कोरोनाव्हायरस ची आत्मकथा, मनोगत मराठी निबंध | autobiography of coronavirus in marathi

कोरोनाव्हायरस ची आत्मकथा मराठी निबंध | autobiography of coronavirus in marathi

आज covid 19 ही महामारी संपूर्ण जगात पसरलेली महामारी आहे. मागील काही महिन्यापासून भारतात या महामारीचे विक्राळ रूप पाहावयास मिळत आहे व याला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण देश आणि शासन कार्य करीत आहे. 

परंतु मित्रांनो बऱ्याच संशोधकांचे मनाने आहे की सर्वात आधी कोरोना वायरस हा चीन मध्ये वटवाघूळ द्वारे पसरला होता. व तेथूनच त्याचा प्रसार मनुष्यामध्ये होऊ लागला. आजच्या या लेखात अशी कल्पना करण्यात आली हे की कोरोना हा वायरस आपले आत्मकथन सांगत आहे. म्हणजेच आज येथे कोरोनाव्हायरस ची आत्मकथा देण्यात आली आहे. तर चला coronavirus chi atmakatha सुरू करूया..


coronavirus chi atmakatha in marathi

कोरोनाव्हायरस ची आत्मकथा | coronavirus chi atmakatha marathi

(400 शब्द)

नमस्कार मानवा, मी कोरोनाव्हायरस बोलत आहे. तुम्ही विचार करीत असाल की मी तुमच्या जीवनात संकट टाकण्यासाठी का बर आलो असेल..? परंतु मी आधीच तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की मी वटवाघुळ आणि माझ्या इतर वायरस बांधवांसोबत कोणालाही त्रास न देता निसर्गात आरामाने राहत होतो. 


तुमच्या मधीलच काही लोकांनी मला मानव समाजात प्रवेश करण्यास मजबूर केले. मानवाने पर्यावरणावर इतका दबाव टाकला की मी ज्या वटवाघुळांसोबत राहायचो त्यांचेच अस्तित्व धोक्यात आले. तुम्ही जंगल कापले, हवा, पाणी, माती सर्वकाही नष्ट केले. मी ज्या पक्ष्यांवर राहायचो त्यांना तुम्ही नष्ट केले. म्हणून दुर्भाग्याने मला राहण्यासाठी दुसरा जीव शोधावा लागला. आणि तो जीव तुम्ही म्हणजेच मनुष्य होय. 


तुम्हाला काय वाटते ही पृथ्वी फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही असा विचार करीत असाल तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात जगत आहात. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की संपूर्ण धरतीवर 75 लाख पेक्षा जास्त जीवजंतू राहतात. व या सर्वांचा पृथ्वीवरील अधिकार तेवढाच आहे जेवढा तुमचा आहे. पृथ्वीवरील संसाधन जसे हवा, प्रकाश, पाणी इत्यादी सर्वांवर सर्व जीवांचा अधिकार सारखाच आहे. 


वटवाघूळ नंतर तुम्हाला माझे घर बनवितांना मला स्वतः मध्ये अनेक बदल करावे लागले. मी आधीच्या व्हायरस पेक्षा थोडा चतुर आहे. मी माझे रूप बदलवीत असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्यावर मी सर्वात आधी त्याच्या गळ्यात थांबतो. ज्यामुळे त्या व्यक्तीला गळ्यात दुखणे आणि खोकला येणे यासारखे लक्षण निर्माण होतात. परंतु बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात ज्याच्या फायदा घेऊन मी गळ्यातच आठवडाभर थांबून माझी संख्या वाढवू लागतो. यानंतर मी पूर्ण शक्तीने तुमच्या फुफ्फुसांवर आक्रमण करतो. 


जेव्हा माझ्याने संक्रमित असलेला एखादा व्यक्ती खोकलतो अथवा शिंक देतो तेव्हा मी त्याच्या तोंडाद्वारे त्याच्या समोर असलेल्या लोकांमध्ये प्रवेश करतो. मी लवकर मरत नाही. कोणत्याही वस्तूवर अथवा जागेवर मी दीर्घकाळापर्यंत जिवंत राहू शकतो. आणि म्हणूनच आज माझ्यामुळे लाखोंच्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत आणि हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. आज जगभरातील देशांनी मला मारण्यासाठी व्हॅक्सिन तयार केल्या आहेत. अनेक लोक सॅनिटायझर आणि मास्क लावून स्वतःचे संरक्षण करतात. परंतु काही लोक इतके निष्काळजी आहेत की त्यांचे कृत्य पाहून मला त्यांच्याकडे जावेच लागते. 


माझे अस्तित्व मनुष्याने पर्यावरणावर टाकलेल्या दबावामुळे निर्माण झाले आहे. जर मनुष्य अजूनही सुधरला नाही तर एक दिवस असा येईल जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर माझे राज्य राहील. मला माहित आहे की माझे असे बोलल्याने आपणास दुःख होईल. परंतु मी तरी काय करू शकतो जर तुम्ही स्वतः मला पंगत देत आहात तर मी मागे राहू शकत नाही. जोपर्यंत मनुष्य आपली चूक सुधारून निसर्गाला पूर्ववत करण्यासाठी कार्य करीत नाही, तो पर्यंत माझी ही विनाशलीला सुरूच राहील.

--समाप्त--


तर मित्रांनो आशा पद्धतीने आज आपण कोरोनाव्हायरस ची आत्मकथा | coronavirus chi atmakatha in marathi हा निबंध अभ्यासला. आशा करतो की आपणास हा निबंध खूप आवडला असेल. निबंधात काही चुका तसेच निबंधाविषयीचे आपले मत आम्हास कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...


अधिक वाचा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने