मोर बद्दल 25 तथ्य मराठी माहिती Information About Peacock in Marathi

मित्रांनो आपल्या देशात अनेक प्रकारचे पक्षी प्राणी आढळतात. त्यातील काही प्राणी-पक्षी दिसण्यात अतिशय सुंदर आणि मनमोहक असतात, त्यांचे सौन्दर्य मनाला मोहून घेते. अश्याच पक्ष्यामधून एक आहे मोर. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. आज आपण peacock information in marathi म्हणजे मोराबद्दल मराठी माहिती मिळवणार आहोत. 


Peacock information in Marathi

 • मोर peacock हा अतिशय सुंदर पक्षी आहे नीळा मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि हा संपूर्ण भारतात आढळतो. 
 • मोर हिरव्या आणि लाल रंगाचे असतात. त्याची मान आणि छाती निळ्या रंगाची असते. 
 • मोराच्या शेपटीमद्धे खूप सारे पीसे असतात, या पिसाना 'मोरपिस' म्हटले जाते. याच्या पिसांचा पुढचा भाग चंद्र सारखा असतो. 
 • एका मोराच्या शेपटीत 150 पिसे असू शकतात. 
 • मोर हा भारतासह म्यानमार देशाचा पण राष्ट्रीय पक्षी आहे. 
 • मोराच्या डोक्यावर हिरवा पिसारा असतो याला मोराचे मुकुट देखील म्हटले जाते. 
 • मोराचे शरीर जरी सुंदर दिसत असले तरी त्याचे पाय दिसण्यात लांब आणि कुरूप असतात. 
 • मोरचा आवाज कठोर असतो. 
 • पावसाच्या काळात मोर आपल्या पिसाऱ्याला पसरून नृत्य करतो. मोराचे नृत्य मनमोहक असते. 
 • मोर हा नर असतो व मादी ला मोरणी म्हटले जाते. 
 • मोरणी मोराएवढी सुंदर नसते तिच्याकडे पिसारा नसतो. 
 • मोर Peacock चे अन्न हे धान्याचे दाणे, झाडाची पाने, फळे, किडे, साप, पाल इत्यादि असते.
 •  मोराचा जीवन कालावधी 20 वर्षापर्यंत असतो, त्यांचे वजन 5 किलो पर्यन्त असू शकते. 
 • मोरचे विज्ञानिक नाव 'पावो क्रिसटेटस' आहे. 
 • मोरच्या अति शिकारीमुळे त्यांची संख्या दिवसे दिवस कमी होत आहे. 
 • भारत वन्यजीव नियम 1972 नुसार मोरची peacock शिकार करणे कायद्याने अपराध आहे. 
 • मोरच्या समूहात एक नर व 3 ते 4 मादी मोरणी असतात. मोरणी प्रत्यक वर्षात 2 वेळा अंडी घालते. 
 • तसे पाहता मोराला हवेत उडता येते पण इतर पक्ष्याप्रमाणे तो जास्त वेळ हवेत उडू शकत नाही. या मुळे तो जमिनीवरच राहतो व तेथेच आपले घरटे करतो. 
 • संस्कृत भाषेत मोरला (peacock) मयूर म्हटले जाते. 
 • प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये मोराचा उल्लेख केलेला मिळतो. मोरला भगवान शंकरजी चे पुत्र कार्तिकेय चे वाहन म्हटले गेले आहे. या शिवाय भगवान कृष्णाच्या डोक्यावर पण मोरपिस लावलेले असायचे. 
 • भारत एवजी मोर हा नेपाळ, भुटान, पाकिस्तान या देशामध्ये आढळतो. 
 • मोरला पाऊस येण्याचे संकेत आधीच लक्षात येऊन जातात. 
 • जेव्हा मोरचे peacock प्राण संकटात असतात तेव्हा ते मोठ्याने आवाज करतात, कुत्रा, मांजर या सारख्या प्राण्यापासून मोरला धोका असतो. 
 • मोर शाकाहारी व मांसाहारी दोघी तऱ्हेचे भोजन करतात. 
 • मोर व सापच्या युद्धात मोर नेहमी जिंकतो, मोरला साप खायला आवडतात. 
Note: या लेखामध्ये मोर म्हणजेच information about peacock in marathi देण्यात आली आहे. ही माहिती आपण आपल्या शाळा कॉलेज तसेच इतर ठिकाणी बिनधास्त वापरू शकतात. 

अधिक माहिती वाचा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने