माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस | My Unforgettable day in school Essay Marathi

मित्रांनो शालेय जीवनातील एक एक दिवस स्मरणात ठेवण्यासारखा असतो. वय वाढत जाते व आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना काळाच्या ओघात विस्मरण होत जातात. परंतु शाळेचे ते सुवर्ण दिवस जवळपास प्रत्येकालाच्याच आठवणीत ताजे राहत असतात.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस या विषयवार निबंध घेऊन आलेलो आहोत. तर चला सूर करूया..

 


माझा शाळेतील अविस्मरणीय दिवस मराठी निबंध

शालेय दिवस अनेक अविस्मरणीय आठवणीने भरलेले असतात. शालेय जीवनातील अनुभव आयुष्यभर स्मरणात राहतात. शाळेतील प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवण, ज्ञानातील वाढ आणि अनपेक्षित संधी घेऊन येत असतो. मी माझ्या शालेय जीवनात अनेक वर्षे अनेक सुंदर दिवस जगलेलो आहे. परंतु एक दिवस असाही होता, जो कायम माझ्या स्मरणात आहे व आयुष्यभर माझ्या समोर तो जसाच्या तसा उभा राहणार आहे.


मार्च महिन्याच्या मध्यातील तो एक दिवस होता. वसंत ऋतू असल्याने सूर्य चकाकत होता हवा सुरेख वाहत होती आणि पक्षांच्या किलबिलिटाने नवीन दिवसाच्या आगमनाची सुरुवात झाली होती. त्या दिवशी शाळेच्या आवारात प्रवेश करताच, नेहमी प्रमाणे लगबग सुरू झाली. दररोजची शाळेत असलेली दिनचर्या सकाळची प्रार्थना, शिक्षकांनी तपासलेला अभ्यास, लेक्चर्स सर्व काही नेहमी प्रमाणेच होणार असं वाटत होते. 


तो दिवस शाळेतील इतर दिवसांप्रमाणेच सुरू झाला दिवसाची सुरुवात शाळेची घंटा वाजून झाली. परंतु नेहमीप्रमाणेच भासणारा हा दिवस माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस ठरणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी शाळेच्या आत प्रवेश केलाच होता की, वर्गमित्रांची काहीतरी कुजबुज ऐकायला आले. आज काहीतरी नवीन घडणार आहे याची कल्पना मिळाली. सूचनेप्रमाणे आम्ही सर्वजण शाळेच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये जमा झाले. 


ऑडिटर यामध्ये काय करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. हळुवार हॉलमधील पडदे एकामेकांपासून दूर झाले. रंगीबेरंगी सजावटीने सुशोभित केलेले स्टेज आमच्यासमोर प्रकट झाले. त्यादिवशी आमच्या शाळेत एका प्रसिद्ध नाट्य समूहाला शाळेसाठी नाटक सादर करायला आमंत्रित करण्यात आले होते. व म्हणूनच एका दिवशी अभ्यासापासून सुटका व अभ्यासा व्यतिरिक्त मनोरंजनासोबत काहीतरी नवीन शिकायला मिळणार होते. संपूर्ण हॉलमध्ये उत्साह निर्माण झालेला होता, यानंतर हळुवार दिवे मंद होत गेले आणि नाटकाला सुरुवात झाली. 


सादर करण्यात येणारे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होते. कलाकारांनी शिवरायांचा जन्म, संगोपन, गड किल्ल्यांवर स्वारी, राज्याभिषेक, शत्रूशी लढा इत्यादी सर्व गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने, अंगावर काटा उभा राहील अशा सादर केल्यात. नाटक पाहणारा प्रत्येक व्यक्ती मंत्रमुग्ध झालेला होता. शिवाजी महाराजांचे ते नाटक, काही क्षणांसाठी नाटक न राहता खरोखर शिवरायांचाच कालखंड सुरू आहे असे भासवत होते. कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपूर्ण हॉलमध्ये शांतता होती. आणि शेवटी कार्यक्रम संपला तो प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने! 


त्या दिवसाच्या नाटकाचा तो प्रभाव शाळेच्या भिंतींच्या पलीकडेही पसरला होता. त्या नाटकाने सर्वांनाच प्रेरित केले होते. नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार विद्यार्थ्यांना भेटले त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी केल्या. माझे अनेक वर्गमित्र, ज्यांना नाटकाची आवड आहे त्यांना कलाकार योग्य मार्गदर्शन केले. माझ्या शाळेतील या अविस्मरणीय दिवसांने मला कलेचे महत्त्व समजावले. कशा पद्धतीने कला माणसाला जिवंत ठेवते कल्पनाशक्ती आणि सामर्थ्य प्रदान करते याविषयी त्या दिवशी मला कळले. 


माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवसांनी मला शिकवले की शिक्षण हे केवळ पुस्तकातून मिळत नसते तर पुस्तका व्यतिरिक्त जे मिळते तेच खरे ज्ञान. पुस्तके आपणास पुस्तके ज्ञान देत असतात परंतु बाह्य जगातून खरे अनुभवाचे ज्ञान मिळत असते. असा हा माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस माझ्या कायम स्मरणात आहे.

***

मित्रहो आशा करतो की माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस हा निबंध आपणास आवडला असेल. परंतु मित्रांनो कॉपी करण्याएवजी यातून आयडिया घेऊन आपण स्वतःचा निबंध लिहावा. या निबंधला आपले मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. व आपणास निबंध कसं वाटला कमेन्ट करून सांगा. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने