patra lekhan |
मराठी पत्र लेखन - Patra Lekhan in Marathi
Patra Lekhan in Marathi : पत्र हे एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क केला जातो. काहींना वाटते की पत्रलेखन अतिशय सोपे काम आहे. परंतु वास्तविकतेत एक आदर्श पत्र लिहिणे ही एक कला आहे. पत्र लेखनात व्याकरणाचे महत्त्व भरपूर असते. पत्र लेखनासाठी वापरली जाणारी भाषा वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची असते.
आजच्या या लेखात आपण मराठी पत्र लेखन (marathi patra lekhan) याविषयी ची मराठी माहिती प्राप्त करणार आहोत. या लेखात देण्यात आलेली Patra Lekhan in Marathi ही माहिती सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयोगाची आहे. तर चला सुरू करूया..
पत्रलेखनाचे दोन प्रकार आहे. 1) औपचारिक पत्र 2) अनौपचारिक पत्र
1) औपचारिक पत्र
हे पत्र मुख्याध्यापक, पदाधिकारी, व्यापारी, ग्राहक, पुस्तक विक्रेता, संपादक इत्यादी लोकांना लिहिले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर औपचारिक पत्र हे वैयक्तिक ओळख व नातेसंबंधांमध्ये नसणाऱ्या लोकांना लिहिले जाते. या पत्रातील भाषा सभ्य असते.
2) अनौपचारिक पत्र
अनौपचारिक पत्र हे मित्र, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते. या पत्रात सुखदुःख, उत्साह, प्रेम, अभिनंदन व शुभेच्छा इत्यादींचा समावेश असतो. अनौपचारिक पत्राची भाषा सौम्य हृदयस्पर्शी व प्रेमळ असते.
अभिनंदन पत्र लेखन - Abhinandan Patra Lekhan in Marathi
1)
अभिनंदन पत्र
28- एल आई कॉलनी
इंदोर
16 एप्रिल 2020
प्रिय मित्र यश
सप्रेम नमस्कार
आजच तुझे पत्र मिळाले. तू शालेय परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केला हे ऐकुन खूप आनंद झाला. तुझ्या या यशावर मी तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मला पूर्ण विश्वास आहे की तुझे भविष्य खूप उज्वल राहील आणि येणाऱ्या काळात तू आणखी प्रगती करशील. तुझ्या आई वडिलांना माझा प्रणाम व लहान भावाला माझे प्रेम.
तुझा मित्र
मोहित पाटील
2)
आर. जेड. एच. - 000 रजनगर 2
नवी दिल्ली- 110077
दिनांक- .....
प्रिय मित्र प्रभाकर
माझी तब्येत चांगली आहे व तुझ्या चांगल्या स्वास्थ्या साठी मी कायम प्रार्थना करीत असतो. मला हे ऐकुन खूप आनंद झाला की तु इयता 12 वी च्या परीक्षेत 95% गुण मिळवले. हे यश संपादन करण्यासाठी तु खरोखर खूप मेहनत केली आहे आणि या यशाच्या लायक आहेस. मला अभिमान वाटतो की तु माझा प्रिय मित्र आहेस. परीक्षेमध्ये तुझ्या या यशाबद्दल मी तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
आता तुझ्याकडे एक उज्वल भविष्य आहे. तू तुझ्या आवडीचे करिअर निवडू शकतो. मला आशा आहे की तुला शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती अवश्य मिळेल. तु जेव्हा गावी परत येशील तेव्हा आपण सर्वजण तुझ्या यशाचा आनंद साजरा करू. माझ्या शुभेच्छा सदैव तुझा सोबत आहे.
तुझा मित्र
(.......)
मित्राला वाढदिवसाचे आमंत्रण पत्र - birthday invitation letter in marathi
15 फेब्रुवारी 2021
प्रिय मित्र महेश
आशा करतो की तू नेहमी प्रमाणे स्वस्थ आणि आनंदी असशील. जसे की तुला माहीत आहे दरवर्षी माझा वाढदिवस 20 फेब्रुवारी ला साजरा केला जातो.
व दरवर्षाप्रमाणे या वर्षीही मी माझ्या सर्व प्रिय मित्र व नातेवाईकांना, आमच्या घरी वाढदिवसाची पार्टी व मेजवानी देणार आहे. या कार्यक्रमात नृत्य व संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी इतर मित्रांनाही आमंत्रण पाठवले आहे. व मला आशा आहे की तू या समारंभात नक्की येशील.
काका व काकूंना माझे विनम्र अभिवादन.
रस्ता दुरुस्तीची मागणी पत्र | Rasta durusti Patra Lekhan in Marathi
मी अजय जाधव, महर्षि कर्वे रस्त्यावरील 'स्वर्णनगरी' इमारतीती राहतो. सध्या या रस्त्यावरील वाहतूक अति वाढली आहे. त्यात ट्रक तसेच मोठमोठया बसेस यांचाही समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण रास्ता अतिशय खराब झाला आहे. व त्यामुळे रिक्शा, लहान वाहने, दुचाकी वाहने, यांचे येथे बरेच लहान मोठे अपघात होत असतात.
या रस्त्याच्या कडेला असलेला पादचारी मार्गही मुळातच अरुंद आहे. त्यावरील फरश्याही उखडलेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना तेथून चालनेही कष्टदायक होते. त्यातच भर म्हणजे फेरीवाले, भाजीवाले यांनी त्या मार्गावर मुक्काम ठोकलेला असतो.
शिवाय आता पाऊस अगदी तोंडावर आला आहे. अशा रस्त्यामुळे वाहनांची वाहतूक करणे अवघड जाईल व सर्वांना त्रास होईल. तेव्हा आपण कृपया जातीने त्या कामाकडे लक्ष द्यावे आणि पाऊस सुरू होण्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी विनंती आहे. आपण हे काम पूर्ण करून जनतेचा दुवा घ्यावा हीच मनीषा.
तर मित्रहो अशा पद्धतीने आजच्या या लेखात आपण मराठी पत्र लेखन Patra Lekhan in Marathi या विषयी ची माहिती मिळवली. या लेखाद्वारे आपण मराठी पात्राचे नमुने देखील अभ्यासले. आशा करतो की आपणास ही माहिती उपयोगी ठरली असले. या मराठी पत्र लेखन विषयी च्या माहितीला इतरणसोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद
अधिक वाचा :