नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी निबंध | Subhash Chandra Bose Nibandh Marathi
Subhash chandra bose nibandh |
सुभाष चंद्र बोस मराठी निबंध। Subhash chandra bose essay in marathi
भारताच्या स्वतंत्र लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1887 ला ओडिसा राज्यातील कटक शहरात असलेल्या एका बंगाली हिंदू परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'जानकी नाथ बोस' व आईचे नाव 'प्रभावती' होते. जानकी नाथ हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. प्रभावती आणि जानकी नाथ बोस यांना 14 अपत्य होती. ज्यात 6 मुली व 8 मुले होते. सुभाष चंद्र हे त्यांचे 9 वे पुत्र संतान होते.
नेताजींनी आपले प्रारंभिक शिक्षण कटक मधील रेवेनशा कॉलेजियेट स्कूल मधून पूर्ण केले. त्या नंतरचे त्यांचे शिक्षण कलकत्यातील के प्रेजिडेंसी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेज मध्ये झाले. नेताजींनी 15 वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंदांचे सर्व साहित्य वाचून टाकले. कॉलेज मधील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या आई वडिलांनी, इंडियन सिव्हिल सर्व्हिस च्या तयारी साठी त्यांना इंग्लंड मधील केब्रिज विश्व विद्यालयात पाठून दिले. इंग्रज शासनाच्या काळात भारतीयांना सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाणे फार कठीण होते परंतु तरीही नेताजींनी सिव्हिल सर्व्हिस च्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले.
वर्ष 1921 मध्ये भारतात वाढत असलेल्या राजनैतिक गतिविधिंचा समाचार मिळाल्यावर बोस यांनी आपली उमेदवारी वापस घेतली व ते तत्काळ भारतात परत आले. सिव्हिल सर्व्हिस सोडल्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी झाले. परंतु महात्मा गांधी यांच्या अहिंसक विचाराशी सुभाष चंद्र बोस हे सहमत न होते. एकीकडे महात्मा गांधी हे उदार दलाचे नेतृत्व करत होते तर दुसरी कडे सुभाष चंद्र बोस हे जहाल दलाचे नेते होते. जरी महात्मा गांधी व नेताजींचे विचार भिन्न होते तरी ते दोघे ही जाणून होते की त्यांचे लक्ष एकच आहे आणि ते लक्ष होते भारताला स्वातंत्र्य करणे. म्हणूनच सर्वात आधी गांधीजीना राष्ट्रपिता म्हणून नेताजींनी संबोधित केले होते.
1938 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग ची सुरुवात केली. पण ही नीती गांधीवादी आर्थिक विचारांच्या अनुकूल नव्हती. 1939 मध्ये नेताजींनी पुन्हा एकदा गांधीवादी प्रतिद्वंद्वीला हरवून विजय प्राप्त केली. नेताजींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर, गांधीजींने म्हटले की सुभाष चंद्र बोस यांची विजय माझी पराजय आहे आणि यानंतर असे वाटायला लागले की गांधीजी काँग्रेस वर्किंग कमिटी मधून लवकरच राजीनामा देऊन देतील. गांधीजींच्या या विरोधामुळे शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः काँग्रेसला सोडून दिले.
यादरम्यानच दुसरे महायुद्ध सुरू झाले. नेताजींची मत होते की इंग्रजांच्या शत्रु सोबत मिळून स्वातंत्र्य लवकरच प्राप्त करता येईल. त्यांच्या विचारांना लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना कोलकत्यात नजर बंद केले. परंतु त्यांचा भाचा शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने ते नजरकैदेतुन मुक्त झाले व अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी जाऊन पोहोचले.
राजनीति मध्ये पूर्ण सक्रिय होण्याआधी नेताजींनी जवळपास संपूर्ण जगाचे भ्रमण केले. 1933 पासून 1936 पर्यंत ते युरोपात राहिले. तो काळ हिटलर च्या नाजीवाद व मुसोलिनी च्या फासीवाद चा होता. नाजीवाद आणि फासीवाद च्या निशाण्यावर इंग्लंड हाच देश होता, कारण इंग्लंड ने प्रथम विश्व युद्धानंतर जर्मनी वर एकतर्फी करार लादले होते. त्याचाच बदला जर्मनी इंग्लंड कडून घेणार होता. दुसरी कडे भारतावर देखील इंग्रजांचे राज्य होते, शत्रूचा शत्रू हा मित्र असतो अशी म्हण आहे म्हणून नेताजीनां हिटलर आणि मुसोलिनी मध्ये आपले भविष्यातील मित्र दिसत होते.
1937 मध्ये नेताजींनी आपली ऑस्ट्रेलियातील सेक्रेटरी एमिला शी लग्न केले. त्या दोघांना अनिता नावाची एक मुलगी सुद्धा झाली. जी सध्या जर्मनी मध्ये सहपरिवार राहत आहे.
जर्मनीत असतानाच नेताजी हिटलर ला जाऊन भेटले. त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी काही महत्त्वाची कार्य पण केली. 1943 मध्ये त्यांनी जर्मनी ला सोडून दिले व तेथून ते जपान जाऊन पोहोचले. जपान मधून सिंगापूर ला गेले. जिथे कॅप्टन मोहन सिंह द्वारा स्थापित आझाद हिंद सेना ची कमान त्यांनी आपल्या हाती घेतली. त्या काळात रास बिहारी बोस आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेता होते.
नेताजी च्या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाष चंद्र बोस यांनी सशत्र क्रांती द्वारे भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सरकार ची स्थापना केली तसेच "आझाद हिंद फौज" ला गठित केले. या संघाच्या प्रतीक चिन्ह असलेल्या झंड्यावर डरकाळी मारणाऱ्या वाघाचे चित्र होते. नेताजी आपल्या आझाद हिंद फौज सोबत 4 जुलै 1944 ल बर्मा पोहोचले. इथेच त्यांनी आपला प्रसिद्ध नारा, "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" दिला.
18 ऑगस्ट 1945 ला टोकियो जाताना तैवान जवळ हवाई दुर्घटने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला, परंतु त्यांचे मृत शरीर मिळाले नाही. म्हणूनच नेताजींच्या मृत्यूच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू आहे.
मित्रांनो या निबंधात मी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची संपूर्ण माहिती समाविष्ट केली आहे. ह्या मधून तुम्ही तुमच्या हिशोबाने आवश्यक तेवढी माहिती निबंधाला वापरू शकतात. धन्यवाद...