत होता. कुटुंबातील सदस्यांनी मला रिक्षा द्वारे सरकारी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले. मी खूप घाबरलेलो होतो. काही वेळाने टेस्ट चे रिपोर्ट आले, मी कोरोना पॉझीटीव्ह होतो. आता तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. भीतीने मी थरथरू लागलो. मला वाटायला लागले की आता माझ्या मृत्यूची वेळ आली आहे. कारण त्या वेळी प्रसारमाध्यम व अनेक लोकांनी कोरोना ला येवढे वाढवून सांगितले होते की 'कोरोना म्हणजे मृत्यू' एवढेच मला माहित होते. 


यानंतर मला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये वेगळे करून ठेवण्यात आले. दवाखान्यात माझ्या आजूबाजूला अनेक पेशंट होते. त्यापैकी काहींची स्थिती माझ्यापेक्षा अत्यंत बिकट तर काही माझ्यापेक्षा चांगल्या स्थितीत होते. मला ऍडमिट केल्याच्या पहिल्याच दिवशी वार्डमधील एक पेशंट चा मृत्यू झाला. त्यांना पाहून तर मी अधिकच भ्यालो. परंतु स्वतःला धीर देत राहिलो. डॉक्टर साहेब दिवसातून दोन वेळा येऊन सर्व पेशंटची तब्येत पाहत असत. याशिवाय दवाखान्यातील कर्मचारी, वार्ड बॉय आणि नर्सेस 24 तास सर्व पेशंटची काळजी घेत असत. त्यांच्या या मदतनीस स्वभावामुळे मला खूप धीर मिळाला. 


माझ्या बेड समोर एक वृद्ध गृहस्थ होते. ते देखील कोरोना ने संक्रमित होते. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर पुसटशी देखील मृत्यूची भीती नव्हती. त्यांना इतके प्रसन्न पाहून मला खूप आश्चर्य वाटायचे. दोन दिवसांनंतर जेव्हा मला आधीपेक्षा बरे वाटायला लागले तेव्हा मी त्यांच्याजवळ गेले. व त्यांना त्यांच्या प्रसन्नतेचे कारण विचारले. तेव्हा त्या बाबांनी मला सांगितले. बेटा जीवन मृत्यू तर परमेश्वराच्या हातात आहे. विनाकारण चिंता करून आपण आपल्या आरोग्य खराब करीत असतो. म्हणून मी चिंता करणे सोडून जे क्षण मला मिळाले आहेत त्यांना आनंदाने जगतो आणि नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करतो. 


त्या आजोबांचे हे उत्तर ऐकून माझ्यात खूप धैर्य निर्माण झाले. मी विचार करू लागलो की जर माझ्यापेक्षा किती तरी पटीने कमी रोग प्रतिरोधक क्षमता असलेले हे गृहस्थ इतके आनंदी आहेत तर मी तर अजून तरुण व धष्टपुष्ट आहे. मला कोणत्याही रोगाला अजिबात घाबरण्याचे कारण नाही. यानंतर मी दररोज सकाळी त्या आजोबांसोबत एक्सरसाइज व योगासन करू लागले. काही दिवसांनी त्या आजोबांचा घरी जाण्याचा दिवस आला. मी खूप आनंदी होतो. आजोबा अतिशय निरोगीपणे आपल्या घरी गेले. याच्या दोन दिवसानंतर माझे देखील 15 दिवस पूर्ण झाले व माझी देखील सुट्टी करण्यात आली. 


यानंतर मी व माझे संपूर्ण कुटुंब घरी आलो. आमच्या कॉलनीतील लोकांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले. त्यांचे हे प्रेम पाहून आमचे डोळे भरून आले. मला खूप आनंद होता की मी कोरोना सारख्या रोगाला हरवून घरी परतलो होतो. हे सर्व शक्य झाले फक्त आणि फक्त माझ्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे. यानंतर एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला की आयुष्यात कितीही मोठी संकटे असो नेहमी सकारात्मक राहावे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवावा. आज जे काही लोक कोरोना शी लढत असतील त्यांना माझा सल्ला आहे की घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त स्वतःवर आणि डॉक्टरांवर विश्वास असू द्या. एक दिवस तुम्हीदेखील पूर्वीप्रमाणे स्वस्थ आणि निरोगी व्हाल.

--समाप्त--


तर मित्रहो ह्या लेखात आपण कोरोना पीड़ित ची आत्मकथा या विषयावरील मराठी निबंध पहिला. आम्ही आशा करतो की ही कोरोना ग्रस्त ची आत्मकथा आपणास आवडली असेल. ह्या निबंधाला आपल्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा धन्यवाद... 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने