एंजल वन अँप मराठी | Angel One Information in Marathi

पुढील लेखात आपल्यासोबत एंजल वन अँप ची मराठी माहिती - Angel One Information in Marathi शेअर केली आहे. या माहिती द्वारे आपण आपला शेअर मार्केट चा प्रवास सुरू करू शकता.

नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील, तर यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे असते. आजच्या घडीला भारतामध्ये असे शेकडो ब्रोकर्स आहेत जे तुम्हाला, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी उपलब्ध करून देतात. त्यातीलच एक  बहुचर्चित नाव म्हणेज Angel one.

Angel one हे एक ब्रोकर एप्लीकेशन आहे जे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हेल्प करते. आजच्या या लेखात आपण Angel one app बद्दल Angel One Information in Marathi जाणून घेणार आहोत.


Angel One Information in Marathi

एंजल वन माहिती - Angel One Information in Marathi

 Angel one द्वारे तुम्ही ऑनलाईन ट्रेडिंग खाते उघडू शकता. या account द्वारे गुंतवणूकदार शेअर्स ची खरेदी/विक्री करू शकतात. ट्रेडिंग खात्याशिवाय कोणीही शेअर बाजार मध्ये शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. हे खाते बँकेच्या खात्याप्रमाणेच असते, जिथे तुम्ही तुमचे पैसे आणि शेअर्स होल्ड करू शकता. 

 हे ट्रेडिंग खाते इक्विटी,स्टॉक्स, मुद्रा, विदेशी मुद्रा, कमोडिटी, इत्यादी वित्तीय साधनांचा व्यापार करण्यासाठी मदत करते. हे ट्रेडिंग खाते online असल्या कारणाने आता तुम्ही एका क्लिकवर शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी किंवा जास्त व्यापार ह्या ट्रेडिंग अकाउंटद्वारे करू शकता. एंजल वन चे हे ट्रेडिंग खाते उघडणे खूपच सोपे आहे. Online मोबाइल फोन च्या मदतीने तुम्ही हे ओपन करू शकता.


Angel One ट्रेडिंग खाते उघडल्यावर होणारे फायदे :-

 Angel one चे ऑनलाइन ट्रेडिंग खाते तुम्हाला केव्हाही आणि कुठेही बसून शेअर्स खरेदी विक्री करण्याची संधि देते. कुठल्याही ब्रोकरच्या सहाय्याशिवाय तुम्ही mobile मध्ये शेअर खरेदी किंवा विक्री करू शकता. 

स्टॉक मार्केट मध्ये केलेली गुंतवणूक तुम्ही Angel One च्या ऑनलाईन एप्लीकेशन द्वारे स्वतः बघू शकता. फोन किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून तुम्ही लॉगिन करून ही माहिती घेऊ शकता. ह्या ट्रेडिंग अकाउंट द्वारे तुम्ही वेगवेगळ्या स्टॉक्सचे निरीक्षण, त्यांचा पास्ट, तसेच future प्रेडिक्ट करू शकता आणि स्वतःचे आर्थिक भविष्य ठरवू शकता.


एंजल वन सोबत ऑनलाइन ट्रेडिंग खाते उघडल्यावर तुम्हाला अगणित  लाभ बघायला मिळतात. जसे की  :-


  1. अकाउंट ओपन करण्याची पद्धत पूर्णतः ऑनलाइन असून, पेपरलेस अकाउंट  ओपनिंग शक्य आहे.
  2. एंजल वन तुम्हाला म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करायचा पर्याय उपलब्ध करून देते.
  3. ARQ नावाची एक वेगळी ट्रेडिंग टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करते.
  4. जवळपास सगळ्या बँकांमधून तुम्ही इथे पैसे ट्रान्सफर करू शकता.
  5. टेक्निकली हे एप्लीकेशन आणि प्लॅटफॉर्म खूप स्ट्रॉंग मानले जाते.
  6. व्यक्तिगत सहाय्य पार्टनर प्रोग्राम द्वारे पुरवले जाते.
  7. अपडेटेड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म.
  8. भारतातील सर्वात विश्वसनीय असणाऱ्या पाच ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पैकी एंजल वन हे एक प्लॅटफॉर्म आहे.
  9. इंट्राडे गुंतवणूक करण्यासाठी जास्त मार्जिन प्रोव्हाइड करते.
  10. प्रत्येक शेअर्स बद्दल विस्तृत अभ्यास आणि रिपोर्ट दाखवते.
  11. गुंतवणुकीचे बरेच पर्याय त्याचबरोबर विमा सेवा देखील सामील आहे.
  12. शेअर होल्डिंग साठी लोन ची सुविधा पुरवते.


 Angel one ब्रोकिंग अकाउंट ओपन करायची फी - Angel One account opening charges

ऑनलाइन डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी Angel One कोणतेही शुल्क आकारत नाही. यामध्ये 75 टक्के आणि अधिक मार्जिनसाठी एएमसी मोफत आहे आणि 75 टक्क्यांच्या कमी मार्जिनसाठी 450 रुपये AMC म्हणजेच अकाउंट मेंटेनन्स चार्ज आकारला जातो.


Angel one चे charges व त्याविषयी ची माहिती पुढील प्रमाणे आहे- 

 Trading charges - Rs 0

 Trading AMC( yearly ) - Rs 0

 Demat charges - Rs 0

 Demat AMC (yearly )- Rs 450

 Margin money  - 75% Margin

 Free Demat account -yes

 Free trading account - yes

Discount on brokerage - first 30 days free brokerage offer

Trading Happy Hours - No

 Flexible brokerage - yes 


Angel one मध्ये ट्रेडिंग Account सुरू करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स :-

Angel One Information in Marathi मध्ये आता आपण अकाऊंट ओपन करण्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत याविषयी जाणून घेऊया.

  1. पॅन कार्ड.
  2. पासपोर्ट फोटो.
  3. वोटर आयडी.
  4. ड्रायव्हिंग लायसन्स.


 Angel one अकाउंट कसे उघडावे :-

खालील स्टेप्सचे पालन करून तुम्ही Angel One चे ऑनलाईन demat account ओपन करू शकता :-


1) अकाऊंट ओपेन करण्यासाठी सर्वप्रथम पुढील लिंक क्लिक करून आपल्या मोबाइल ला angel one app download करा.


Download Here


2) यानंतर एंजल ब्रोकिंग अकाउंट ओपनिंग वर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म दिसेल, तो पूर्ण भरून तुमचे नाव,मोबाईल नंबर आणि शहराचे नाव समाविष्ट करा.


3) यानंतर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमची जन्मतारीख,पॅन कार्ड नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या खात्याचा IFSC कोड टाकायचा आहे.


4) यानंतर तुमचा आधार कार्ड चा फोटो अपलोड करा, किंवा आधार कार्ड नंबर समाविष्ट करा.


5) ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला मागितलेल्या सर्व डॉक्युमेंट्स ची स्कॅन केलेली copy अपलोड करा.


6) यानंतर तुम्हाला ई-साईन करायची आहे.


7) ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर तुमचा क्लाइंट आयडी आणि पासवर्ड मिळेल. ज्याचा उपयोग करून तुम्ही Angel one या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक सुरू करू शकता.


तर मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत एंजेल वन App ची मराठी महती - Angel One Information in Marathi शेअर केली. यासोबतच angel वन App चे फायदे, तोटे आणि अकाऊंट ओपेन करण्याची प्रोसेस याविषयी ची चर्चा केलेली आहे. आशा आहे आपणास हा लेख उपयोगी ठरला असेल. जर आपले काही प्रश्न असतील तर ते आपण आम्हास कमेन्ट करून विचारू शकतात. धन्यवाद..


अधिक वाचा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने