पायलट कसे बनावे मराठी माहिती | Pilot Information in Marathi

Pilot Information in Marathi : प्रत्येकाचे स्वप्न असते की आयुष्यात काहीतरी मोठे करावे यासाठी कोणी इंजिनिअर, कोणी डॉक्टर, कोणी वकील तर काहीजण एक पायलट बनण्याचे स्वप्न पाहत असतात. जर आपणही एक पायलट बनून मोकळ्या आकाशाची सैर करू इच्छिता तर आजचा हा लेख शेवट पर्यंत वाचत रहा. 

आजच्या या लेखात आपण पायलट कसे बनावे - How to become Pilot in Marathi आणि Pilot Information in Marathi याबद्दलची माहिती प्राप्त करणार आहोत.


pilot marathi


पायलट म्हणजे काय ? pilot meaning in marathi

पायलट ला मराठी भाषेत वैमानिक किंवा विमान चालक म्हटले जाते. पायलट चे मुख्य कार्य विमान उडवणे असते. पायलट हा प्रवाश्यांना विमान प्रवासाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे कार्य करतो. पायलट चे अनेक प्रकार असतात काही commercial pilot असतात काही एअर फोर्स तर काही private pilot असतात. जर आपणही एक पायलट बनू इच्छिता तर पायलट कसे बनावे या विषयीची माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.


पायलट कसे बनावे ? How to become Pilot in Marathi

एक चांगला पायलट बनण्यासाठी व पायलट ची नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागेल. पायलट बनण्याचे दोन मार्ग आहेत; एक मिलिटरी च्या अंतर्गत एयरफोर्स पायलट आणि दुसरा आहे कमर्शियल पायलट जसे इंडिगो, एअर इंडिया यासारख्या एअर लाइन्स कंपनीमध्ये काम करण्यासाठी. 

आपण आपल्या इच्छेनुसार यापैकी कोणत्याही क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्राचा पायलट बनण्यासाठी प्रयत्न सुरू करू शकता. आता आपण जाणून घेऊया की पायलट बनण्यासाठी योग्यता (eligibility criteria) काय आहे. 


पायलट बनण्यासाठी योग्यता

  • सर्वात आधी आपण 12 वी पास असायला हवेत. बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हे सब्जेक्ट असायला हवेत. 
  • म्हणजेच इयत्ता 10 वी नंतर 11 वी ला सायन्स स्ट्रीम मध्ये प्रवेश घेऊन आपण आपली 12 वी पूर्ण करू शकतात.
  • 12 वी इयत्तेत आपल्याला कमीतकमी 50% असायला हवेत.
  • पायलट बनण्यासाठी व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • उंची कमीत कमी 5 फूट असायला हवी.
  • वयोमर्यादा 16 ते 32 वर्ष
  • आपणास कोणताही गंभीर रोग अथवा आजार नसावा.
  • डोळ्यांसंबंधी कोणतीही शारीरिक बाधा नको.
  • इंग्लिश communication चांगले असायला हवे. 


पायलट चे प्रकार

पायलट बनण्यासाठी मुखतः दोन मार्ग अथवा दोन प्रकारचे पायलट असतात. 

  1. कमर्शियल पायलट : कमर्शियल पायलट एक असा पायलट असतो जो सर्व प्रकारचे एअरक्राफ्ट पॅसेंजर जेट, कार्गो, चार्टर्ड विमान इत्यादी उडवतो. या प्रकारच्या पायलट च्या खाद्यावर हजारों प्रवाशांची जबाबदारी असते. कमर्शियल पायलट इंडिगो, एअर इंडिया यासारख्या एअर लाइन्स कंपनीमध्ये जॉब मिळवू शकतो. 

  2. एअर फोर्स पायलट : एअर फोर्स पायलट भारतीय सैन्यातील पायलट असतात. एयरफोर्स पायलट ला शत्रूंना धुळीत मिळवणे, मोठ मोठी मिलिटरी मिशनस करणे, आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना वाचवणे, शत्रूवर हल्ला करणे इत्यादी गोष्टींची ट्रेनिंग दिली जाते. एका एअर फोर्स पायलट वर देशाची जबाबदारी असते. या प्रकारच्या पायलट ला भारतीय सैन्यात नोकरी मिळू शकते. 


हे पण वाचा > वकील कसे बनावे ?


पायलट बनण्यासाठी स्टेप्स - How to become Pilot in Marathi

  1. बारावी पास केल्यानंतर एक कमर्शियल पायलट बनण्यासाठी तुम्हाला स्टुडन्ट पायलट लायसन्स (student pilot licence) आणि प्रायव्हेट पायलट लायसेन्स (PPL) ला अप्लाय करावे लागेल, ज्यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये SPL म्हणतात. आणि हे लायसन्स प्राप्त करण्यासाठी तुम्हाला DGCA अर्थात  Directorate General of Civil Aviation, Government of India च्या अंडर मध्ये जे कॉलेजेस आहेत त्या मध्ये admission घ्यावे लागेल. Entrance exam देऊन आपणास कॉलेज ला प्रवेश मिळून जाईल.

  2. यानंतर प्रवेशाआधी तुमचे मेडिकल टेस्ट देखील केले जाते. मेडिकल सर्टिफिकेट, सिक्युरिटी क्लिअरन्स आणि बँकेची गॅरंटी मिळाल्यानंतर आपणास कॉलेज मध्ये admission मिळते. या कोर्स ला जवळपास 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागतो. 

  3. यानंतर तुम्हाला विमान व त्याविषयी चे अनेक विषय जसे एअर रेगुलेशन्स, एव्हिएशन मेट्रोलॉजी, एयर नेव्हिगेशन आणि इंजिन या संबंधी चा अभ्यास करून परीक्षा पास करायची असते. या सर्व विषयांच्या यशस्वीपणे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला student pilot licence अर्थात SPL चे सर्टिफिकेट मिळते. 

  4. यानंतर पुढील स्टेप असते PPL (Private Pilot Licence) प्राप्त करणे. प्रायव्हेट पायलट लायसन प्राप्त करण्यासाठी वैमानिकाला जवळपास 60 तासांपर्यंत विमान उडवावे लागते. या उडाण देखील वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही वेळा एकटे तरी काही वेळा ट्रेनर सोबत विमान उडवले जाते. यानंतर PPL ची परीक्षा दिली जाते आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर private pilot चे license मिळून जाते. 

  5. PPL नंतर CPL (Commerical Pilot Licence) प्राप्त करावे लागते. CPL मिळवण्यासाठी 250 तासांची उडान भरावी लागते. 

  6. याशिवाय मेडिकल टेस्ट आणि अजून एक परीक्षा द्यावी लागते तेव्हा CPL चे certificate मिळते. CPL मिळाल्यानंतरच कॅंडिडेट यशस्वीपणे एक पायलट म्हटला जातो.


तर मित्रहो आशा पद्धतीने आजच्या या लेखात आपण पायलट कसे बनावे - How to become Pilot in Marathi आणि पायलट विषयी मराठी माहिती - Pilot Information in Marathi प्राप्त केली. आशा करतो आपणास ही मराठी माहिती आवडली असेल. हा लेख आपले पायलट बनू इच्छिणाऱ्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि काही प्रश्नअसतील तर आम्हाला कमेन्ट करून विचारा. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

  1. *Sir pn aapan (PPL) madhe apply karayla kahi cost lagte ka.
    Jar lagat asel trr without money aapan pilot kase banu shakto.
    Please for a humble request tum Hi he mentioned Kara na...if jar tumhi mention kel tar mazya sarkhe lakho mula-muli jyanna pilot banaych aahe pn...tyanchi paristhiti nahiye...ashya mulanche prashna suttil...*
    ∆Sir please mention this∆

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने