मित्रानो शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची असते.
तसे पाहता शाळा कॉलेजमध्ये प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात. परंतु त्यामधीलच कोणतेतरी शिक्षक विद्यार्थ्याना अतिप्रिय असतात. आजच्या या लेखात आशाच एका माझे आवडते शिक्षक - Maze Avadte Shikshak या विषयावरील निबंध देण्यात आले आहेत.
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | Maze Avadte Shikshak (300 शब्द)
शिक्षक हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत "गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा" अशा पद्धतीने शिक्षकाला देवाचा दर्जा दिला गेला आहे. शिक्षक विद्यार्थ्याला शिक्षित करून चांगला नागरिक बनवतात. शिक्षक विद्यार्थ्याचे चरित्र, सवयी आणि करिअर घडवितात. एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्यामध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करतो. आणि त्यांना आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करण्यात मदत करतो. प्रत्येक शिक्षकाची हीच इच्छा असते की त्यांचे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रगती करून आपल्या शिक्षकांची मान अभिमानाने उंच करो. माझ्या शालेय जीवनात देखील असेच एक शिक्षक मला लाभले आहेत, ज्यांचे महत्त्व माझ्या जीवनात अनन्यसाधारण आहे.
माझे शाळेचे नाव बालमोहन माध्यमिक विद्यालय आहे व माझ्या आवडत्या शिक्षकांचे नाव जगदीश पाटील सर असे आहे. ते आम्हाला मराठी विषय शिकवतात. मी त्यांचे व्यक्तिमत्व, शिकवण्याची पद्धत आणि स्वभावाने खूप प्रभावित झालो आहे. ते अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ते सर्व विद्यार्थ्याची काळजी घेतात. जगदीश पाटील सरांची मराठी व्याकरणावर विशेष पकड आहे. त्यांनी शिकवलेली कविता आणि धडे पुन्हा अभ्यासायची आवश्यकता पडत नाही. जगदीश सर विद्यार्थ्यांशी गुरु शिष्याप्रमाणे न वागता एका मित्राप्रमाणे वागतात. अभ्यासाव्यतीरिक्त त्यांनी मला खाजगी समस्यामध्येही नेहमीच मदत केली आहे.
जगदीश पाटील सर स्वभावाने जरी प्रेमळ असले. तरी ते कायम असेच प्रेमळ नसून वेळ आल्यावर रागावणारे देखील आहे. त्यांना शिस्त खूप प्रिय आहे. जर कोण्या विद्यार्थ्याने कारण नसतांना वेळेवर अभ्यास पूर्ण केला नाही तर ते त्याला शिक्षाही करतात. सर उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे मराठी भाषेतील ज्ञान पण खूप सखोल आहे. या शिवाय त्यांना इतर खूप साऱ्या चालू घडामोडीची माहिती देखील असते. ह्या चालू घडामोडी आणि यासारखी खूपसारी उपयुक्त माहिती गोष्टींच्या माध्यमाने सांगून ते आमचे सामान्य ज्ञान वाढवतात.
जगदीश पाटील सर आम्हाला फक्त पुस्तकी अभ्यासच न शिकवता शाळेत आयोजित होणाऱ्या खेळ तसेच स्पर्धा मध्ये देखील भाग घ्यायला प्रोत्साहित करतात. ते आम्हाला नेहमी हसत खेळत शिक्षण देतात. जगदीश पाटील सरांनी शिकवलेले धडे लवकर लक्षात रहातात. सरांमुळेच माझ्यात मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण होऊन मला लेखनाची आवड लागली आहे. जगदीश सर माझ्यासाठी तसेच माझ्यासारखी इतर विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत. माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान नेहमीच महत्वाचे राहील.
शिक्षणाचे महत्व निबंध वाचा येथे
माझे आवडते शिक्षक मराठी निबंध | Maze prerak Shikshak Nibandh (200 शब्द)
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक गोष्टी शिकवत असतात. शिक्षकाद्वारे मिळालेली शिक्षा विद्यार्थ्याचे आयुष्य बदलून टाकते. एक आदर्श शिक्षक स्वतः आधी आपल्या विद्यार्थ्याचा भविष्याचा विचार करतो. शाळेत प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याला समान असतात कारण प्रत्येक शिक्षक त्यांना ज्ञान देण्याचे काम करतात. परंतु केव्हा केव्हा एखादे शिक्षक विद्यार्थ्याचे अती प्रिय बनून जातात. एखादे शिक्षक अधिक आवडण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
माझे सुद्धा एक आवडते शिक्षक आहेत, मी त्यांचा स्वभाव आणि शैक्षणिक उत्कृष्टेमुळे अती प्रभावित झालो आहे. ज्या शिक्षकांनी मला प्रभावित केले आहे त्यांचे नाव आहे गजानन गुरव सर. गजानन सर उत्कृष्ट शिक्षक आहेत. ते आमच्या शाळेत गणित विषय शिकवतात. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती आणि प्रभावशाली व्यक्तिमत्वामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला ते प्रिय आहेत. सर्वच विद्यार्थी त्यांची प्रशंसा व सन्मान करतात.
गजानन सरांची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते सर्व विद्यार्थ्यांना समान व्यवहार देतात आणि सर्व विद्यार्थ्यांशी विनम्रता आणि प्रेमळपणे बोलतात. या शिवाय त्यांना शिस्त अतिप्रिय आहे जर कोण्या विद्यार्थ्याने मस्ती केली किंवा होमवर्क पूर्ण केला नाही तर गजानन सर त्याला शिक्षा पण करतात. एवढे असूनही मला गजानन सर खूप आवडतात.
एक शिक्षक हा कुंभार प्रमाणे असतो. कुंभार ज्या प्रमाणे माती ची भांडे बनवताना त्याला एका हाताने सांभाळून दुसऱ्या हाताने आकार देतो, त्याच प्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात. शिक्षक शिवाय चांगला समाज तयार होणे असंभव आहे. म्हणूनच आपल्याला आपल्या फक्त प्रिय शिक्षक नाही तर सर्वच शिक्षकांना समान सम्मान द्यायला हवा.
विडियो पहा:
तर मित्रानो हे होते माझे आवडते शिक्षक या विषयावर लिहिलेले दोन निबंध. हे Maze Avadte Shikshak निबंध तुम्हाला कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा याशिवाय या निबंधांमध्ये जर काही चूक किंवा इतर काही अडचण तुम्हाला आली असेल तर तेही कमेन्ट मध्ये सांगा धन्यवाद...
Useful for me
उत्तर द्याहटवा