होळी मराठी निबंध | Holi Essay in Marathi
मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच होळी हा सण आपल्या देशातील काही प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीचा सण संपूर्ण भारतात मोठी उत्साहाने साजरा केला जातो.
आजच्या या लेखामध्ये आपण होळी सणावर मराठी निबंध पाहणार आहोत. या Holi Essay in Marathi ला आपण आपल्या अभ्यास क्रमात वापरू शकतात. हा निबंध २ री, ३ री, ४ थी, ५ वी, ६ वी, ७ वी, ८ वी, ९ वी, १० वी, ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्याना विशेष उपयुक्त आहे.
होळी निबंध मराठी | Holi Essay in Marathi
(400 शब्द)
भारतात होळी किंवा रंगपंचमीच्या सणाला रंगांचा सण म्हटले जाते. होळी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. होळीचा हा सण दर वर्षी मार्च महिन्यात किंवा या महिन्याच्या जवळपास मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी मित्र व नातेवाईकांना रंग लावून आनंद साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोक आपले दुःख विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करतात. मला इतर सर्व सणांमध्ये होळी हा सण जास्त आवडतो. आणि म्हणून माझा आवडता सण होळी आहे.
होळीचा सण साजरा करण्यामागे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक कथा सांगितली आहे. या कथेनुसार प्राचीन काळात एकदा हिरण्यकश्यप नावाच्या एका दैत्य राजाने अमरत्वाचे वरदान प्राप्त करून पृथ्वीवरील प्रजेला त्रास देणे सुरू केले. त्याची एक दृष्ट बहिण 'होलिका' होती. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते, ज्याद्वारे की सहज आगीत प्रवेश करू शकत होती. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. प्रल्हादच्या विष्णु भक्तीला कंटाळून हिरण्यकश्यपूने त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यासाठी त्याने आपली बहिण होलिका ची मदत मागितली. होलिका प्रल्हाद ला धरून आगीत जाऊन बसली, परंतु भगवान विष्णुच्या कृपेमुळे होलिका त्या अग्निमध्ये जळाली व भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर पडला. अशा पद्धतीने होलिका दहन झाले. यावरून लक्षात येते की होळी ही वाईटावर चांगल्याचा विजय दिवस आहे.
होळी चा सण दोन दिवसांचा असतो यात पहिल्या दिवशी होळी जाळली जाते तर दुसरा दिवस हा धुलीवंदनाचा असतो या दिवशी रंगपंचमी खेळून एक दुसऱ्याला रंग लावले जातात. होळी दहनासाठी सार्वजनिक ठिकाणी एका मोठ्या लाकडी दांड्याला लाऊन त्याची पूजा केली जाते. यानंतर होळीच्या मुहूर्तावर दांड्याला काढून त्याच्या चारही बाजूंना लाकडे लावली जातात. याची पूजा केल्यानंतर लाकडांना आग लावली जाते. शेतकरी आपल्या शेतातील धान्याचे काही दाणे या आगीत टाकतात. व आग शांत झाल्यावर उरलेल्या राखेमधून काही राख आपल्या घरी पूजेसाठी नेतात.
होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो. या दिवशी कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. एक दुसऱ्यावर पाणी टाकून एकमेकांना भिजवले जाते. अशा पद्धतीने मस्ती व खेळाने सर्व थकवा निघून छानसे मनोरंजन होते.
होळी व रंगपंचमी हा माझा आवडता सण असण्यामागे कारण हे आहे की हा सण एक-मेकांमध्ये एकता निर्माण करतो, प्रेम, आनंद व उत्साह वाढवतो. हा सण लहान मोठे, भाऊ बहीण, शेजारी-पाजारी सर्वांना सोबत राहून एक दुसऱ्याचे सहकार्य करण्याची शिकवण देतो. आज-काल होळी खेळताना बरेच लोक केमिकल मिसळलेल्या रासायनिक रंगांचा वापर करतात, हे रंग आपले शरीराची त्वचा व डोळ्यांना घातक ठरू शकतात. म्हणून होळी खेळताना कोरड्या गुलाल चा वापर करायला हवा. गुलाल चे कोणतेही नकारात्मक प्रभाव शरीरावर होत नाही. कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये व भांडण न करता प्रेमाने होळी खेळायला हवी.
***
वाचा> होळी सणाची संपूर्ण माहिती
माझा आवडता सण होळी - My Favourite Festival Holi in Marathi
(250 शब्द)
आपल्या देशात दर वर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. परंतु या सर्वांमध्ये माझा आवडता सण होळी आहे. होळी सणामध्ये मला रंगांचा भाग जास्त आवडतो. दरवर्षी सर्व प्रकारचे रंग माझ्याकडे असतात. परंतु माझा सर्वात जास्त आवडता रंग लाल व गुलाबी आहे. मला काळा, पांढरा व जांभळा रंग आवडत नाही. कारण हे रंग लावल्यावर चेहरा विचित्र होऊन जातो.
होळी येण्याच्या काही दिवस आधीच मी या सणाच्या तयारीला लागून जातो. मी माझे जुने पण न फाटलेले कपडे बाहेर काढतो. त्यांना पाण्याने धुऊन स्वच्छ करतो. होळीच्या दिवशी आम्ही कुटुंबाचे सर्व सदस्य तसेच आमच्या कॉलनीतील मित्रमंडळी एकमेकांना रंग लावतो. या दिवशी एकामेकांवर पाणी उडवले जाते. एकमेकांना गुलाल लाऊन खूप मजा केली जाते. या दिवशी प्रत्येक जण आपआपले दुःख बाजूला ठेवून आनंदी होतो.
होळीच्या या दिवशी मला माझी आई ने बनवलेल्या करंज्या खायला आवडते. आमच्या घरात होळीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळे गोड-धोड पदार्थ बनवले जातात. माझे वडीलही यादिवशी बाजारातून मिठाई विकत आणतात. व यानंतर आम्ही सर्वजण या पदार्थांचा आस्वाद घेतो.
होळी शी संबंधित मला एक वाईट अनुभवही आलेला आहे. एका वर्षी मी होळी खेळण्यात इतका दंग झालो की मला वेळेचे भानच राहिले नाही. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मी घरी परत आलो. परंतु मला उशीर झाल्याने पाण्याची टाकि पूर्णपणे खाली झाली होती व मला आंघोळीला पाणी शिल्लक नव्हते. यानंतर जवळपास तीन तास वाट पाहिल्यानंतर रात्रीच्या नऊ वाजेला मी आंघोळ केली. या अनुभवानंतर मी दरवर्षी होळी खेळणे लवकर संपवून घरी परततो.
***
माझा आवडता सण दिवाळी <<READ HERE
तर मित्रांनो या लेखात आपण होळी या विषयावर होळी मराठी निबंध - Holi Essay in Marathi पाहिलेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा. व या निबंधाला आपल्या मित्रांसोबाठी शेअर करा.