भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे जहाल विचारसरणीचे एक बंडखोर नेते होते. लोकमान्य टिळक यांची माहिती (Lokmanya Tilak Information in Marathi) जाणून घेत असताना त्यांचा जन्म प्रारंभिक जीवन जीवनातील प्रसंग स्वातंत्र्य लढ्यातील योगदान इत्यादी गोष्टींबद्दल माहिती प्राप्त करणे महत्त्वाचे आहे.
आजच्या या लेखात आपण लोकमान्य टिळक यांची माहिती मराठी भाषेत प्राप्त करणार आहोत. लोकमान्य टिळकांची माहिती 1 ऑगस्ट च्या लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी देण्यात येणाऱ्या शालेय भाषणासाठी फार उपयोगाची ठरणार आहे. तर चला सुरू करूया.
लोकमान्य टिळक यांची माहिती - Lokmanya Tilak Information in Marathi
लोकमान्य टिळक जन्म
लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 साली महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील आणि पूर्वजांचे गाव चिखली हे होते. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. परंतु त्यांना बालपणी बाळ म्हणून संबोधले जायचे. व म्हणूनच पुढे जाऊन त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे झाले.
टिळकांचा जन्म एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला होता. लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधरपंत संस्कृत विषयाचे विद्वान होते आणि व्यवसायाने ते एका शाळेचे प्रसिद्ध शिक्षक देखील होते. लोकमान्य टिळक 16 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
लोकमान्य टिळकांचे शिक्षण
लोकमान्य टिळक 10 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाली. पुण्यात टिळकांना एका चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाले व तिथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.
टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीने समृद्ध होते. अभ्यासात त्यांना विशेष आवड होती. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर टिळक डेक्कन कॉलेज पुणे येथून 1876 साली पदवीधर झाले. टिळकांनी त्यांची बॅचलर डिग्री गणित आणि संस्कृती विषयात मिळवली होती.
बॅचलरच्या डिग्री नंतर टिळकांनी कायद्याचे शिक्षण घेतले व 1879 साली त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे येथून एलएलबी ही लॉ ची पदवीदेखील मिळवली. यानंतर त्यांनी पुण्यातील एका खाजगी शाळेमध्ये गणित शिकवण्यास सुरुवात केली. परंतु काही काळानंतर सहकर्मियांसोबत असलेल्या विचार भिन्नते मुळे त्यांनी ती नोकरी सोडली व ते एक पत्रकार म्हणून कार्य करू लागले.
लोकमान्य टिळकांचा विवाह
बाळ गंगाधर टिळक 16 वर्षाचे असताना, ज्यावेळी ते मॅट्रिक चे शिक्षण घेत होते तेव्हाच त्यांच्या करण्यात आले. टिळकांच्या पत्नीचे नाव सत्यभामा बाई असे होते. त्याकाळी सत्यभामा यांचे वय मात्र 10 वर्ष एवढे होते.
लग्नानंतर टिळकांनी आपले शिक्षण सुरू ठेवले व त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि त्यानंतर वकिलीचे शिक्षण देखील घेतले.
वाचा> लोकमान्य टिळकांचे भाषण
लोकमान्य टिळकांचे राजकीय कार्य
लोकमान्य टिळक एक बंडखोर क्रांतिकारी नेते होते. त्यांनी इंग्रजी सरकारच्या अत्याचार विरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण केली. सर्वात आधी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग नोंदवला.
परंतु काही काळ काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की काँग्रेस मधील सर्वच लोक इंग्रज शासनाच्या विरुद्ध कठोर शब्दात वक्तव्य करणारे नाहीत. आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा विचार केला.
यापूर्वी 1907 साली सुरत येथे काँग्रेस पक्षाची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. ज्यामध्ये एक गट हा जहाल विचारसरणीचे नेते जसे लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पाल यांचा तर दुसरा गट मावळ विचारसरणीचे नेते जसे अरबिंदू घोष, व्ही. ओ. चिदंबरम पिलई यांचा होता.
1937 साली टिळकांनी गरम दल म्हणून संघटन स्थापन केले ज्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत पंजाबचे लाला लजपत राय आणि बंगालचे बिपिन चंद्र पाल यांना एकत्रित केले. तिघांच्या या जोडीला लाल-बाल-पाल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याकाळी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांमध्ये लाल बाल पाल अत्यंत प्रचलित होऊ लागले.
यादरम्यान लोकमान्य टिळकांनी दोन वृत्तपत्र सुरू केले ज्यांची नावे केसरी आणि मराठा होती. केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेत आणि मराठा हे इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र होते. या वर्तमानपत्राद्वारे लोकमान्य टिळक इंग्रजी शासनावर टीका करत होते व प्रखर शब्दात इंग्रजांविरुद्ध बोलत होते. ज्यामुळे टिळकांना इंग्रजांनी अनेकदा तुरुंगवासात देखील टाकले. यापैकीच एक म्हणजे टिळकांनी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्या हत्येच्या विरोधात संपादन केले होते त्यावेळी देखील इंग्रजांनी क्रोधित होऊन लोकमान्य टिळकांना तुरुंगात डांबले होते.
लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच", अशा कठोर शब्दात इंग्रजी शासन विरुद्ध ललकार दिली होती.
लोकमान्य टिळकांनी इंग्रजी शासनाला सडो की पडो करून सोडले. जनतेमध्ये एकमत आणण्यासाठी, जातीप्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी कार्य केले. टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव साजरे करणे देखील सुरू केले. लोकमान्य टिळकांचे मत होते की सण उत्सवाच्या निमित्ताने एकत्रित आल्याने भारतीय एकजूट होतील आणि इंग्रजां विरुद्ध बंड पुकारतील.
यानंतर अनेक लोकांना एकत्रित करून लोकमान्य टिळकांनी 1916 साली ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली. यादरम्यान टिळक भारतातील खेड्यांमध्ये देखील फिरले त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आणि ग्रामीण जनतेला आपल्या सोबत घेतले. काही काळातच एप्रिल 1916 येईपर्यंत या लीग मध्ये 1400 लोकांच्या सहभाग झाला आणि 1917 या एका वर्षातच ही संख्या 32000 ला पोहोचली. होमरूल लीगचा प्रमुख उद्देश भारताला स्वातंत्र्य करणे हा होता.
लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य
लोकमान्य टिळक एक स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच एक उत्तम सामाजिक कार्यकर्ता देखील होते. त्यांनी समाजात असणाऱ्या खोलीतील विरुद्ध आवाज बुलंद केली.
टिळकांनी जातीव्यवस्था, बालविवाह, सतीप्रथा इत्यादींविरुद्ध लोकांना जागृत केले. याशिवाय त्यांनी विधवा विवाहचे समर्थन देखील केले.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यू
लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रसिद्ध, उच्चशिक्षित नेते होते. अशा या महान समाजसुधारकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 ला झाला.
इतर लेख