आजच्या या लेखात आपण मृत्युंजय कादंबरी मराठी माहिती व मृत्युंजय कादंबरी चा सारांश पाहणार आहोत. ही Mrityunjay book summary & review in Marathi आपणास नक्की आवडेल आणि mrityunjay kadambari विषयी आपल्या मनात अधिकाधिक उत्सुकता निर्माण होईल अशी आशा आहे.
शिवाजी सावंत लिखित कर्णाची अमर गाथा मृत्युंजय 55 वर्षांच्या दीर्घकाळानंतर आजही मराठी व सर्वच पुस्तक प्रेमी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. मृत्युंजय ही कादंबरी महाभारतातील पात्र महापराक्रमी, दानशूर, महारथी कर्णाला समर्पित आहे. या लेखात आपण थोड्या शब्दांमध्ये मृत्युंजय कादंबरी चा सारांश पाहणार आहोत. तर चला सुरू करूया...
मृत्युंजय कादंबरी मराठी माहिती व सारांश
शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरीला इसवी सन 1967 साली प्रकाशित करण्यात आले होते. मृत्युंजय शब्दाचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंत राहणे. महाभारताच्या युद्धात अनेक महारथी धारातीर्थी पडले, परंतु मृत्यूनंतरही जो मृत्युंजय ठरला तो होता महादानशूर कर्ण. कर्णाच्या व्यक्तिरेखेवर आधारित या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठ संस्थेद्वारे 12 वा मूर्तिदेवी पुरस्कार 6 फेब्रुवारी 1996 ला देण्यात आला. याशिवाय देखील महाराष्ट्र शासन व इतर संस्थांद्वारे मृत्युंजय ला अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.
मृत्युंजय ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. सर्वसामान्यांना महाभारतातील खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या मागोवा घेणारी ही कादंबरी आहे या कादंबरीतील बऱ्याच कथा अनेकांना परिचित आहेत. खलनायक म्हणून भासणारा कर्ण प्रत्यक्षात महाभारतातील सर्वात मोठा नायक आहे हे ही कादंबरी पटवून देते. दानशूरपणा कशाला म्हणतात, संयम कसा असावा, मैत्री कशी जोपासावी व शक्तीची घमेंड कशी मोडावी हे सर्व शिकवणारी ही कादंबरी आहे. कर्ण त्याच्या परिवर्तनाच्या वाटेवर तो अमर झाला. त्याने स्वतःला सुतपुत्र मानले जेव्हा त्याला त्याची ओळख कळली तेव्हाही त्याने आपली ओळख सांगितली नाही, ज्याने स्वतःच्या गुरूचा शाप ही वरदान समजून घेतला.
या कादंबरी ला वाचतांना जणू आपणही त्रेतायुगात वावरत आहोत असा भास होऊ लागतो. मृत्युंजय कादंबरी हाती घेतल्यावर कर्णाचे जीवन नव्याने मनात उलगडू लागते. साक्षात इंद्रदेवाला दान देणाऱ्या त्या सूर्य पुत्रसारखा दानविर या धर्तीवर आजवर झाला नाही अन् भविष्यात होणारही नाही. कर्ण ज्याने स्वतःच्या शब्दा साठी आपलं अस्तित्व. दान केले आपले प्रण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले, स्वतःचे वचन पूर्ण केले.
इंद्र देव आणि कर्ण
कर्णाने दिग्विजया दरम्यान जमवलेली सर्व संपत्ती दान म्हणुन देण्याचा सपाटा सुरू केला होता. या दरम्यान एका रात्री साक्षात सूर्यदेव त्याच्या स्वप्नात आले व सूर्य देवाशी त्याचे संभाषण झाले सूर्यदेवाने कर्णाला सांगितले की "उद्या प्रत्यक्ष इंद्र याचक म्हणून तुझ्या द्वारात येणार आहे ! धन, संपत्ती, वस्त्र, गाई यापैकी काही न मागता तो तुझ्याकडून तुझी कवचकुंडले मागणार आहे. परंतु तू त्या कवच कुंडलांचे दान कधीही करू नको. हे दान नाही; हे दास्य ठरणार आहे.
परंतु कर्णाने सूर्याला वंदन करून सांगितले, हे सूर्य देव जर प्रत्यक्ष देवराज इंद्र याचक म्हणून माझ्या द्वाराशी येणार असेल तर अशा या याचकाला शोभणारे कवच कुंडलांचे दान मी अवश्य देईन. व अगदी सूर्य देवाने सांगितल्या प्रमाणेच ज्यावेळी कर्ण नित्यासारखे स्नान, आंहिक आणि अर्ध्यदान आटोपून दानासाठी बसला त्या वेळी कृश शरीराचा ब्राह्मण रुपी इंद्र त्याच्या समोर आला. इंद्राने धन, धनु, धरती, धाम, अश्व, वस्त्र, फुल, पुष्प, सेवक, सेविका यापैकी काहीही न मागता कर्णाच्या कवच कुंडलांचे दान मागून घेतले. कर्णाला सूर्य देवांचे शब्द लक्षात आले.
क्षणाचाही विलंब न करता त्याने सर्रकन कंबरेचे खड्ग मैदानाबाहेर काढले व वृक्षावरची साल काढावी तसे आपल्या हातांनी आपले अभेद्य कवच शरीरापासून अलग केले. अंजिराचे फळ काप्तच आतला रक्तवर्णी गर्भ उघडा पाडवा तसे कर्णाचे मांसल शरीर दिसू लागले. मंद मंद हसत कर्णा ने कवाचासोबत आपल्या कानातील कुंडले देखील कापून देवराज इंद्राच्या समक्ष ठेवली.
कर्णाच्या या दानशूरतेने संतुष्ट आणि प्रभावित झालेल्या इंद्रदेवाने त्याला एका शत्रूला वधू शकणारे वैजयंती अस्त्र भेट म्हणून दिले. "जयतु दानविर कर्ण" करीत आशीर्वाद देऊन ब्राह्मण वेशातील देवेंद्र तेथून निघाले.
कादंबरी चे वैशिष्ठ - Mrityunjay book summary in Marathi
या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे . कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरु द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ?सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती…त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली… केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो.
आजचा तरुण व प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने अवश्य वाचावी अशी हि मराठी साहित्यातील सावंत यांनी लिहिलेली अमर मृत्युंजय कादंबरी आहे. पुढील लिंक ला क्लिक करून अतिशय कमी किमतीत आपण ही कादंबरी खरेदी कररू शकतात. आणि आणखी एक गोष्ट देखील लक्षात ठेवा की पुस्तके प्रत्येक्ष हातात घेऊन वाचण्याची जी मजा आहे की ebook वाचण्यात कधीही येणार नाही. म्हणून आजच पुढील लिंक ला क्लिक करून मरितूनजे ची हार्ड कॉपी बूक करा.
तर मित्रहो आजच्या या लेखात आपण मराठी साहित्यातील प्रसिद्ध कादंबरी मृत्युंजय विषयी ची माहिती प्राप्त केली. आशा आहे की Mrityunjay book summary in Marathi आपणास आवडली असेल. या लेखातील मृत्युंजय कादंबरी मराठी माहिती व मृत्युंजय पुस्तकाचा सारांश कसं वाटला आम्हास कमेन्ट करून नक्की सांगा धन्यवाद