शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | How to Invest in Share Market in Marathi

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी व शेअर बाजार अभ्यास (How to Invest in Share Market in Marathi) जाणून घेऊया या लेखात..

मित्रांनो आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन आल्याने अनेक गोष्टी घरबसल्या करणे शक्य झाले आहे. आणि यातच एक म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक. आधीच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणे प्रत्येकासाठी शक्य नव्हते. फक्त काही निवडक शेअर ब्रोकरच गुंतवणूक करू शकत होते आणि त्यांच्या द्वारे इतरांना गुंतवणूक करता येत होती. 

परंतु आजकाल आपण घरबसल्या फक्त एका मोबाईल फोनच्या साह्याने स्वतःचे ट्रेडिंग अकाउंट बनवून शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतात आणि तेथून उत्तम पैसे कमवू शकतात. या लेखात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी (How to invest in share market in Marathi) याबद्दल ची माहिती देण्यात आलेली आहे.


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी - How to invest in share market in Marathi

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुढील स्टेप्सचा अवलंब करा.

1) सर्वात अगोदर एक ब्रोकर निवडा

मित्रांनो सामान्य मनुष्य शेअर बाजारात डायरेक्ट गुंतवणूक करू शकत नाही. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक ब्रोकर अर्थात दलाल ची आवश्यकता असते. आजकाल अनेक online apps उपलब्ध आहेत, जे एखाद्या ब्रोकर प्रमाणेच काम करतात. तर शेअर मार्केट मध्ये घरबसल्या गुंतवणूक सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर कोणत्याही एका विश्वसनीय app द्वारे आपले डिमॅट खाते (Dmat Account) उघडून घ्यायचे आहे. 

येथे आम्ही आपणास angel one ॲप द्वारे अकाउंट उघडण्याची सल्ला देऊ. कारण या ॲप मध्ये आपणास नवीन खाते उघडण्यासाठी कुठलीही Fee आकारली जात नाही. याशिवाय यांचा customer support व 0 चार्जेस आपणास आपल्या स्टॉक मार्केट गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी उपयोगी ठरतील. 

Angel one चे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटनावर लिंक करा. 


Download Here


2) Dmat Account उघडा

शेअर ब्रोकर ॲप निवडल्यानंतर ॲप मध्ये account open करून लॉगिन करावे. शेअर मार्केटच्या मध्ये ओपन केलेल्या अकाउंटला डिमॅट अकाउंट म्हटले जाते. येथे आपण angel one app चा उपयोग करीत असल्याने आपणास या ॲप मध्ये अकाउंट ओपन करून घ्यायचे आहे.


3) बँक अकाउंट द्वारे App wallet ला पैसे टाका




अकाउंट ओपनिंग ची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जेवढे पैसे शेअर बाजारात गुंतवायचे आहेत तेवढे आपल्या ॲप च्या wallet ला Add Fund करा. Angel one मध्ये आपणास चित्रात दाखवल्याप्रमाणे पैसे ऍड करायचे ऑप्शन मिळते.


4) आपल्या आवडीचे शेअर निवडा

शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर लिस्ट केलेले असतात. यापैकी आपण आपल्याला योग्य वाटेल त्या कंपनीत गुंतवणूक करू शकतात. आमच्या सल्ल्यानुसार आपण त्याच कंपनीत पैश्यांची गुंतवणूक करावे ज्या नामांकित आहेत व ज्यांचे प्रॉडक्ट्स आपण दैनंदिन जीवनात वापरत असतात. 

या पद्धतीने आपल्या आवडीच्या कंपन्या सर्च करून आपण त्यांची एक लिस्ट बनवू शकतात व कंपनीच्या एका शेअर चा सध्या सुरू असणारा दर, त्यांचा इतिहास व त्या कंपनी विषयीची ईतर माहिती आपण ॲप द्वारे जाणून घेऊ शकतात.


वाचा> शेअर मार्केट म्हणजे काय व शेअर बाजाराची मराठी माहिती


शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दल आपण जाणून घेतले, परंतु मित्रांना शेअर बाजारात योग्य गुंतवणूक न केल्यास नुकसान होण्याची रिस्क असते. म्हणून कधीही गुंतवणूक करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दलची माहिती पुढे देत आहोत.


1) एकाच स्टॉक मध्ये सर्व पैसे गुंतवू नका

शेअर बाजाराच्या एक महत्त्वाच्या नियम आहे आणि तो म्हणजे "Don't Put All Your Eggs In One Basket". हा नियम अनेक प्रसिद्ध गुंतवणूकदार कायम लक्षात ठेवून गुंतवणूक करीत असतात. 

वरील वाक्याच्या अर्थानुसार कधीही आपल्या जवळ असलेले सर्व भांडवल एकाच स्टॉक मध्ये invest करू नये. जर तुमच्याकडे गुंतवणूक करायला 30 हजार रुपये असतील तर सर्व पैसे एकाच कंपनीचे स्टॉक घेण्यात न घालवता यातून वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या quantity मध्ये stock घ्यावेत. असे केल्याने नुकसान होण्याची जोखीम फारच कमी होऊन जाते.


2) स्टॉकला व्यवस्थित समजून घेणे

कुठल्याही स्टॉक मध्ये पैसे इन्वेस्ट करण्याआधी गुंतवणूकदाराने त्या कंपनी विषयी योग्य माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. कंपनीची कॅपिटल मार्केट, इन्वेस्टमेंट इत्यादी गोष्टींवर रिसर्च करायला हवी. वयानंतरच एक्सप्रेस बनवून व्यवस्थित गुंतवणूक करायला हवी.


3) स्वस्ताच्या मागे पडू नये

अनेकदा ज्या लोकांकडे कमी पैसे असतात ते स्वस्त शेअर खरेदी करण्याचा विचार करतात. व म्हणून ते पेनी स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करून घेतात. परंतु असे करणे अनेकदा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण ज्या कंपनीच्या शेअर ची किंमत कमी असते, बऱ्याचदा ती कंपनी पूर्णपणे लॉस मध्ये गेलेली असते किंवा त्या कंपनीच्या विक्रीत नफा फारच कमी होत असतो. 

आणि म्हणूनच कंपनीचा शेअर देखील वाढत नाही. म्हणून कधीही फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीत इन्वेस्टमेंट करायला हवी.


4) आपत्कालीन निधी जवळ असू द्या

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी काही इमर्जन्सी फंड बाजूला काढून स्वतः जवळ असू देणे शहाणपणाचे आहे. तुमच्याकडे बाजूला काढलेले हे पैसे तीन ते सहा महिन्यांचा खर्च भागवतील एवढे असायला हवे. असे केल्यास तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुरक्षित राहतात आणि अनपेक्षित ठिकाणी होणाऱ्या खर्चाच्या वेळी देखील आपली गुंतवणूक सुरक्षित असते.


5) अनुभवी व प्रोफेशनल लोकांची सल्ला घ्या

जर तुम्ही शेअर बाजारात पूर्णपणे नवीन असाल. व तुम्हाला कोणते Stock घ्यावेत आणि कसे घ्यावेत याबद्दल जराही माहिती नसेल तर अशावेळी अनुभवी लोकांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम.


6) गुंतवणूक केलेल्या शेअर्सकडे लक्ष असू द्या

तुमच्या पोर्टफोलिओकडे सतत लक्ष असू द्यावे. शेअर मार्केटमध्ये एकदा गुंतवणूक केले आणि दीर्घकाळासाठी सोडून दिले, असे करणे चालत नाही. तुम्हाला नियमितपणे आपल्या शेअर्सचे ट्रेंड त्यांच्या किमतीत होणारा चढ-उतार यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.


तर मित्रहो या लेखात आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी याविशी चा शेअर मार्केट अभ्यास केला. आम्ही आशा करतो की ही How to Invest in Share Market in Marathi याविषयावर लिहिण्यात आलेली माहिती आपणास उपयोगाची ठरली असेल. हा लेख शेअर मार्केट मध्ये गुणतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या आपल्या मित्र मंडळी आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..


Read More

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने