क्रिसमस (नाताळ) मराठी निबंध | Christmas Essay in Marathi

Essay on Christmas in Marathi : आज क्रिसमस चा सण फक्त क्रिश्चन देश नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. क्रिसमस ला मराठी भाषेत नाताळ म्हटले जाते. आजच्या या लेखात आपण क्रिसमस वर नाताळ निबंध मराठी पाहणार आहोत. क्रिसमस चे हे दोघे ही मराठी निबंध आपण आपल्या शाळा कॉलेज साठी वापरू शकतात.. तर चला सुरू करू. 


Christmas marathi essay, christmas nibanddh marathi. 25 december

नाताळ मराठी निबंध - Christmas Nibandh in Marathi

ख्रिसमस किंवा नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबर ला साजरा केला जातो. याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता. ख्रिसमस हा क्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे. पण आजकाल ख्रिश्चन धर्मा ऐवजी भारतात हिंदू व अन्य धर्माचे लोक पण या सणाला साजरा करतात. भारतात ख्रिसमस सणांची प्रमुखता वाढत आहे. येशू ख्रिस्त उच नीच व भेदभाव मानत नसतं. त्यांनी जगभरातील लोकांना प्रेम आणि एकतेने राहण्याचा संदेश दिला. ख्रिसमस या साठी पण महत्त्वपूर्ण आहे कारण याच्या पाच दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होते. या मुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटचे 10 दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेले असतात.


लहान मुले ख्रिसमस ची आतुरतेने वाट पाहतात. या दिवशी सॅन्टाक्लॉज ची वाट पाहिली जाते. ख्रिसमस क्रिश्चन धर्मीयांचा सर्वात मोठा सण आहे, ज्याला थंडीच्या दिवसात साजरे केले जाते. या दिवशी सर्व सरकारी शाळा, कॉलेज, ऑफिस बंद राहतात. ख्रिसमस सणाला लोक उत्साहाने साजरा करतात या दिवशी घर व दुकाने सजवल्या जातात. ख्रिसमस च्या काही दिवस आधीच लोक आपल्या घरांना वेगवेगळ्या रंगाच्या लाईटनिंग ने सजवतात. बाजारात क्रिसमस ट्री, केक, सॅन्टाक्लॉज चे लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे, गिफ्ट इत्यादी सामान मिळायला लागते. 25 डिसेंबर क्रिसमस डे च्या दिवशी लोक चर्च मध्ये जाऊन मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करून परमेश्वर येशू ख्रिस्तांना आठवण करतात. या दिवशी लोक आपल्या घरात क्रिसमस ट्री सजवतात आणि एक दुसऱ्याला केक खाऊ घालून शुभेच्छा देतात.


संताक्लॉज च्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती मुलांना चॉकलेट व बक्षिसे देऊन जातो. संपूर्ण जगात ख्रिसमस आनंदाने साजरा केला जातो. हा सण लोकांना एक दुसऱ्याशी जोडतो. ख्रिसमसचा सण लोकांना एक दुसर्यासोबत मिळून-मिसळून राहण्याचा संदेश देतो व परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे शिकवल्या गेलेल्या शिकवणी क्षमा, बंधुत्व आणि त्याग यासारख्या गोष्टी आत्मसात करायला बोध देतो.

***


नाताळ शुभेच्छा संदेश << वाचा येथे


क्रिसमस मराठी निबंध - Christmas Nibandh in Marathi 

ख्रिश्चन धर्माचे लोक प्रति वर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा करतात. हा सण ख्रिश्चन धर्माचा याचा सर्वात मोठा सण आहे या दिवशी जीजस ख्राईस्ट यांचा जन्म झाला होता या दिवसाला मोठा दिवस म्हणून देखील संबोधले जाते. जीजस ख्राईस्ट यांना येशू ख्रिस्त असेही म्हटले जाते. त्यांनी मानव जातील प्रेम व क्षमा करणे शिकवले. त्यांना ख्रिश्चन धर्माचे जन्मदाता मानले जाते. 


ख्रिसमसचा सण संपूर्ण जगात अतिशय उत्साहाने साजरा होतो. जगातील ज्या ज्या देशात ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात तिथे हा सण साजरा केला जातो. त्या दिवशी ख्रिश्चन धर्मीय लोक चर्चमध्ये जातात व येशू परमेश्वराला प्रार्थना करतात. येशू ख्रिस्त मानवजातीसाठी सुळीवर लटकले होते. पण या नंतर ते परत एकदा जिवंत झाले. व लोकांना प्रेम आणि क्षमा शिकवली. ज्या लोकांनी त्यांना सुळीवर चढविले होते त्यांना देखील येशूंनी क्षमा केली. येशू ख्रिस्ताच्या चमत्कारांच्या कथा बायबल मध्ये सांगितल्या गेल्या आहेत. 


ख्रिसमसचा सण आनंद साजरा करण्यासाठी असतो. या दिवसाची तयारी करीत आधीपासूनच घराची साफसफाई केली जाते. घरात नवीन फर्निचर विकत घेतले जाते. ख्रिसमस च्या दिवशी घालण्यासाठी नवीन कपडे विकत आणले जातात. दुकानात केक आणि मिठाई साठी ऑर्डर दिल्या जातात. घरात अतिथी पाहुण्यांचे आगमन सुरू होते. बाजार नववधू सारखे सजून गेलेले असतात. डिसेंबरमध्ये कडाक्‍याची थंडी पडलेली असते तरीही लोक उत्साहाने हा सण साजरा करतात.


ख्रिसमसच्या दिवशी घरात सकाळपासूनच तयारी सुरु होते. आंघोळ करून चर्चमध्ये जाण्याची तयारी सुरू होते. चर्चला देखील या दिवशी सजवले जाते तिथं मेणबत्त्या लावून येशू ख्रिस्ताचा समोर प्रार्थना केली जाते. चर्चमधील पाध्री विधिवत पूजा व अनुष्ठान करतात. काही काही ठिकाणी धार्मिक प्रवचन पण दिले जातात.


घरात केक व स्वादिष्ट पकवान बनवले जातात. व सर्वजन मजा घेऊन हे पदार्थ खातात. शेजारी कोणत्याही धर्माचा असो त्याला देखील या मेजवानीत समाविष्ट केले जाते. ख्रिसमसच्या दिवशी संता क्लोज ला खूप आठवण केले जाते. सांताक्लॉज लांब केस, पांढरी दाढी व लाल पांढरे कपडे घातलेला एक व्यक्ती असतो. सांताक्लॉज ख्रिसमस च्या दिवशी येतो व मुलांना चॉकलेट, फुगे, मिठाई, कपडे असे वेगवेगळे गिफ्ट देऊन जातो. लहान मुलांना आनंदित करण्यासाठी बरेच लोक या दिवशी सांताक्लॉज चे कपडे घालून येतात.


अशा पद्धतीने ख्रिसमस चा हा सण सर्वांसोबत मिळून राहण्याच्या संदेश देतो. येशू ख्रिस्तांचे मत होते की दिन दुःखितांची सेवा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.

***


तर मित्रानो हे होते नाताळ या सणावर लिहिलेले नाताळ निबंध मराठी हे निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की सांगा. Essay on christmas in marathi या लेखात काही चूक असेल तर आपण आम्हास कळवू शकतात.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने