Acharya Vinoba Bhave information in Marathi: आचार्य विनोबा भावे हे नाव भारतीय इतिहासात एक महान स्वातंत्र्य सेनानी, सामाजिक कार्यकर्ता व अहिंसक, गांधीवादी विचारांचे नेता म्हणून प्रसिद्ध आहे.
पुढील लेखात आपण आचार्य विनोबा भावे माहिती मराठी भाषेतून प्राप्त करणार आहोत. यासोबतच त्यांचा संपूर्ण जीवन परिचय आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया.
आचार्य विनोबा भावे यांची माहिती - Vinoba Bhave Information in Marathi
प्रारंभिक जीवन
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 साली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या गागोदे गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव भावे तर आईचे नाव रखमाबाई होती.
नरहरी हे कामानिमित्त बडोद्याला गेले. लहान असतांना विनोबांचे पालन-पोषण त्यांच्या आजोबांनी केले. आजोबांकडून भगवद्गीता व इतर धार्मिक ग्रंथांचे ज्ञान त्यांना प्राप्त झाले. पुढील माध्यमिक व उच्च शिक्षण करण्यासाठी ते बडोद्याला आपल्या वडीलांकडे गेले.
1916 साली महाविद्यालयाची इंटरमीडिएट परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून मुंबई यायला निघाले. या दरम्यान महात्मा गांधी यांनी वाराणसी हिंदू विश्वविद्यालयात एक प्रभावशाली भाषण दिले या भाषणाचे काही अंश पेपरात छापून आले होते.
गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन विनोबा भावे हे मुंबईच्या ऐवजी सुरतेस उतरून आई-वडिलांना न कळवताच वाराणसी येथे रवाना झाले. येथे पोहोचल्यावर त्यांनी महात्मा गांधींना एक पत्र लिहिले. पत्राचे उत्तर पाठवीत गांधीजींनी त्यांना आमदाबाद येथील एका आश्रमात भेटीसाठी बोलावले. महात्मा गांधी मराठी जीवनचरित्र वाचा येथे
महात्मा गांधी व विनोबा भावे
विनोबा भावे व महात्मा गांधी यांची प्रथम भेट 7 जून 1916 ला झाली. या भेटीचा विनोबा भावेवर खोल परिणाम झाला. त्यांनी आपले शिक्षण सोडून संपूर्ण जीवन गांधीजींच्या मार्गावर चालून देशसेवेसाठी लावण्याच्या विचार केला. विनोबा भावे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा या विचारांनी प्रभावित होते. आश्रमात होत असलेल्या सर्व कार्यक्रमांविषयी त्यांना आवड होती. त्यांनी खादी कपड्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कार्य केले.
8 एप्रिल 1921 ला विनोबा भावे महात्मा गांधींच्या आदेशावर महाराष्ट्रातील वर्धा येथे रवाना झाले. वर्धा मध्ये महात्मा गांधींचे एक आश्रम होते, या आश्रमाचा कार्यभार त्यांनी विनोबा भावे यांना सोपवला. सन 1923 मध्ये त्यांनी महाराष्ट्रात 'महाराष्ट्र धर्म' हे मासिक सुरू केले. व या मासिकात वेद व उपनिषदांचे लेख प्रकाशित करू लागले.
आचार्य विनोबा भावे यांना अटक
विनोबा भावे यांच्या काळात देशात इंग्रजांचे शासन होते. महात्मा गांधी एकीकडे लोकांना जागृत करीत होते तर दुसरीकडे इंग्रज शासनाकडून देशाला स्वातंत्र्य करण्याची देखील त्यांच्याकडे जबाबदारी होती.
सन 1920 ते 1930 दरम्यान विनोबांना त्यांच्या सामाजिक व जागरूकतेच्या कार्यामुळे अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. परंतु तरीही न घाबरता ते आपले कार्य करीत राहिले, सविनय कायदेभंग चळवळ मध्ये सामील झाल्यामुळे सन 1940 मध्ये इंग्रज शासनाने त्यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यामागील कारण इंग्रजांविरुद्ध अहिंसात्मक आंदोलन करणे हे होते.
या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी ईशावास्यवृत्ती व स्थितप्रज्ञ दर्शन ही दोन पुस्तके लिहिली. याशिवाय भगवद्गीतेचा मराठी भाषेत अनुवाद करून टॉक्स ओन द गीता अर्थात गीता प्रवचने हा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्या निश्चय अधिकच दृढ झाला.
यानंतर गांधीजींनी सुरू केलेल्या वयक्तिक सत्याग्रह आंदोलनात त्यांची पहिला सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली. यामुळे जनतेमध्ये विनोबांची अधिक ओळख निर्माण झाली. यानंतर 20 ऑक्टोंबर 1940 ला गांधीजींनी सुरू केलेले साप्ताहिक हरिजन मध्ये आपल्या या शिष्याची ओळख करून दिली.
आपण bhashanmarathi.com या वेबसाइट वरील Vinoba Bhave Information in Marathi हा लेख वाचत आहात.
विनोबा भावे भूदान चळवळ माहिती
भारत स्वतंत्र झाल्याचा 4 वर्षांनंतर 18 एप्रिल 1951 मध्ये विनोबांनी भूदान आंदोलनाची सुरुवात केली. भारत जरीही इंग्रजांच्या शासनातून मुक्त झालेला होता तरीही देशात गरिबी व लाचारी मोठ्या प्रमाणात होती. लोकांजवळ राहण्यासाठी व शेती करण्यासाठी जमीन नव्हती.
भूदान आंदोलनाद्वारे विनोबा भावे यांनी भूमी नसणाऱ्या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी त्यांनी स्वतः कडे असलेली भूमी दान केली. यानंतर देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून त्यांनी लोकांना त्यांच्या जमिनीचा सहावा भाग दान करण्याची प्रार्थना केली. आचार्य विनोबा भावे यांचा त्याग व मेहनत पाहून अनेक लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जवळपास 13 वर्षांपर्यंत चालेल्या या आंदोलनात विनोबांनी 6 आश्रम स्थापित केले.
आचार्य विनोबा भावे यांचा मृत्यू
आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण ब्रम्हा विद्या या आश्रमात घालवले. हे आश्रम महाराष्ट्रातील पवनार या गावात स्थापित आहे. आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांनी जैन धर्माप्रमाणे समाधी मरण चा मार्ग अवलंबिला व अन्नाचा त्याग केला.
15 नोव्हेंबर 1982 मध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या एका सोव्हिएत नेत्याच्या अंतिम संस्कारात जाणार होत्या, परंतु विनोबांच्या मृत्यूची बातमी ऐकुन त्यांनी तेथे जाणे रद्द केले आणि विनोबांच्या अंतिम संस्कारात सामील झाल्या.
विनोबा भावे यांचे प्रेरक मराठी सुविचार
- ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात लढण्याची शक्ति आहे की नाही याची कसोटी घेत असतो.
- जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुमचे राग व द्वेष नष्ट होत नाही आणि तोवर तुम्ही तुमच्या इंद्रियांवर ही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.
- परिश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे.
- दोन धर्मांमध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.
- प्रेम करणे ही एक कला आहे, परंतु प्रेम टिकवणे ही एक साधना आहे.
- माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत. आळस अज्ञान आणि अंधश्रद्धा.
- यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.
तर मित्रांनो वरील लेखात आपण आचार्य विनोबा भावे यांची मराठी माहिती - Vinoba Bhave Information in Marathi प्राप्त केली. आम्ही आशा करतो की ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल. ह्या लेखाला आपल्या मित्रांसोबतही नक्की शेयर करा. धन्यवाद