मराठी महिने व इंग्रजी महिन्यांची नावे | Marathi Months Name & Marathi Mahine

मराठी महिने नावे - Marathi months name : मित्रांनो आजच्या या लेखात आपण हिंदू कॅलेंडर नुसार असणाऱ्या मराठी महिन्यांची नावे प्राप्त करणार आहोत. मराठी महिने कोणकोणती आहेत आणि इंग्रजी महिन्यांनुसार ते कोणकोणत्या कालावधी मध्ये येतात. या विषयी ची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत.

 

मराठी महिन्यांची नावे
Marathi months name

भारतात प्राचीन काळापासून पंचाग म्हणून हिंदू कॅलेंडर वापरले जात आहे. आज जगभरात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे इंग्रजी कॅलेंडरला 'ग्रेगोरियन कॅलेंडर' म्हणूनही ओळखले जाते. या कॅलेंडर मध्ये 12 महिने असतात. आपल्या मराठी कॅलेंडर मध्येही 12 च महिने असतात. 

मराठी महीने - Marathi Mahine name 

मराठी कॅलेंडरमध्ये इंग्रजी कॅलेंडर प्रमाणेच 12 महिने असतात. ज्यात 29.5 दिवस प्रत्येक महिन्यात असतात. प्रत्येक महिन्यात दोन 15-15 दिवसांचे पंधरवडे (पक्ष) असतात. यापैकी एकाला कृष्ण पक्ष तर एकाला शुक्ल पक्ष म्हटले जाते.


मराठी महिन्यांची नावे - Marathi month name

मराठी महिने 12 आहेत: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन इत्यादी.

  • चैत्र 
  • वैशाख
  • ज्येष्ठ
  • आषाढ
  • श्रावण
  • भाद्रपद 
  • आश्विन 
  • कार्तिक 
  • मार्गशीर्ष 
  • पौष 
  • माघ 
  • फाल्गुन

वरील मराठी महिन्यांचे (marathi mahine) महत्व व माहिती पुढे देण्यात आलेली आहे.


  1. चैत्र महिना- हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो. या महिन्यापासून ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्याची सुरुवात होऊन जाते. या महिन्यात महाराष्ट्रात गुढी पाडव्याचा सण साजरा करून मराठी नववर्ष साजरे केले जाते. तमिळनाडूत चैत्री विशू आणि कर्नाटक व आंध्रप्रदेश मध्ये उगडी हा सण साजरा होतो. याच महिन्यात भगवान श्रीराम यांचा जन्म दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. 
  2. वैशाख- मराठी कॅलेंडर चा दुसरा महिना वैशाख असतो. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा महिना एप्रिल ते मे पर्यंत असतो. महाराष्ट्राबाहेर या महिन्याला बैसाख म्हटले जाते. या महिन्यात अधिकांश शेतकरी पीक काढतात. पंजाब प्रांतात पंजाबी लोक या महिन्यात बैसाखी उत्सव साजरा करतात.
  3. ज्येष्ठ- ज्येष्ठ महिना हा अत्याधिक उष्ण महिना असतो. हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार मे व जून महिन्यात येतो.
  4. आषाढ- आषाढ महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जून व जुलै महिन्यात येतो.
  5. श्रावण- श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जुलै व ऑगस्ट महिन्यात येतो.
  6. भाद्रपद- भाद्रपद महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात येतो.
  7. आश्विन- आश्विन महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात येतो.
  8. कार्तिक- कार्तिक महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो.
  9. मार्गशीर्ष- मार्गशीर्ष महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात येतो.
  10. पौष- पौष महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात येतो.
  11. माघ- माघ महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येतो.
  12. फाल्गुन- फाल्गुन महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार फेब्रुवारी व मार्च महिन्यात येतो.


इंग्रजी महिन्याची मराठी नावे - English months name in Marathi

जानेवारी– हा महिना 31 दिवसांचा असतो. 

फेब्रुवारी – हा महिना 28 दिवसांचा असतो. परंतु दर चार वर्षानी एक लीप वर्ष येते ज्यात 29 दिवस असतात.

मार्च – हा महिना 31 दिवसांचा असतो. 

एप्रिल – हा महिना 30 दिवसांचा असतो. 

मे – हा महिना 31 दिवसांचा असतो. 

जून – हा महिना 30 दिवसांचा असतो. 

जुलै – हा महिना 31 दिवसांचा असतो. 

ऑगस्ट – हा महिना 31 दिवसांचा असतो. 

सप्टेंबर – हा महिना 30 दिवसांचा असतो. 

अक्टूबर – हा महिना 31 दिवसांचा असतो. 

नोव्हेंबर – हा महिना 30 दिवसांचा असतो. 

डिसेंबर – हा महिना 31 दिवसांचा असतो. 


या लेखाद्वारे आपण मराठी महिने (marathi mahine) व मराठी महिन्यांची नावे (marathi months name) कोणकोणती आहेत या विषयी ची माहिती प्राप्त केली. या सोबतच इंग्रजी महिन्याची मराठी नावे देखील आपण या लेखाद्वारे जाणून घेतली. आशा आहे आपणास ही माहिती उपयुक्त ठरली असेल. या माहितीला इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..

अधिक लेख वाचा :

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

  1. चैत्र शुद्ध नवमी.. भगवान विष्णूचा सातवा अवतार राजा राम यांचा जन्मदिवस... रामनवमी उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जातो...

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने