गौतम बुद्ध जीवनपरिचय व मराठी माहिती | Gautam Buddha information in Marathi
बौद्ध धर्माचे संस्थापक, महान दार्शनिक, धर्मगुरू आणि समाज सुधारक महात्मा गौतम बुद्ध यांनी आपल्या विचारांनी संपूर्ण जगाला एक नवीन मार्ग दाखवला. आज आपण गौतम बुद्धाबद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत. आजच्या या लेखात आपण भगवान बुद्ध यांचा संपूर्ण जीवन परिचय मिळवणार आहोत.
Gautam Buddha history in Marathi
प्रारंभिक जीवन
गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 ला कपिलवस्तू जवळ असलेल्या लुंबिनी मध्ये झाला. सध्या हे स्थान नेपाळ मध्ये स्थित आहे. गौतम बुद्ध हे कपिल वस्तू च्या महाराणी महामाया यांचे पुत्र होते. क्षत्रिय राजा शुद्धोधन हे त्यांचे वडील होते. जन्माच्या वेळी त्यांच्या आईला असह्य वेदना झाल्या या मुळे बाळाला जन्म दिल्याच्या सात दिवसातच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. बाळाचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले. गौतम गोत्रात जन्म घेतल्याने त्याने गौतम देखील म्हटले जाऊ लागले. आईच्या मृत्यूनंतर त्याचे पालनपोषण त्याची मावशी व त्यांच्या वडिलांची दुसरी राणी महाप्रजावती (गौतमी) ने केले. गौतम बुद्धांचे नाव सिद्धार्थ यासाठीही ठेवण्यात आले कारण त्यांच्या जन्माच्या वेळी भविष्यवाणी झाली की हा बालक एक महान राजा किंवा एक महान धर्म प्रचारक होईल. सिद्धार्थ शब्दाचा अर्थच सिद्ध आत्मा होतो, ज्याला बुद्धांनी आपल्या कर्माने सिद्ध केले.
बुद्धाचे शिक्षण, विवाह आणि तपस्या.
सिद्धार्थ यांनी आपले शिक्षण गुरु विश्र्वमित्र यांच्या जवळ केले. त्यांनी वेद आणि उपनिषदांचे ज्ञान प्राप्त केले. वेद- उपनिषदांसोबत त्यांनी युद्ध कलेचे शिक्षण पण प्राप्त केले. सिद्धार्थ यांना लहानपणापासून घोडस्वारी, धनुष्यबाण चालवणे आणि रथ हाकणे इत्यादी गोष्टीमध्ये रुची होती.
सिद्धार्थ यांचे लग्न 16 वर्षाच्या वयात राजकुमारी यशोधरा शी करण्यात आले आणि त्यांना एक मूल अपत्य झाले. या मुलाचे नाव राहुल ठेवण्यात आले. परंतु गौतम बुद्धांचे मन घर- संसार आणि मोहमायेत रमले नाही व ते घर परिवाराला सोडून जंगलात गेले.
.
सिद्धार्थ यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी भोग विलासाची संपूर्ण व्यवस्था केली होती. वडिलांनी आपल्या मुलासाठी तीन ऋतूनुसार तीन वेगवेगळे महाल बनवले होते. अशा पद्धतीने ऐशो आरमाच्या सर्व व्यवस्था असतानाही सिद्धार्थ यांनी आपली सुंदर पत्नी आणि मुलाबाळांना सोडून जंगलात जाऊन सत्याचा शोध घेण्याच्या निर्णय केला.
त्यांनी वनात जाऊन कठोर तपश्चर्या केली. सुरुवातीला त्यांनी थोडे फार अन्न ग्रहण केले परंतु नंतरच्या काळात काहीही न खाता तपश्चर्या सुरू ठेवली. कठोर तपामुळे त्यांचे शरीर सुखुन गेले. जवळ पास 6 वर्षे होऊन गेली. एक दिवस वनातून जाणाऱ्या महिलांच्या तोंडून एक भजन ऐकून त्यांना लक्षात आले की शरीराला कष्ट देऊन ज्ञानाची प्राप्ती होत नाही. यानंतर त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी नियमित ध्यान करने सुरू केले.
एका वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सिद्धार्थ पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले होते. तेव्हा त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला. सिद्धार्थ यांना महात्मा बुद्ध म्हटले जाऊ लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली त्या झाडाला बोधिवृक्ष म्हटले जाऊ लागले व त्या झाडाच्या आसपासच्या परिसराला 'बोध गया' म्हटले जाते.
गौतम बुद्धांचे कार्य
बुद्धांनी त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रसार करण्याच्या निश्चय केला. यासाठी त्यांनी संस्कृत भाषा ऐवजी त्या काळी प्रचलित असलेल्या पाली भाषेत आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे सुरू केले. गौतम बुद्धांनी सर्व लोकांना सरल मार्ग अवलंबण्याचा संदेश दिला. त्यांच्या ज्ञानाला बौद्ध धर्म म्हटले जाऊ लागले. बौद्ध धर्म सर्व जाती प्रथा पेक्षा वेगळा होता.
भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण
गौतम बुद्धांचे आवडत्या शिष्याचे नाव 'आनंद' होते. पाली सिद्धांत सूत्रांनुसार 80 वर्षाच्या वयात गौतम बुद्धांनी आपल्या निर्वाणाची भविष्यवाणी केली होती आणि यानंतर त्यांनी समाधी धारण केली. बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या शिष्यांनी जगभरात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार केला. यानंतर भारतासह जपान, चीन, थायलंड, कोरिया, मंगोलिया, बर्मा, श्रीलंका इत्यादी देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला.
गौतम बुद्धांचे विचार आणि मराठी सुविचार
1) एका जंगली प्राण्यापेक्षा कपटी आणि दृष्ट मित्राला जास्त घाबरायला हवे. जंगली प्राणी फक्त शरीराला नुकसान पोहोचवू शकतो परंतु एक कपटी मित्र तुमची बुद्धी ला नष्ट करू शकतो.
2) आपण जे विचार करतात तेच बनतात.
3) सर्व वाईट व चांगल्या गोष्टींची सुरुवात मनापासून होते. जर तुमचे मन पवित्र असेल तर तुमच्या हातून चुकीची कामे घडणार नाहीत.
4) क्रोध साठी शिक्षा मिळत नाही तर क्रोधामध्ये केलेल्या चुकीसाठी शिक्षा दिली जाते.
5) तीन गोष्टी कधीही लपू शकत नाही- सूर्य, चंद्र आणि सत्य.
6) हजारो शब्दांपेक्षा तो शब्द चांगला आहे जो शांती घेऊन येतो.
7) ज्या पद्धतीने आगी शिवाय मेणबत्ती पेटू शकत नाही. त्याच पद्धतीने अध्यात्मिक ज्ञानशिवाय मनुष्य प्रज्वलित होऊ शकत नाही.
8) थेंबाथेंबाने समुद्र भरत असतो.
9)आपली बुद्धी हीच आपला मित्र व शत्रू आहे.
10) जे लोक इर्षा आणि जलन ची भावना ठेवतात त्यांना कधीही सुख आणि शांती लाभत नाही.
11) जीभ असे हत्यार आहे जे रक्त काढल्याशिवाय व्यक्तीला मारून टाकते.
12) स्वतःच्या मुक्तीसाठी कार्य करा इतरांवर विसंबून राहू नका.
खुप छान
उत्तर द्याहटवा