रोहित शर्मा मराठी माहिती | Rohit Sharma Information in Marathi

रोहित शर्मा हे एक प्रसिद्ध भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहेत. सध्याचे त्यांचे वय हे ३६ वर्षे आहे. त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये सामील करण्यात आलेले आहे. 

आजच्या या लेखात आपण रोहित शर्मा यांची मराठी माहिती - Rohit sharma information in marathi मिळवणार आहोत. रोहित शर्मा यांचे जीवन व करियर संबंधी संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. रोहित शर्मा मराठी माहिती | Rohit Sharma Information in Marathi

सुरुवाती जीवन 

रोहित शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 मध्ये नागपुर मधील बनसोड या गावातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा व आईचे नाव पौर्णिमा शर्मा असे होते. रोहित शर्मा यांचे वडील एका ट्रान्सपोर्ट फर्म मध्ये कामाला होते. 

रोहित शर्मा यांचे बालपण पैशाच्या आभावाने गरिबीत गेले. लहान असताना ते आपल्या आजीकडे राहत असत व सुट्टीच्या दिवशीच आपल्या आई-वडिलांना भेटायला जात. रोहित शर्मा यांचा एक लहान भाऊ होता. जो त्यांच्या आई-वडिलां सोबत राहत असे. 

रोहित शर्मा लहानपणापासूनच क्रिकेटच्या विषयी आकर्षित होते. टीव्हीवर येणारी प्रत्येक क्रिकेटची मॅच ते पाहत असत. या शिवाय ते आपल्या मित्रांसोबत दररोज क्रिकेट खेळत असत. क्रिकेट मध्ये असलेली त्यांची आवड पाहून त्यांच्या काकांनी त्यांना एका क्रिकेट कॅम्प मध्ये भरती केले. 


रोहित शर्मा क्रिकेट करियर - rohit sharma marathi mahiti 

रोहित शर्मा यांनी आपल्या क्रिकेट करियरचा सुरुवात एका गोलंदाज च्या रूपात केली. रोहित शर्मा यांची फलंदाजी बऱ्याच क्रिकेट कोचांना प्रभावित करीत असे. 2005 साली देवधर ट्रॉफी जिंकण्यासाठी पश्चिम क्षेत्रात खेळायला त्यांची निवड झाली. पण या मॅचमध्ये त्यांना खास असे यश मिळाले नाही. यानंतर उत्तरी क्षेत्र विरुद्ध खेळताना त्यांनी नाबाद 142 रन काढले. त्यांच्या या खेळामुळे चांगली ओळख निर्माण झाली. 

यानंतर त्यांनी अनेक मॅच खेळल्या व 2006 साली त्यांना न्यूझीलंड विरुद्ध होत असलेल्या सामन्यात भारत ए मध्ये निवडण्यात आले. त्याच वर्षी त्यांना रणजी ट्रॉफीसाठी खेळण्याची संधीही प्राप्त झाली. सुरुवातीच्या काही अपयशानंतर त्यांनी गुजरात आणि बंगालच्या विरुद्ध लगातार दोन शतक आणि अर्धशतक लावून सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या या खेळामुळे 2014 साली त्यांना मुंबई रणजी टीम चे कप्तान बनवण्यात आले.

2007 सालीच रोहित शर्मा यांचे घरेलू क्रिकेटमधील योग्य प्रदर्शन पाहून निवडकर्त्यानी त्यांना भारत व आयर्लंडमध्ये होत असलेले मॅच खेळण्यासाठी निवडले. परंतु आयर्लंडमध्ये झालेल्या या मॅच मध्ये फलंदाजी करण्यासाठी त्यांना संधी मिळाली नाही. 

यानंतर याच वर्षी टी 20 सामन्यात रोहित ने दक्षिण आफ्रिकेच्या धारदार बॉलर्स समोर बॅटिंग करीत 50 रन जमवले आणि टीम ला ही मॅच जिंकून दिली. यानंतर रोहित शर्मा यांनी पाकिस्तान विरुद्ध महत्त्वाची पारी खेळली. या मॅचनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रात त्यांचे नाव वाढत गेले. 

2013 च्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये रोहित शर्मा यांना शिखर धवन सोबत ऑपनेर म्हणून खेळण्यासाठी पाठवण्यात आले. या सामन्यात दोघांच्या जोडीने कमाल रन बनवले. भारतीय दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्मा यांनी दोन शतक बनवले. ज्यात 16 षटकार समाविष्ट होते, रोहित शर्मा यांच्या या खेळाला विश्व रेकॉर्ड म्हणून निवडण्यात आले. रोहित शर्मा पत्नी 

रोहित शर्मा यांनी भारतीय क्रीडा व्यवस्थापक ऋतिका सजदेह यांच्याशी झाला. रोहित शर्मा यांची विवाह दिनांक 13 डिसेंबर 2015 होती. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव समाईरा आहे.


रोहित शर्मा यांना मिळालेले पुरस्कार 

रोहित शर्मा यांना भारत शासनाद्वारे २०१५ साली अर्जुन पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रतिवर्ष देण्यात येतो. 

रोहित शर्मा यांनी वर्ल्ड कप मध्ये २ दुहेरी शतक लावले, यामुळे ESPN द्वारे सन २०१३ आणि २०१४ चा सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. 

 रोहित शर्मा यांना दक्षिण आफ्रिका विरुद्ध प्रथम टी २० मध्ये शतक पूर्ण केल्याबद्दल २०१५ चे सर्वश्रेष्ठ  टी २० फलंदाज म्हणून निवडण्यात आले.


तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासोबत रोहित शर्मा यांची मराठी माहिती शेअर केली आहे. आम्ही आशा करतो आपणास ही Rohit Sharma Information in Marathi उपयोगाची ठरली असेल. हा लेख आपल्या सर्व क्रिकेट प्रेमी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद..


अधिक वाचा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने