वदनी कवळ घेता मराठी श्लोक व अर्थ | vadani kaval gheta lyrics and meaning in Marathi

वदनी कवळ घेता श्लोक | vadani kaval gheta | anna he purnabramha in marathi

मंडळी आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये अन्नाला 'ब्रम्ह' अर्थात देवाचे स्थान दिले गेले आहे. आधीच्या काळी.. फार पूर्वी नव्हे तर आपल्या बालपणातच आई वडील, वडीलधारी मंडळी तसेच शाळेत शिक्षक आपल्याला जेवणाआधी काही श्लोक बोलायला सांगायचे. आजची नवी पिढी आपल्या मुलांना हे श्लोक शिकवायला विसरते, किबहुना त्यांनाच हे श्लोक येत नाहीत किंवा आठवत नाहीत, म्हणून ह्या श्लोकांचे महत्व कमी झाले आहे असे अजिबात नाही. 

आजच्या या लेखात जेवणापूर्वी म्हणायचे श्लोक (वदनी कवळ घेता) व ह्या श्लोकांचा मराठी भाषेतील अर्थ देण्यात आला आहे.



वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे - vadani kaval gheta lyrics in Marathi

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।
हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥

|| जय जय रघुवीर समर्थ ||


वदनी कवळ घेता श्लोक अर्थ - Vadani Kaval Gheta Meaning in Marathi

अर्थ: 

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।

तोंडात घास घेताना श्री हरीचें नाव घ्या, भगवंताचे नाव घेतले असता सहजच एक यज्ञ (पवित्र कार्य) घडत असते. म्हणजेच अन्न सेवन हा केवळ शारीरिक कृती नसून, तो एक प्रकारचा यज्ञकर्म आहे, जो आपल्या जीवनाला उर्जित करतो.

जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥

अन्न हे ब्रह्म, म्हणजेच साक्षात परमेश्वर आहे. जीवन चालवण्यासाठी अन्न अत्यावश्यक आहे. त्यामुळे अन्नाला पवित्र मानून त्याचा आदर करावा.

जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही तर ते एक यज्ञकर्म आहे. याचा अर्थ अन्न ग्रहण करतांना फक्त पोट भरण्यासाठी ते खाऊ नये तर शरीरात असणाऱ्या भगवंताला, आत्म्याला तृप्त करण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत.


जनीं भोजनी नाम वाचे वदावे ।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे ।

समाजातील लोकांशी सवांद साधतांना तसेच जेवण करीत असतांना जिभेवर भगवंताचे नाव ठेवावे.

भगवंताचे नाव उच्चार करतांना अत्यंत आदराने व स्पष्ट आवाजाने उच्चारावे. श्रद्धेने हृदयातून परमेश्वर नावाचा जप झाला पाहिजे.   

हरीचिंतने अन्न सेवित जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥२॥

हरीच्या चिंतानाने अन्न सेवन करीत जावे. असे केल्याने श्रीहरींच्या कायमच्या स्वभावाप्रमाणे तुमच्यावर त्यांची त्यांची कृपादृष्टी राहते.


तर मित्रांनो आशा पद्धतीने ह्या लेखात आम्ही आपल्यासोबत vadani kaval gheta हे रामदास स्वामी यांचे श्लोक अर्थासहित मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. व आपण देखील नियमीत जेवणाआधी हे श्लोक म्हणण्याचा निश्चय कराल, सोबतच आपल्या लहान मुलांना देखील हे श्लोक शिकवाल. जेणेकरून त्यांना देखील लहानपणा पासून योग्य संस्कार आणि ज्ञान मिळेल. धन्यवाद


अधिक वाचा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

4 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने