जगातील सात आश्चर्य कोणती आहेत ? सात आश्चर्यांची नावे व इतिहास | seven wonders of the world in marathi
7 wonders of the world in marathi : जगभरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची सुंदरता आणि बनावट अद्भुत आणि अकल्पनीय आहे. या गोष्टींचा इतिहास देखील रोमांच उभे करणारा असतो. जगातील सात आश्चर्य ही देखील अशीच अद्भुत कलाकृतींमध्ये सामील आहेत. भारतात असलेले ताज महाल देखील जगातील सात आश्चर्यांमध्ये सामील करण्यात आलेले आहे.
आजच्या लेखात आपण जगभरातील सात आश्चर्य कोणती आहेत व त्यांचा इतिहास काय आहे - 7 wonders of the world in marathi याबद्दलची माहिती सात आश्चर्य यांच्या फोटो सहित मिळवणार आहोत.
जगातील सात आश्चर्य
जगातील सात आश्चर्य पुढीलप्रमाणे आहेत -
- रोमन कोलोजियम
- चीनची भिंत
- चीचेन इत्जा
- माचू पिचू
- ख्रिस्त द रिडीमर
- ताज महल
- पेट्रा
जगातील सात आश्चर्य इतिहास | 7 wonders of the world in marathi
रोमन कोलोजियम (The Roman Colosseum)
रोमन कोलोजियम (Roman Colosseum) इटली देशातील रोम शहराच्या मध्यात स्थित आहे. हे एक विशाल स्टेडियम आहे जेथे प्राचीन काळामध्ये प्राण्यांची लढाई, कुस्ती, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन केले जायचे. याचे निर्माण त्याकाळातील शासक वेस्पियन ने 70 ते 72 ईसा पूर्व केले होते.
रोमन कोलोजियम एक अंडाकार आकाराचे वास्तू आहे. याच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येईल की याला फक्त रेती आणि काँक्रिट ने बनवण्यात आले आहे व यामध्ये एका वेळी 50 हजार लोक एकत्रित बसू शकतात. नैसर्गिक आपत्ती आणि भूकंप मुळे आज रोमन कोलोजियम काही प्रमाणात नष्ट झाले आहे परंतु त्याची विशालता आणि भव्यता आजही अमर आहे.
चीनची भिंत
चीनची भिंत जगभरात The Great Wall of China म्हणून ओळखली जाते. या भिंतीचे निर्माण 7 ते 16 व्या शतकाच्या दरम्यान करण्यात आले होते. या भव्य भिंतीच्या निर्माणासाठी माती, दगड, विटा, लाकूड इत्यादींचा वापर करण्यात आला होता. उत्तरेकडील आक्रमणकारी रोखण्याकरिता चीनमधील वेगवेगळ्या राज्यांच्या शासका द्वारे या भिंतीचे निर्माण करण्यात आले होते.
ही भिंत एवढी विशाल आहे की तिला अंतरिक्ष मधून देखील पाहिले जाऊ शकते. या भिंतीची लांबी 6400 किलोमीटर व उंची 35 फूट आहे. आणि या भिंतीवर 10-15 लोक आरामशीर चालतील एवढी ती चौडी आहे. सांगितले जाते की या भिंतीचे निर्माण करण्यासाठी 20 ते 30 लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन लावले होते.
चीचेन इत्जा
जगातील सात आश्चर्य मध्ये चीचेन इत्जा या मेक्सिकोमधील अती प्राचीन आणि विश्व प्रसिद्ध मयान मंदिराचा समावेश आहे. याचे निर्माण 600 ईसा पूर्व करण्यात आले होते. चीचेन इत्जा मेक्सिकोतील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर पाच किलोमीटर अंतरात पसरलेले आहे. याचा आकार पिरॅमिड प्रमाणे आहे. व या मंदिराची उंची 79 फूट आहे. मंदिरावर चढण्याकरिता 365 पायऱ्या आहेत, ज्या वर्षातील 365 दिवसांचे प्रतीक आहेत.
चीचेन इत्जा मंदिराची सुंदरता, भव्यता, सुंदर वास्तुकला, पवित्र कुंडे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात व यामुळेच या मंदिराला जगातील सात आश्चर्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे.
माचू पिचू
माचू पिचू दक्षिण अमेरिका च्या पेरू मध्ये स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर एका उंच व लहान टेकडीवर स्थित आहे. समुद्र तळापासून 2430 मीटर उंचीवर असलेल्या माचू पिचू शहरात 15 शतकात इंका जातीचे लोक राहायचे. इतक्या उंचीवर शहर कसे बनले आणि येवढ्या उंचीवर लोक कसे राहायचे ही याविषयीची अद्भुत बाब आहे.
या शहराचे निर्माण राजा पचाकुती ने केले होते. परंतु याच्या 100 वर्षांनंतर स्पेन ने या शहरावर विजय मिळवली. व विजयानंतर शहराला असेच सोडून निघून गेलेत. यानंतर येथील सभ्यता हळू नष्ट झाली. इसवी सन 1911 मध्ये अमेरिकेचे प्रसिद्ध इतिहासकार हिरम बिंघम यांनी या शहराचा शोध लावला आणि हे सुंदर व ऐतिहासिक शहर जगाच्या समोर आणले.
ख्रिस्त द रिडीमर
Christ the Redeemer म्हणून ओळखले जाणारे हे आश्चर्य परमेश्वर येशू ख्रिस्त यांची एक प्रतिमा आहे. जगातील सात आश्चर्य मध्ये असलेली ही प्रतिमा जगातील सर्वाधिक उंचीच्या प्रतिमामध्ये सामील आहे. ब्राझील देशातील रिओ दी जनेरिओ या शहरात स्थापित असलेली येशू ख्रिस्ताची प्रतिमा 38 मीटर उंच व 30 मीटर रुंद आहे.
या मूर्तीचे वजन 635 टन मानले जाते. येशू ख्रिस्तांचा या प्रतिमेचे निर्माण 1922 ते 1931 यादरम्यान करण्यात आले होते. फ्रेंच चे महान मूर्तीकार लेनदोवस्की यांनी या मूर्तीला तयार केले होते. आज ही मूर्ती रिओ शहराच्या सातशे मीटर उंच कोरकोवाडो पर्वतावर स्थित आहे.
ताज महाल
भारताची शान असलेले ताजमहल आग्रा शहरात स्थित आहे. ताजमहाल ला जगातील सात आश्चर्यामध्ये सामील करण्यात आलेले आहे. ताजमहालचे निर्माण मोगल बादशहा शहाजहान याने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या आठवणीत इसवी सन 1632 मध्ये बनवले होते. ताजमहल पांढऱ्या संगमरवर पासून बनवलेले एक महाल आहे.
ताजमहाल ला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. याच्या आजूबाजूला बाग-बगीचा व पाण्याची सुंदर बारी आहे. ताजमहल सारखी कलाकृती जगात कुठेही पहावयास मिळणार नाही. ताजमहल बनवण्यासाठी जवळपास 15 वर्षांचा कालावधी लागला. व असे मानले जाते की ताज महाल चे निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर मुघल बादशाह शाहजहान याने बांधकाम करणाऱ्या सर्व मजुरांचे हात कापून टाकले.
एका मतानुसार असेही मानले जाते की ताजमहाल हे ताज महाल नसून भगवान शंकराचे तेजोमहाल आहे. भगवान शंकराच्या या मंदिराला वेगळा आकार देऊन शहाजहान याने मकबरा बनवले. परंतु काहीही असले तरी ताजमहल भारताची शान आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक याचे सौंदर्य अनुभवण्याकरिता जगभरातून भारतात येतात.
पेट्रा
पेट्रा दक्षिण जॉर्डन मध्ये स्थित एक इतिहासिक नगर आहे. आपल्या अद्भुत कलाकृतींमुळे हे शहर जगातील सात आश्चर्यांमध्ये (7 wonders of the world in marathi) सामील आहे. या शहरात मोठमोठी चट्टान कापून त्यांच्यापासून कलाकृती बनवण्यात आल्या आहेत. या शहराला रोज (गुलाब) सिटी देखील म्हटले जाते. कारण येथील कापलेले सर्व दगड लाल रंगाचे आहेत.
पेट्रा जॉर्डन मधील मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. येथे दरवर्षी भरपूर पर्यटक येतात. पेटला मधील उंच उंच मंदिरे, तलाव सर्वकाही आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे.
तर मित्रहो ही होती 7 wonders of the world in marathi अर्थात जगातील सात आश्चर्य व त्यांची माहिती आणि इतिहास. ह्या पोस्ट द्वारे आपल्या ज्ञानात वृद्धी नक्कीच झाली असेल अशी आशा आहे. आपणास ही माहिती कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...