गुढीपाडवा सणाची माहिती मराठी | Gudi Padwa Information in Marathi

गुढीपाडवा ची मराठी माहिती | Gudi Padwa information in Marathi

गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा एक भारतीय सण आहे. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो. गुढीपाडव्याला आंध्रप्रदेश व विशेषतः महाराष्ट्रात साजरे केले जाते. आजच्या या लेखात आपण गुढीपाडव्याची माहिती (Gudi Padwa information in Marathi) मिळवणार आहोत.


Gudi Padwa Information in Marathi

गुढीपाडवा काय आहे व कसा साजरा करतात? - Gudi Padwa information in Marathi

गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रात मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा होतो. गुढी पाडव्याला मराठी नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते. मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती. या दिवशी लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारतात. गुढी चा अर्थ विजय पताका असतो. गुढी उभारण्यासाठी एक स्वच्छ काठीच्या टोकावर नवे व शुभ्र वस्त्र लावले जातात. या नव वस्त्रावर झेंडूची फुले, कडुलिंबाची पाने आणि तांब्याचा लोटा लावला जातो. गुढीपाडवा घरात सुख, समृध्दी आणि आनंद निर्माण करतो.

गुढीच्या अवतीभवती रांगोळी व इतर सजावट केली जाते. पाट मांडून गोड नैवेद्य दाखवतात. उदबत्ती लावून ओवाळले जाते. यानंतर दुपारी सूर्यास्तापूर्वी हळदकुंकू ने पूजा करून अक्षदा वाहून गुढी उतरवली जाते. 


गुढी पाडवा का साजरा केला जातो? | Why Gudi Padwa is Celebrated in Marathi)

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात. त्यापैकी काही प्रमुख कथा पुढील प्रमाणे आहेत. 

मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने मनुष्य जातीची निर्मिती केली. एका कथेनुसार म्हटले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीराम आपला 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून व लंकापती रावण तसेच इतर राक्षसांचा पराभव करून अयोध्येला परत आले, त्यांचे स्वागत म्हणून अयोध्येतील लोकांनी आपापल्या घराबाहेर गुढी उभारून विजय आनंद साजरा केला. 

पुराणानुसार शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे बनवले व या पुतळ्यामध्ये प्राण फुकून त्यांना जिवंत केले. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याच्या याच दिवशी त्याने शकांचा पराभव केला. व याच शालिवाहन राजाच्या नावाने शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाली.


2024 मध्ये गुढी पाडवा केव्हा आहे? 

इंग्रजी कॅलेंडरनुसार 2024 मध्ये गुढीपाडवा 09 एप्रिल ला येणार आहे. 


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Gudi padwa wishes in marathi

1)

गुढी उभारू आनंदाची, 
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…


2)

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


3) 

चैत्राची सोनेरी पहाट, 
नव्या स्वप्नांची नवी लाट.. 
नवा आरंभ, नवा विश्वास 
नवीन वर्षाची हीच तर खरी सुरुवात 


4) मराठी नवीन वर्ष, म्हणजेच गुढीपाडव्याच्या तुमच्या संपूर्ण     कुटुंबाला शुभेच्छा.


5) समृद्धीच्या गुढी सोबत उभरुया, विश्वास आणि प्रेमाची गुढी, मनातली काढुया अढी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढी पाडव्याची मराठी माहिती (Gudi Padwa information in Marathi) शेअर केली. आशा आहे ही माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. या माहितीला आपले मित्र व कुटुंबियांसोबत नक्की शेअर कर. धन्यवाद..


हे पण वाचा:
Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने