शारदीय नवरात्रीची माहिती | Navratri Information in Marathi

नवरात्री हा सनातन धर्माव्दारे साजरा केला जाणारा एक महत्वाचा सण आहे. नवरात्री मध्ये दुर्गा देवीची पूजा उपासना केली जाते. नवरात्री म्हणजेच नऊ रात्री, या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जात असतो. हा सण भारतासह नेपाळ व हिंदू धर्मीय असणाऱ्या जवळपास सर्वच देशांमध्ये साजरा केला जातो.

या लेखात आपणास नवरात्री सणाची माहिती (Navratri Information in Marathi) देण्यात आलेली आहे. सनातन धर्माचा प्रमुख सण असणाऱ्या नवरात्रीची माहिती आपण सर्वांनी नक्की वाचायला हवी आणि इतरांसोबत देखील शेअर करायला हवी.



नवरात्रीची माहिती - Navratri Information in Marathi


भारतात नवरात्री च्या नऊ दिवसांमध्ये देवीची पूजा आराधना केली जाते, देवी दुर्गेची पूजा करण्याची कारणे ही वेगवेगळी आहेत. हिंदू धर्माच्या कथांनुसार असे मानतात की, दुर्गा देवीने नवरात्रि च्या या काळात महिषासुर नावाच्या राक्षकाचा वध केला होता. आणि म्हणूनच वाईटावर चांगल्याच प्रतीक दर्शवण्यासाठी दुर्गा पूजा केली जाते.


नवरात्री रंग 2023 | Navratri Colours 2023 in Marathi 


नवरात्री च्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे कपडे परिधान केले जातात. पुढील तकत्यात आपणास कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याबद्दल माहिती देत आहोत.


दिवस रंग देवीच पूजन
पहिला (15 ऑक्टोबर 2023) पांढरा शैलपुत्री
दुसरा (16 ऑक्टोबर 2023) लाल ब्रांहमचारिणी
तिसरा (17 ऑक्टोबर 2023) निळा चंद्रघंटा
चौथा (18 ऑक्टोबर 2023) पिवळा भौम
पाचवा (19 ऑक्टोबर 2023) हिरवा स्कंदमाता
सहावा (20 ऑक्टोबर 2023) करडा कात्यायनी
सातवा (21 ऑक्टोबर 2023) नारंगी कालरात्रि
आठवा (22 ऑक्टोबर 2023) मोरपंखी महागौरी
नववा (23 ऑक्टोबर 2023) गुलाबी सिद्धिदात्री


नवरात्री देवीच्या नऊ रूपांची नावे आणि माहिती


  1. शैलपुत्री देवी - नवरात्री च्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री ची पूजा होते. शैलपुत्री देखील दुर्गा देवीचेच एक रूप आहे. देवीच्या या रूपाने शैलपुत्र हिमालयाच्या घरी जन्म घेतला होता. या रूपामध्ये देवी आपल्याला वृषभ (बैल) वर विराजमान झालेली पाहावयास मिळते. देवीच्या एका हातामध्ये त्रिशूल आणि दुसऱ्या हातामध्ये कमळाचे फूल आहे. असे मानले जाते की, दुर्गा देवीच्या या रुपाची पूजा ही आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर आहे.
  2. ब्रह्मचारीनी देवी - नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्राह्मचारीनी पूजा केली जाते. देवीने या रूपामध्ये महादेवाला आपले पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले होता. देवीने आपल्या या रूपामध्ये एका हातामध्ये कमंडल आणि दुसऱ्या हातामध्ये जप करण्याची माळा धरलेली आहे. या दिवशी देवीला साखरेचा नैवद्य दाखवला जातो. देवीच्या या रुपाच पूजन केल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते.
  3. चंद्रघटा देवी - तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाची पूजा केली जाते. अस म्हटल जात की हे देवीच उग्र रूप आहे तरीदेखील देवीच्या या रुपामुळे भक्तांना विवीध त्रासांपासून मुक्ती मिळते. देवीच्या या रूपामध्ये देवीचे 10 हात आहेत आणि सर्व हातामध्ये देवीने शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीचे हे रूप पाहून असे वाटते की देवी युद्धासाठी तयार आहे.
  4. कूष्माण्डा देवी - चौथ्या दिवशी कूष्माण्डा देवीचे पूजन केले जाते. आणि अस मानले जात की देवीच्या या रुपामुळेच ब्रम्हांडाची निर्मिती झालेली होती. देवीच्या या रूपामध्ये देवीचे 8 हात आहेत आणि यापैकी 7 हातांमध्ये कमंडल, धनुष्य बाण, कमळ, अमृत कळस, चक्र आणि गदा आहेत. देवीच्या आठव्या हातामध्ये इच्छेनुसार वर देणारी जप माळा असते. अर्थात ही माळा भक्तांना इच्छेनुसार वरदान देत असते.
  5. स्कंदमाता देवी - नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रुपाची पूजा केली जाते. देवीच्या या रुपाची पूजा केल्याने भक्तांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याबरोबरच मोक्ष प्राप्ती सुध्दा होते. नवरात्रीच्या या दिवशी देवीला जवस (अळशी) नावाच्या औषधीचे अर्पण केल्याने वातावरण बदलानुसार होणारे आजार होत नाहीत आणि व्यक्ति निरोगी राहतो. देवीच्या या रूपामध्ये देवी कमळावर विराजमान आहे. या रूपामध्ये देवीचे ४ हात आहेत. यापैकी २ हातांमध्ये कमळ व तिसऱ्या हातामध्ये माळा आणि चौथ्या हाताने देवी भक्तांना आशीर्वाद देत असते.
  6. कात्यायिनी देवी - नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायिनी या रुपाची पूजा केली जाते. देवीच्या या रुपाला कात्यायन ऋषीने कठीण तपश्चर्या करुन प्रसन्न केले होते. देवीने आपल्या याच रूपात महिषासुर राक्षसाचा वध केला होता. अस म्हटल जात की कृष्ण देवाला प्राप्त करण्यासाठी गोपिकांनी याच देवीच्या रुपाची पूजा केली होती. देवीच्या या रूपामध्ये जर विवाहित स्त्रिया तसेच अविवाहित मुलींनी देवीची शुद्ध मनाने पूजा केली तर त्यांच्या वैवाहिक समस्या दूर होतात आणि मनासारखा वर मिळतो.
  7. कालरात्री देवी - सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री रुपाची पूजा केली जाते. काही लोक कालरात्री देवीला कालिका देवी समजतात पण तस नाही दोन्ही देवीचे वेगवेगळे रूपे आहेत. देवीच कालरात्री रूप फार भयानक आहे या रूपामध्ये देवीने एका हातामध्ये त्रिशूळ व दुसऱ्या हातामध्ये तलवार धारण केलेली आहे.आणि देवीने या रूपामध्ये तलवारीची माळा घातलेली आहे. देवीच्या या रूपातील पुजेमुळे सर्व विध्वंस शक्तींचा नाश होतो.
  8. महागौरी देवी - आठव्या दिवशी या देवीच्या रूपाच पूजन केल जात.हे रूप खूप सौम्य आणि सुंदर आहे. देवी या रूपामध्ये वृषभ वर विराजमान आहे. देवीने हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू घेतलेला आहे. दुसऱ्या 2 हातांनी भक्तांना आशीर्वाद देत आहे. अस मानल जात की,  या रुपात भगवान महादेवांनी देवीला गंगा जलाने अभिषेक केले होते, म्हणून देवीला गौर वर्ण प्राप्त झाला आहे.
  9. सिद्धिदात्री देवी - नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. या पुजनाद्वारे दुर्गा देवीची पूजा ही संपन्न होते आणि भक्तांना सिध्दी प्राप्त होतात. या रूपामध्ये देवी ही कमळावर विराजमान आहे. पण असे मानले जाते की, देवीच वाहन हे सिंह आहे. या रूपामध्ये देवीचे 4 हात आहेत आणि या 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेले आहे.


वर्षभरात येणाऱ्या सर्व नवरात्री


वर्षभरात 5 प्रकारच्या नवरात्री येतात. या पाच नवरात्री कोणत्या आहेत त्याबद्दलची माहिती पुढे देण्यात आलेली आहे. 


  1. शारदीय नवरात्री - ही मुख्य नवरात्री असते. ज्याला महानवरात्री अस देखील म्हटल जात. ही नवरात्री आश्विन शुक्ल पक्षापासून सुरू होते आणि नऊ दिवस साजरी केली जाते. नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा असतो. त्याच्या 20 दिवसांनंतर दिवाळी हा सण साजरा केला जातो. शरद महिन्यात येते म्हणून या नवरात्रीस शारदीय नवरात्र असे देखील म्हणतात. 2023 साली शरद नवरात्री 15 ऑक्टोबर ला सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर पर्यंत चालेल.
  2. चैत्र नवरात्री - या नवरात्रीस वसंत नवरात्री सुद्धा म्हटल जात.ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते.या नवरात्री सोबतच हिंदू कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची सुरुवात होते.ही मार्च एप्रिल या वेळी येत असते. या नवरात्री च्या नवव्या दिवशी , रामनवमी हा सण साजरा केला जातो. म्हणुन या नवरात्रीला राम नवरात्री या नावाने सुध्दा ओळखल जात.जी रीत , पुजा ही शरद नवरात्री मध्ये होते ती या नवरात्री मध्ये देखील होते.ही नवरात्री उत्तर भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये गुढी पाडवा आणि आंध्र प्रदेशमध्ये उगडी सोबत चालू होते. या वर्षी 2023 मध्ये चैत्र नवरात्री 21 मार्चला सुरू होऊन 30 मार्च का संपेल.
  3. माघ नवरात्री - ही गुप्त नवरात्री माघ महिन्यामध्ये म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या वेळी येते. ही नवरात्री फार कमी ठिकाणी प्रसिद्ध आहे .उत्तर भारताच्या काही भागामध्ये जा पंजाब , हरियाणा , उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी साजरी होते. या वर्षी 2023 मध्ये ही गुप्त नवरात्री 22 जानेवारी पासून 30 जानेवारी पर्यंत चालेल.
  4. आषाढ नवरात्री - ही आषाढ महिन्यामध्ये येते. ही सुद्धा गुप्त नवरात्री आहे. जी जून - जुलै मध्ये येत असते.या नवरात्रीस गायत्री किंवा शाकंभरी नवरात्री या नावांनी सुद्धा ओळखल जात.या वर्षी 2023 मध्ये ही 19 जून ला सुरु होईल व 28 जून ला समाप्त होईल.
  5. पौष नवरात्री - ही पौष महिन्यामध्ये येणारी नवरात्री आहे.जी डिसेंबर - जानेवारी महिन्यात येते.


तस तर या सर्व नवरात्रिंपैकी जी आश्विन महिन्यात येते त्याच वेळी दुर्गा देवीच्या पुजनाचं विशेष महत्व आहे. याच नवरात्रीला वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गा देवीचे विधिनुसार पूजन केले जाते.


नवरात्रीचे महत्व - Importance of Navratri in Marathi


ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्री चे महत्व


ज्योतिष शास्त्रानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीला विशेष महत्व आहे कारण या नवरात्रीच्यावेळी किंवा जवळपास सूर्याच्या राशी मध्ये बदल होतो.चैत्र नवरात्रीपासून नवीन वर्षाच्या पंचांगाची गणना सुरू होते. नवरात्रीमध्ये देवी  आणि नवग्रहांच्या पूजेचं कारण हे सुद्धा आहे की , ग्रहांची स्थिती पूर्ण वर्षभर चांगली राहो त्याबरोबरच जीवन आनंदाने भरलेलं राहो.


धार्मिक महत्व 


धार्मिक दृष्टिकोनातून देखील नवरात्रीच विशेष महत्व आहे.याच  वेळी आदिशक्ती ज्यांनी पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने झाकलेल आहे. ज्यांच्या शक्तीमुळे सृष्टी एकत्र येते आणि जी भोग आणि मोक्ष देणारी देवी आहे ती पृथ्वीवर आहे म्हणून देवीची पूजा केली जाते.चैत्र नवरात्रीच्या आधी देवी प्रकट झालेली होती आणि देवीच्या म्हणण्यानुसार ब्रम्हाजींनी सृष्टी निर्माण करण्याचं काम चालू केलं होत.


आध्यात्मिक दृष्ट्या महत्व


नवरात्री मध्ये ९ शक्तींच्या पूजनाबरोबरच ९ विद्या पूजल्या जातात. ९ औषधींच पूजन देखील असत. या नवरात्रीमध्ये ध्यान , चिंतन आणि मनन हे आध्यात्मिक विकासाच्यासाठी केल जात.जो साधक असतो त्यासाठी नवरात्रीमध्ये केलेली साधना ही अधिक फळ देणारी असते.


वैज्ञानिक दृष्ट्या महत्व 


विविध संतांनी याला अधिक महत्व दिलेले आहे.याच वैज्ञानिक कारण समजण गरजेचं आहे.रात्री  सगळीकडे शांतीचे वातावरण असते , तंत्र मंत्र इत्यादी अलौकिक गोष्टीसुद्धा होत असतात.रात्रीच्या वेळी ध्यान केंद्रित करणे सोपे असते. याच शांतीच्या वातावरणामध्ये मंत्राचा जप केल्याने ते आपणास लाभदायक ठरते. त्याबरोबरच प्रकृतीमधील विविध अडथळे दूर होतात.या वेळेचा वापर हा मानसिक शक्ती त्याबरोबरच यौगिक शक्ती मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.


नवरात्री कुठे कुठे साजरी केली जाते


बंगाल मध्ये या आठ दिवसात खूप मोठ्या प्रकारे देवीचे पूजन केले जाते. बंगालमध्ये दुर्गा देवीची पूजा ही सप्तमी पासून नवमी पर्यंत होत असते. हे तीन दिवस पूर्ण बंगाल दुर्गा देवीच्या पुजेमध्ये बुडलेल असत. नवमी च्या शेवटच्या दिवशी पुष्पांजली देतात व महिला कुंकुची होळी खेळतात.


पंजाब मध्ये या सणाला नवरात्रा अस म्हटल जात. इथ पहिल्या सात दिवशी व्रत ठेवलं जात. आठव्या दिवशी व्रत तोडतात , आणि मुली आहार घेतात. उत्तर भारतामध्ये नवरात्री मध्ये रामलीला च आयोजन केल जात.


गुजरात, मुंबई मध्ये नवरात्री म्हणजे गरबा रास , दांडिया रास च आयोजन हे छोट्या तसेच मोठ्या रूपामध्ये केल जात. गुजरात मध्ये आता सरकारच्या व्दारे नवरात्री फेस्टीवल साजरा केला जातो. इथ देशामधून तसेच विदेशामधून लोक जातात आणि या कार्यक्रमात भाग घेतात.


महाराष्ट्रामध्ये देखील घटस्थापनेला विशेष महत्व आहे. लोक नवरात्री च्या पहिल्या दिवशीची तयारी ही जल्लोषाने करतात. नऊही दिवस विविध मंडळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामध्ये महिला जास्त प्रमाणात सहभागी होत असतात.


तमिळनाडू मध्ये देवीच्या पायाचे ठसे आणि प्रतिमेला घरघरामध्ये स्थापित करतात. ज्याला गोलू किंवा कोलू अस म्हटल जात.


कर्नाटकमध्ये नवमीच्या दिवशी अयुध्य पूजा होते. तसेच मैसूर मध्ये साजरा केला जाणारा दसरा हा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे.


भारतामध्ये काही ठिकाणी नवरात्री च्या दिवशी प्राण्यांचा बळी देखील चढवला जातो. राजस्थान मध्ये म्हैस किंवा बकरी ची बळी दिली जाते.

आसाम, पश्चिम बंगाल तसेच नेपाळ मध्ये बकरा किंवा कोंबड्यांची बळी दिली जाते.


भारतामध्ये अनेकतेमध्ये मध्ये एकता पाहायला मिळते. त्याच प्रकारे देवीची पूजा कोणत्याही रुपात असली, कोणत्याही प्रकारे असली तरी सर्वांचा उद्देश एकच असतो. सगळ्यांची इच्छा हीच असते की देवीला प्रसन्न करुन आशिर्वाद मिळावा व सारी दुःख दुर व्हावीत.



नवरात्री शुभेच्छा 

मारुनी असुर तू महिषासुरमर्दिनी होते भक्त जवळ घेऊनी तू भक्तांची जननी होते संकटातून तारुण नेसी तू मग संजीवनी होते सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आईच्या मूर्ति कडे बघून जगायला बळ येतं कितीही संकट आली तरी लढण्याचं बळ येतं घटस्थापना आणि नवरात्रि आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ऐश्वर्याचे रूप असतं देवी समृद्धीचे स्वरूप असते देवी सुखाचे दुसरे नाव म्हणजे देवी त्या सगळ्या रूपातल्या देवीला नमन करून नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!





FAQ


नवरात्री 2023 चे 9 दिवस कोणते आहेत?

या वर्षी शरद नवरात्री ही १४ ऑक्टोबर ला ११ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल आणि १५ ऑक्टोबर ला दुपारी १२ वाजून ३२ मिनिटांनी संपेल. तिथीनुसार या १५ ऑक्टोबर २०२३ ला नवरात्री सुरु होणार आहे आणि २३ ऑक्टोबर २०२३ ला नवरात्री संपणार आहे. तसेच २४ ऑक्टोबर ला पूर्ण देशभरामध्ये दसरा साजरा केला जाणार आहे.


महाराष्ट्रातील नवरात्रीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे ?

महाराष्ट्रातील नवरात्रीसाठी यवतमाळ हे शहर प्रसिद्ध आहे. यवतमाळ मध्ये एकोप्याने सर्व लोक नवरात्री साजरी करतात त्याबरोबरच या दिवसांमध्ये पूर्ण शहर सजवले जाते.


भारतातील प्रसिद्ध नवरात्र कोणते शहर आहे?

भारतामध्ये वाराणसी मधील नवरात्र ही प्रसिद्ध आहे.


नवरात्री मधील नऊ देवींची नावे काय आहेत ?

नवरात्री च्या नऊ देविणची क्रमश नवे पुढील प्रमाणे आहेत- शैलपुत्री देवी, ब्रह्मचारीनी देवी, चंद्रघंटा देवी, कूष्माण्डा देवी, स्कंदमाता देवी , कात्यायनी देवी, कालरात्रि देवी, महागौरी देवी, सिद्धिदात्री देवी.


लेखक: धनराज कोकणी


Also Read

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने