माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध। maza avadta san essay in marathi

माझा आवडता सण दिवाळी माहिती। Maza Avadta San Diwali Nibandh Marathi

maza avadta san essay in marathi: दिवाळी हा सण आपल्या देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात मोठा सण आहे. दिवाळी पूर्ण भारतात भव्यपणे साजरी केली जाते. दिवाळी फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर असलेले भारतीय व इतर देशातील विदेशी लोक सुद्धा अतिशय भव्य पणे साजरी करतात. 

आजच्या या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिवाळी निबंध मराठी, दिवाळी सणाची माहिती, Diwali Marathi essay, maza avadta san diwali  इत्यादी विषयांची माहिती मिळणार आहे. 


Diwali marathi Diwali in Marathi essay

my favourite festival marathi essay


माझा आवडता सण | Maza Avadta San Essay in Marathi (400 शब्द)

दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग तो व्यक्ती लहान असो किंवा मोठा. प्रत्येक जण या सणाला अतिशय भव्य पणे साजरा करतात. सोबतच शाळा-कॉलेज आणि कार्यालयांमध्ये सुद्धा दिवाळी अतिशय आनंदाने साजरी केली जाते. हा सण वर्षातून एकदाच ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. दिवाळी येताच लोक आपल्या घराची साफसफाई करायला लागतात. नवीन कपडे खरेदी करतात, मिठाई खातात, दिवाळीच्या दिवशी दिवे लावले जातात, देवी लक्ष्मी व गणपतीची पूजा केली जाते.


दिवाळी या सणाची हिंदू धर्माचे लोक खूप आतुरतेने वाट पाहतात. हा सण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडता सण आहे. दिवाळी हा भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध सण आहे. ज्याला पूर्ण देशात प्रत्येक वर्षी साजरे केले जाते. रावणाला पराजित केल्यानंतर, 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून भगवान राम आपले राज्य अयोध्येला परत आले होते. त्यादिवशी अयोध्येतील लोकांनी दिवाळी साजरी करून त्यांचे स्वागत केले होते. 


आज सुद्धा लोक या दिवसाला त्याच उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा दिवस एक पवित्र हिंदू सण आहे जो वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. शीख धर्माच्या लोकांद्वारे हा सण त्यांचे सहावे गुरू श्री हरगोविंदजी यांची जहांगीर बादशहाच्या कैद मधून सुटका झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो.


या दिवशी बाजाराला नववधू सारखे सजवले जाते. अनेक प्रकारचे लाईट, कंदील, फटाके, घर सजावटीचे साहित्य, मिठाई, मेणबत्या, गिफ्ट इत्यादी गोष्टींना विशेष प्रमाणात विकले जाते. बाजारात पण या सणादरम्यान विशेष गर्दी असते. लोक आपल्या घराला स्वच्छ करतात. आणि उत्सव येण्याच्या काही दिवस आधी रंगबिरंगी उजेडाने सजवतात. 


हिंदु कॅलेंडर नुसार सूर्यास्त नंतर लोक देवी लक्ष्मी आणि गणेश भगवान ची पूजा करतात. ते आशीर्वाद, आरोग्य, धन आणि उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. गोड मिठाई बनवल्या जातात. लोक या दिवशी चांगले संकल्प करतात व वाईट सवयींना त्यागतात.


दिवाळी चा पहिला दिवस धनत्रयोदशी चा असतो. या दिवशी भगवान धन्वंतरी ची पूजा केली जाते. लोक सोन्याची खरेदी देखील करतात. देवी लक्ष्मी ची पूजा व आराधना केली जाते. दिवाळी चा दुसरा दिवस नरक चतुर्दशी असतो. या दिवसाला भगवान कृष्ण ची पूजा केली जाते. भगवान कृष्ण ने याच दिवशी नरकासूर राक्षसाचा वध केला होता. 


तिसरा दिवस दिवाळी चा मुख्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला संध्याकाळी नातेवाईक, मित्र, शेजारी व जळणाऱ्या फटाक्या सोबत मिठाई आणि भेट वस्तू देत देवी लक्ष्मी ची पूजा करत साजरे केले जाते. चौथ्या दिवशी भगवान कृष्ण ची पूजा करून गोवर्धन पूजेचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या दरवाजाच्या बाहेर पूजा करून शेनापासून गोवर्धन पर्वत बनवतात. पाचवा दिवस भाऊबीजचा असतो. या दिवसाला भाऊ बहीण साजरा करतात. बहिण आपल्या भावाला आरती ओवाळते व भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेट वस्तु देतो. 


आशा पद्धतीने अतिशय आनंदात, संपूर्ण कुटुंबासोंबत दिवाळी चा हा सण साजरा केला जातो. दिवाळी च्या काळात शाळा कॉलेज ला काही दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या असतात. ज्यामुळे दिवाळी सणाचा आंनद आणखीनच वाढून जातो. आणि म्हणूनच इत्यादि अनेक कारणांमुळे माझा आवडत सण दिवाळी आहे.


तर मित्रानो हा होता माझा आवडता सण दिवाळी (maza avadta san diwali ) यावर लिहिलेला मराठी निबंध. तुम्हाला हि दिवाळी मराठी माहिती (diwali marathi mahiti) कशी वाटली आम्हाला कंमेंटस मध्ये नक्की सांगा.


माझा आवडता सण दिवाळी विडिओ पहा-



READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने