छत्री ची जाहिरात लेखन मराठी | Umbrella Advertisement Writing in Marathi

जाहिरात लेखन शिकणे प्रत्येक विद्यार्थी साठी उपयोगाचे आहे. कारण आजकाल व्यवसाय कुठलाही असो त्याची चांगल्या पद्धतीने जाहिरात झाली नाही तर तो व्यवसाय यशस्वी होऊच शकत नाही. उत्तम जाहिरात करण्यासाठी जाहिरात लिहिण्याचा गुण आपल्या अंगी असणे आवश्यक आहे.

या लेखात आम्ही आपल्यासोबत छत्री जाहिरात लेखन शेअर करीत आहोत. हे Jahirat Lekhan in Marathi on umbrella आपण योग्य पद्धतीने अभ्यासू शकतात आणि यानुसार आपल्या शब्दात जाहिरात लिहू शकतात. तर चला सुरू करूया..छत्री ची जाहिरात लेखन - Jahirat Lekhan in Marathi on umbrella

पुढे आपणास छत्री जाहिरात लेखनाचे 5 विविध नमुने देत आहोत-

1)

पावसाळा आला, पावसाळा आला 
तयारी करा, तयारी करा 
छत्री आणा, रेनकोट आणा

छत्री आणि रेनकोट साठी एकच उत्तम ठिकाण

पाटील छत्री 

दर्जेदार आणि  उत्तम छत्री 

आमच्या येथे विविध रंगात उपलब्ध सुबक आणि टिकाऊ छत्री उपलब्ध आहेत.

पुरुष, स्त्रीया व लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि वेगवेगळ्या डिजाइन च्या छत्र्या उपलब्ध

आजच या आणि अतिशय कमीत कमी किंमती छत्री व रेनकोट खरेदी करा 

पत्ता: दुरिया बिल्डींग, पहिला मजला, 222 कांबेकर स्ट्रीट, मस्जीद बंदर, मुंबई -400003
मोबाईल नंबर - 95××××××××
ईमेल आईडी - Patilumbrella5×××gmail.com


2)

पाऊस आला, रेनकोट घाला 

मजबूत छत्री, पावसापासून वाचवण्याची खात्री

सनफ्लावर छत्री आणि रेनकोट

विश्वसनीय आणि दर्जेदार ब्रँड

 • सर्वांसाठी उपलब्ध 
 • आकर्षक आणि सुंदर डिझाईन
 • मजबूत आणि टिकाऊ 
 • स्वस्त दर
 • पावसाळी खास सवलत

आजच खरेदी करा!!

पत्ता:

बोहरा गल्ली, जळगाव

संपर्क: ७९३९XXXXXX


3)

आला आला वारा 

सोबत पावसाच्या धारा

घरातून बाहेर निघताना मोगरा छाप छत्रीच वापरा

विशेष ऑफर:

 • तीन छत्र्यांसोबत एक मोफत
 • दोन छत्र्यांवर 25% सूट

वैशिष्ट्ये:

 • मजबूत बांधणी 
 • आकर्षक रंग 
 • मनोहर नक्षीकाम 
 • भक्कम कापड
 • जबरदस्त सवलत

पत्ता: दुकान नं. 45, छत्रपती संभाजी कॉम्प्लेक्स, धुळे

संपर्क: 9844XXXXXX

दुकानाची वेळ: सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत


4)

आला वारा सोबत पावसाच्या धारा
पावसात जाण्याआधी हातात रंगीबेरंगी छत्री धरा 

                         रंगीबेरंगी छत्री 

पावसाळा आला पावसाळा आला 
तयारी करा तयारी करा 
रेनकोट हवा छत्री हवी

आमच्याइथे मिळेल तुम्हाला दर्जेदार छत्री आणि रेनकोट

 • रंगीबेरंगी आणि टिकाऊ छत्री
 • सर्व साइज आणि रंग उपलब्ध
 • स्त्रिया, पुरुष आणि मुलांसाठी विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध 

आजच या आणि रंगीबेरंगी छत्री या दुकानाला भेट द्या 

पत्ता- दुरिया बिल्डींग, तळ मजला, 222 कांबेकर स्ट्रीट, मस्जीद बंदर, मुंबई -400003

मोबाईल नंबर - 95××××××××

ईमेल आईडी - umbrella5×××gmail.com


5)

झकास छत्रीवाले, टिकाऊ आणि रंगीबेरंगी छत्री अल्प दरात उपलब्ध 
झकास छत्रीवाले आणि रेनकोट, सर्वांना आहे आमच्या ब्रॅंडवर पूर्ण विश्वास 

झकास छत्री आणि रेनकोट।। उत्तम कापड आणि उत्तम दर ।।
मजबूत बांधणी ।। रंगीबेरंगी नक्षीकाम ।। 

झकास छत्रीवाले 

आजच या, छत्री आणि रेनकोट खरेदी करा 

पत्ता: दादर, जनता मार्केट, तळमजला, दुकान नंबर -७ मुंबई 
मोबाईल नंबर - ८८××××××××
ईमेल आईडी - zhakaschatri5×××gmail.com


तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासोबत छत्री चे जाहिरात लेखन - Jahirat Lekhan in Marathi on umbrella शेअर केले आहे. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगाची ठरली असेल. आपणास हा लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने