मदर तेरेसा यांची मराठी माहिती Information about mother teresa in marathi | Mother teresa mahiti
दुसऱ्याच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन वाहणाऱ्या महान समाज सेवी मदर तेरेसा. Mother Teresa यांनी आपले संपूर्ण जीवन परोपकार आणि लोकांच्या सेवेसाठी अर्पित केले. आधीपासूनच त्यांच्या हृदयात दीन, दुखित, बिमार, असाह्य आणि गरिबांसाठी प्रेम होते. या मुळेच त्यांनी 18 वर्षाच्या असताना कॅथलिक चर्चमधील नन बनून गरिबांसाठी आपले जीवन अर्पण केले. परंतु त्या जेव्हा पहिल्यांदा भारतात आल्या तेव्हा भारतातील लोक त्यांना खूप आवडले व त्यांनी आपले संपूर्ण जीवनभारतीयाच्या सेवेसाठी खर्ची करण्याचा निर्णय घेतला. आज आपण मदर तेरेसा यांच्या बद्दल माहिती मिळवणार आहोत.
प्रारंभिक जीवन
मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 ला युरोपमधील मॅसिडोनिया या देशात झाला. त्यांचे खरे नाव 'अंजेझी गोंक्षे बोजँक्सिय्यू' होते. त्यांचे वडील निकोला बोयाजू एक साधारण व्यवसायिक होते. आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे मदर तेरेसा, त्यांची मोठी बहीण आणि भावाच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. वडिलांच्या मृत्यूनंतर Mother Teresa व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांमधून दिवस काढावे लागले. मदर तेरेसा या लहानपणापासून अतिशय सुंदर, अभ्यासू व परिश्रमी होत्या. अभ्यासासोबत त्यांना गाणे गाण्याच्या देखील छंद होता. त्यांच्या आईने लहानपणापासून त्यांना चांगली शिकवण दिली होती. त्यांच्या आईचे म्हणणे होते कि जे काही मिळेल ते सर्वांना वाटून खावे, स्वतःसाठी तर सर्वच जगतात पण दुसऱ्यांच्या सेवेसाठी जे आपले आयुष्य लावतात ते खरे महान असतात.
मदर तेरेसा आपल्या आई व बहिणीसोबत चर्च मध्ये येशू ख्रिस्तांची गाणी गात असत. चर्च मध्येच त्यांच्या मनात सेवा व धर्माविषयी भावना वाढली, त्यांनी नन बनण्याचा निर्णय घेतला. कॅथलिक परंपरेत नन या अश्या स्त्रिया असतात ज्यांनी आपले जीवन धर्मासाठी समर्पित केलेले असते. नन या आजीवन लग्न न करता लोकांच्या सेवेसाठी कार्य करतात.
भारतात आगमन
मे 1931 मध्ये 21 वर्षाच्या वयात त्यांनी नन बनण्याची प्रतिज्ञा घेतली. 1929 मध्ये Mother Teresa भारतातील कोलकत्ता शहरात आल्या व लोरेटा कन्वेट स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिकवू लागल्या. त्या शिस्तप्रिय शिक्षिका होत्या, विद्यार्थ्यांना पण मदर तेरेसा खूप आवडत असत. 1944 मध्ये त्यांना स्कूल च्या अध्यापिका बनवण्यात आले. त्यांचे मन शिक्षणात पुर्ण पणे रमून गेले होते.
समाज कार्य
10 सप्टेंबर 1946 ला घडलेल्या प्रसंगांमुळे मदर तेरेसा याचे जीवनच बदलून गेले. दार्जिलिंग मध्ये काही कामासाठी गेलेल्या असताना त्यांना येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले. येशूनी त्यांना स्कूल सोडून आपले जीवन गरीब व दीन दुखिताच्या सेवेसाठी लावण्याचे ठरवले. याच दरम्यान कोलकत्यात हिंदू मुस्लिम दंगे भडकले, शहराची स्थिती भयावह झाली. या घटनेने मदर तेरेसांना दुःखी केले.
1946 मध्ये त्यांनी गरीब, बिमार आणि असहायांची सेवा सुरू केली. 7 ऑक्टोंबर 1950 मध्ये त्यांना चैरीटी साठी मिशनरी बनवण्याची परवानगी मिळाली. सुरुवातीला या संस्थेत 12 कर्मचारी नन होते. पण आताच्या काळात 4000 पेक्षा जास्त नन या संस्थेत आहेत. या संस्थेद्वारे अनाथाश्रम, नर्सिंग होम, वृद्धाश्रम या सारख्या सेवा संस्था सुरू करण्यात आल्या. त्या काळात कोलकत्यात प्लेग व कुष्ठरोगाची साथ आली. या रोग्याची सेवा करण्याची जवाबदारी Mother Teresa यांनी घेतली. गरिबांसाठी तर मदर तेरेसा देवदूत होत्या.
नंतरच्या काळात त्यांनी आपली संस्था भारताबाहेर पोहचवण्यासाठी भारत सरकार कळून परवानगी मिळवली. आज च्या काळात 100 पेक्षा जास्त देशात त्याच्या मिशनरी सुरू आहेत. त्याच्या निस्वार्थ भावामुळे लोकांना देखील त्या खूप प्रिय होत्या.
मदर तेरेसा मृत्यू
वाढत्या वयामुळे त्यांचे स्वस्थ बिघडायला लागले. त्यांना किडनी ची समस्या निर्माण झाली. 73 वर्षाच्या वयात त्यांना पहिल्यांदा हृदय विकाराच्या झटका आला. या नंतर 5 सप्टेंबर 1997 मध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यू च्या 6 महिण्याआधीच त्यांनी मिशनरी चे अध्यक्षपद सोडून दिले.
आज मदर तेरेसा यांची 'मिशनरी ऑफ चारिटी' मध्ये 4000 पेक्षा जास्त सिस्टर आणि 300 अन्य सहयोगी आहेत. जगातील 123 पेक्षा जास्तीच्या देशांमध्ये त्यांचे सेवा कार्य सुरू आहे.
मदर तेरेसा अनमोल विचार (Mother Teresa Marathi quotes)
- एकटेपणा सर्वात मोठी गरिबी आहे.
- प्रेम हे प्रत्येक ऋतूत येणारे फळ आहे, आणि प्रत्येक व्यक्ती याला प्राप्त करू शकतो.
- शांतता ही चेहऱ्यावरील एका हास्याने सुरू होते.
- लहान सहान गोष्टी मध्ये इमानदार रहा, कारण याच्याने तुमची शक्ती वाढते.
- शिस्त ही ध्येय आणि उपलब्धते मधील पूल आहे.
- जर आपल्या मनाला शांती नाही तर याचा अर्थ आहे की आपण विसरलो आहोत की आपण एक दुसऱ्यासाठी बनलेले आहोत.
- प्रेम कधीही मोजून दिले जात नाही ते फक्त दिले जाते.
- साधे पणाने जागा.
- जिथे जाणार तिथे प्रेम पसरवा. जो पण तुम्हाला भेटेल तो खुश होऊन जायला हवा.
- जर तुम्ही 100 लोकांना जेवू घालू शकत नसाल तर एकालाच खाऊ घाला.
- जे जीवन दुसऱ्यासाठी जगले नाही ते जीवन नाही.
- आपण सर्व परमेश्वराच्या हातातील एका पेनाप्रमाणे आहोत.
- तुम्ही किती दिले हे महत्त्वाचे नाही, पण देताना तुम्ही किती प्रेम दिले हे महत्त्वाचे आहे.
- सुंदर लोक नेहमी चांगले नसतात. पण चांगले लोक नेहमी सुंदर असतात.
- दया आणि प्रेम हे शब्द लहान असू शकतात पण वास्तव मध्ये त्यांची प्रतिध्वनी अनंत आहे.
- तुम्ही जगात प्रेम पसरवण्यासाठी काय करू शकतात, घरी जा व सर्वांना प्रेम करा.
मदर टेरेसा यांच्या या व्यापक, प्रशंसक कार्या नंतरही त्याचे जीवन व कार्या विरुद्ध विवाद सुरू झाले. मदर तेरेसा यांच्या निस्वार्थ प्रेम कार्याला देखील लोक चुकीचे समजू लागले. त्यांच्यावर आरोप होऊ लागले की त्या सेवेच्या आड धर्म परिवर्तनाचे कार्य करीत आहेत. परंतु या आरोपांवर जास्त लक्ष न देता त्या आपल्या सेवाकार्यात लागून राहिल्या. Mother Teresa यांनी संपूर्ण जगाला प्रेमाची शिकवण दिली. त्यांनी लोकांना प्रेम करायला शिकवले, दीन दुःखितांची सेवा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. गरिबांसाठी मदर तेरेसा या खरोखर देवदूतच होत्या. त्यांच्या जीवनापासून आपण खूप काही शिकू शकतो. मदर तेरेसा या अनेकांच्या आदर्श देखील आहेत.