कावळ्याची संपूर्ण मराठी माहिती | crow information in marathi

आजच्या लेखात कावळ्याची मराठी माहिती crow information in marathi देण्यात आली आहे. तर चला सुरू करुया..


कावळा हा पक्षी जवळपास संपूर्ण जगात आढळतो. त्याची मुख्य ओळख त्याचा कर्कश आवाज आणि काळा रंग आहे. कावळ्याचा आवाज कावकाव असा असतो. इतर पक्ष्यांपेक्षा वेगवेगळे रूप असल्याने कावळा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आज येथे आपण कावळ्याची माहिती (crow information in marathi) मिळवणार आहोत. 


kavla chi mahiti

कावळ्याची माहिती | crow information in marathi

  • कावळा कोकिळा प्रमाणे दिसणारा काळ्या रंगाचा बुद्धिमान पक्षी आहे.
  • आकाशात उडणाऱ्या सर्व पक्षांमध्ये कावळ्याला सर्वाधिक बुद्धिमान मानले जाते.
  • कावळ्याचा मेंदू इतर पक्ष्यांपेक्षा अधिक विकसित असतो.
  • कावळा अंटार्टिका खंडाला सोडून संपूर्ण जगभरात आढळतो.
  • कावळ्याचे वैज्ञानिक नाव कर्वस ब्राच्यरहैनचोस (Corvus brachyrhynchos) असे आहे.
  • संपूर्ण जगात 40 पेक्षा जास्त कावळ्यांच्या प्रजाती आढळतात.
  • सामान्य कावळ्यांचा जीवन कालावधी 18 ते 20 वर्षांचा असतो.
  • कावळ्याचा आवाज कर्कश आणि कडू असतो. तो नेहमी काव काव असा आवाज काढतो.
  • कावळ्याची लांबी 11.5 फूट पर्यंत असते. त्याचे वजन 300 ग्राम ते 2 किलो पर्यंत असू शकते.
  • जगातील सर्वात लहान कावळा मेक्सिको ह्या देशात आढळतो त्याचे वजन फक्त 40 ग्रॅम आहे.
  • जगातील सर्वात मोठा कावळा इथोपिया मध्ये आढळतो त्याची लांबी 65 सेंटी मीटर पर्यंत आणि वजन दीड किलोपर्यंत असते.
  • भारतात श्राद्ध महिन्यात कावळ्यांची पूजा केली जाते.
  • कावळा पर्यावरणातील कीटक आणि रोग पसरविणाऱ्या जीवजंतूंना खाऊन पर्यावरण शुद्ध करतो. याशिवाय कावळे मेलेल्या प्राण्याचे मांस देखील खातात.
  • कावळा हा समूहात राहणारा पक्षी आहे. व जेव्हाही त्याला संकट वाटते तेव्हा तो काव काव करून आपल्या साथीदारांना सावध करतो. 
  • भारतात अशी मान्यता आहे की जर घरावर कावळा बसून कावकाव करू लागला तर लवकरच घरी पाहुणे येणार आहेत.
  • कावळ्याचे निवास्थान झाडावर असते. तो झाडावर घरटे करून राहतो. नर कावळा हा आयुष्यभर मादी कावळ्या सोबत राहतो. व दोन्ही जन मिळून अंड्यांचे रक्षण करतात.
  • कावळा आणि कोकिळा चे अंडे सारखेच असतात. म्हणून जेव्हा मादी कावळा अंडे देते तेव्हा कोकिळा ही तिचे अंडे कावळ्यांच्या अंड्यामध्ये मिसळून देते. व अशापद्धतीने कोकिळेचे पिल्लू मादी कावळा मोठे करते. 
  • कावळा मनुष्याचा चेहरा दीर्घकाळापर्यंत लक्षात ठेवू शकतो. 
  • कावळा आपले अन्न कधीही वाया घालत नाही. अन्नाचे लहान मोठे दाणे तो भविष्यासाठी सांभाळून ठेवतो.


तर मित्रांनो ही होती कावळ्याची माहिती. आशा करतो की ही crow information in marathi आपणास उपयोगी ठरली असेल. आपले काही प्रश्न असतील तर कमेन्ट करून नक्की विचारा. व इतर पक्ष्यांची मराठी माहिती वाचण्यासाठी पुढील लिंक्स पहा. धन्यवाद..


अधिक वाचा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने