गुढीपाडवा निबंध मराठी | Gudi Padwa Essay in Marathi

Gudi Padwa Essay in Marathi : दरवर्षी गुढी पाडव्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडवा मराठी निबंध  घेऊन आलो आहोत | Gudi Padwa Marathi nibandh तुमचे ज्ञान वाढवण्यात उपयुक्त ठरेल. तर चला सुरू करूया...


गुढी पाडवा मराठी निबंध

गुढी पाडवा मराठी निबंध | Gudi Padwa Nibandh in Marathi 

(300 शब्द)

आपल्या भारत देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणूनही ओळखले जाते. सण हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट करण्याचे कार्य करतात. सोबत मिळून सण साजरे केल्याने एकोपा वाढतो. अश्याच सणापैकी एक आहे गुढी पाडवा गुढी पाडव्याचा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो. गुढीपाडव्याला महाराष्ट्रा सोबत आंध्र प्रदेश मध्ये देखील साजरे केले जाते. परंतु या सणाचे विशेष आकर्षण महाराष्ट्रात आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा एक सण आहे. आणि म्हणूनच या सणाला मराठी सण म्हणून विशेष ओळखले जाते.

मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. असेही म्हटले जाते की त्रेतायुगमध्ये भगवान राम याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजय पताका म्हणून गुढी उभारली होती. पुराणानुसार गुढीपाडव्याची आणखी एक कथा आहे, या कथेमध्ये शालिवाहन नावाच्या एका कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे बनवले होते. असे म्हटले जाते की या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुकून त्याने शकांचा पराभव केला होता व तेव्हापासून शालिवाहन राजाच्या नावाने शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाली.

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून गुढी उभारण्यासाठी एका स्वच्छ काठीच्या टोकावर नवे व शुभ्र वस्त्र लावले जातात. या नव वस्त्रांवर झेंडूची फुले, कडूलिंबाचे पाने आणि तांब्याचा चंबू लावला जातो. या नंतर या गुढीची पूजा करून तिला घराबाहेर उभे केले जाते. गुढीच्या अवतीभवती पाट ठेवून रांगोळी व इतर सजावट केली जाते. यानंतर दुपारी सूर्यास्तापूर्वी हळद-कुंकू ने पूजा करून अक्षता वाहून गुढी उतरवली जाते. 

गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्त्व देखील आहे. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो. या वेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील कीटांचा नाश होतो. गुढी पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा म्हटले जाते. या दिवशी कुटुंबातील सर्वजण सोबत बसून गोड पदार्थांचा आस्वाद घेतात.

--समाप्त--


गुढीपाडवा मराठी निबंध | Gudi Padwa Essay in Marathi 

(200 शब्द)

आपल्या भारत दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणूनही ओळखले जाते. सण हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट करण्याचे कार्य करतात. सोबत मिळून सण साजरे केल्याने एकोपा वाढतो. अश्याच सणापैकी एक आहे गुढी पाडवा गुढी पाडव्याचा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो. गुढीपाडव्याला आंध्र प्रदेश सोबत महाराष्ट्रात साजरे केले जाते. परंतु या सणाचे विशेष आकर्षण महाराष्ट्रात आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा एक सण आहे. माझा आवडता सण गुढी पाडव्याचा आहे. 

मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. असेही म्हटले जाते की त्रेतायुगमध्ये भगवान राम याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजय पताका म्हणून गुढी उभारली होती. पुराणानुसार गुढीपाडव्याची आणखी एक कथा आहे या कथेमध्ये शालिवाहन नावाच्या एका कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे बनवले होते. असे म्हटले जाते की या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुकून त्याने शकांचा पराभव केला होता व तेव्हापासून शालिवाहन राजाच्या नावाने शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाली.

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून गुढी उभारण्यासाठी एका स्वच्छ काठीच्या टोकावर नवे व शुभ्र वस्त्र लावले जातात. या नव वस्त्रांवर झेंडूची फुले, कडूलिंबाचे पाने आणि तांब्याचा लोटा लावला जातो. या नंतर या गुढीची पूजा करून तिला घराबाहेर उभे केले जाते. गुढीच्या अवतीभवती पाट ठेवून रांगोळी व इतर सजावट केली जाते. यानंतर दुपारी सूर्यास्तापूर्वी हळद-कुंकू ने पूजा करून अक्षता वाहून गुढी उतरवली जाते. 

गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्त्व देखील आहे. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो. या वेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील कीटांचा नाश होतो. गुढी पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते. गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा म्हटले जाते. या दिवशी कुटुंबातील सर्वजण सोबत गोड पदार्थांचा आस्वाद घेतात.

--समाप्त--


वाचा> गुढी पाडव्याची संपूर्ण माहिती 


तर मित्रांनो हा होता गुढी पाडव्यावर लिहिलेला निबंध. तुम्हाला हा Gudi Padwa Marathi  Nibandh कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की कळवा. व मराठी निबंध आणि भाषणे मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट bhasahnmarathi.com ला.  


Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने