[माझा आवडता छंद वाचन] मराठी निबंध। Maza Avadta Chand in Marathi

माझा आवडता छंद: मित्रांनो छंद ही एक अशी गोष्ट असते जी व्यक्तीला आंनद मिळवून देते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त आहे. परंतु आयुष्याचा खरा आंनद अनुभवण्यासाठी एक छंद जोपासणे आवश्यक आहे. 

आजच्या या लेखात मी तुम्हाला maza avadta chand बद्दल सांगणार आहे. माझा आवडता छंद हा पुस्तके वाचण्याचा आहे. तर चला सुरू करूया..   


Maza Avadta Chand

माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी | maza avadta chand (300 शब्द)

आजच्या जगात ज्ञान हेच शक्ती आहे. म्हणून वाचनाचे महत्त्व देखील खुप आहे. मी वाचनाची आवड जोपासली आहे. वाचन हाच माझा छंद आहे. छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आनंद वाटतो. छंद हा पैसे कमवण्यासाठी नाही तर थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. काही छंद खर्चिक असतात तर काही कमी खर्चात ही केले जातात. वाचन हा सर्वात कमी खर्चात जोपासला जाणारा छंद आहे.


इंग्रजीत एक म्हण आहे "रीडींग मेक्स मैन परफेक्ट" याचा अर्थ होतो की वाचन व्यक्तीला योग्य बनवते. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात ते आपल्याला नैतिक सल्लाही देतात. परंतु जर आपली निवड चांगली नसेल तर वाचनाच्या पूर्ण आणि योग्य उपभोग आपण घेऊ शकत नाहीत. अयोग्य सामग्री असलेल्या पुस्तके मी वाचत नाही. महान लेखकांनी लिहिलेली पुस्तके माझ्या मेंदूला अधिक तीक्ष्ण बनवतात आणि विचार करायला ही चालना देतात. 


मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. आत्मचरित्र आणि तात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात. याशिवाय मला प्रवासा वरील पुस्तके वाचायला आवडतात, ते मला संपूर्ण जग फिरवतात. वाचनातून आनंद आणि ज्ञान दोघेही मिळतात. जे मला खूप साऱ्या ठिकाणी मार्ग दाखवतात. पुस्तकांनी मला नम्र बनवले आहे. त्यांनी मला वेगवेगळ्या लोकांना ओळखण्यात मदत केली आहे. यामुळे वाचन हा माझा छंद बनलेला आहे.


महान लेखकांची पुस्तके मला ज्ञान देतात. जर मला एकदा वाचल्यावर पुस्तक समजले नाही तर मी ते पुन्हा पुन्हा वाचतो. महान लेखकांची पुस्तके आपल्या प्रतिभेला आव्हान देतात आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात. एका पद्धतीने ते आपल्या मेंदूला अन्न देतात. खरोखरच पुस्तके आपली प्रिय मित्र असतात. ज्या व्यक्तीच्या छंद पुस्तके वाचणे असतो तो कधीच एकटा नसतो.


शेवटी निष्कर्ष एवढाच आहे की पुस्तके वाचन हा सर्वात चांगला छंद आहे. यात शंका नाही की पुस्तकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे पण आपण पुस्तके लायब्ररीमधून सुद्धा वाचू शकतो. वाचन करायला दुसरे काहीही लागत नाही. वाचनाची ही आवड मी भविष्यातही जोपासत राहिल आणि तुम्हा सर्वांनाही माझा सल्ला आहे की तुम्हीही वाचनाचा छंद जोपासा.


Also Read:  वाचनाचे महत्व निबंध 


माझा छंद निबंध | Maza Avadta Chand Vachan Marathi Essay (400 शब्द)

प्रत्येक व्यक्तीची काही ना काही आवडते, यालाच छंद असे म्हटले जाते. छंद हे आनंद मिळवण्यासाठी जोपासले जातात. छंद जोपासल्याने कामात उत्साह वाढतो. माझा आवडता छंद पुस्तके वाचन आहे. मी गोष्टीची पुस्तके, साप्ताहिके, वर्तमानपत्र आणि इतर माहिती ची पुस्तके वाचतो. 


मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून वाचन हा माझा छंद आहे. माझ्या आई वडिलांनी पण हा छंद जोपासण्यात माझी सहायता केली आहे. मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला छान छान गोष्टींची पुस्तके आणून दिली होती. लहान असतानाच बाराखडी ची पुस्तके वाचून मी वाचणे शिकलो होतो. त्यानंतर मी सोप्या सोप्या पऱ्यांच्या कथा व इतर लहान मोठ्या गोष्टी वाचू लागलो. 


नित्य वाचन केल्याने माझे ज्ञान वाढत आहे. नवनवीन गोष्टी शिकायला मिळतं आहेत. वैज्ञानिक माहिती असलेली पुस्तके मला वाचायला जास्त आवडतात. जगातील आश्चर्य, अंतरिक्ष ची माहिती, समुद्रातील तसेच धरतीवरील प्राण्यांची माहिती, तंत्रज्ञानातील नव नवीन शोध इत्यादी माहिती मी पुस्तकातून मिळवत आहे. 


वाचनाचा अजून एक फायदा असा आहे की आता माझी स्मरणशक्ती वाढली आहे शाळेच्या अभ्यासातील बऱ्याच गोष्टी मी आधीच वाचून टाकल्या आहेत. या मुळे मला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही. असे म्हणतात की वाचनाचे कोणतेही वय नसते, प्रत्येक वायातील व्यक्ती वाचन करू शकतो. 


मी वाचनाने निसर्गाबद्दल, झाडा झुडपांबद्दल अधिकाधिक मदहिती मिळवली आहे. प्राचीन काळाचा इतिहास मी वाचलेला आहे. आजच्या आधुनिक युगात तर एका क्लिक वर मोबाइल च्या सहायाने माहिती मिळवली जाते. आज कोणतीही माहिती हवी असल्यास ग्रंथालय मध्ये जाऊन पुस्तके शोधण्याची आवश्यकता देखील नाही. घरबसल्या तुम्ही मोबाइल मध्ये माहिती शोधू शकतात.    


माझे मत आहे की जो व्यक्ति पुरेसे वाचन करतो तो स्वतःला दुसऱ्यासोबत लवकर मिसळून घेतो. इतर लोकांच्या तुलनेत असा व्यक्ति चांगले संभाषण करतो. या मागे कारण एवढेच आहे की वाचनाने आपली बुद्धी अधिक तेज होते. माझ्या दृष्टीत तरी वाचनाची सवय ही सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. वाचकाची पुस्तके खूप चांगली मित्र असतात. व पुस्तक वाचक कधीही एकटा नसतो. जरी व्यक्तीकडे खूप सारे धन असले तरी जर त्याच्याकडे ज्ञान नसेल तर तो दारिद्रच राहतो. 


पुस्तके वाचकापुढे खूप सारी माहिती आणि नवनवीन तथ्य ठेवत असतात. ही माहिती आपल्याला रोजच्या कार्यामध्ये मदत करते. म्हणून मी वाचनाची ही आवड कायम जोपासत राहील व नवनवीन माहिती मिळवत राहील.


Download PDF for this essay-


माझा आवडता छंद वाचन व्हिडिओ पहा-


अधिक वाचा-

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने