Read Top 50 short and best Marathi story for kids. लहान मुलांच्या गोष्टी includes lahan mulanchya marathi goshti, chan chan, funny, strange, parichay and Bedtime stories that creates strong relation between parents and children.
लहान मुलांच्या गोष्टी या मराठी बोधकथा खास करून लहान मुलांसाठी देण्यात आल्या आहेत. पालक मुलांना बेडटाइम च्या वेळी या मराठी छान छान गोष्टी सांगून त्यांना बोध देऊ शकतात.
या गोष्टी ऐकून लहान मुलांच्या विचार क्षमतेत वृद्धी होऊन त्यांची कल्पना शक्ति वाढेल. तर चला मराठी बोधकथा व मराठी भाषेतील मराठी छान छान गोष्टी (Marathi Stories) ला सुरुवात करूया...
Marathi story for kids | बोधप्रद लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी
Marathi story 1) गर्विष्ठ मोर
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.
मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.
एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."
करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला.
तात्पर्य (moral): दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.
लहान मुलांच्या गोष्टी Marathi story 2) वाईट संगतीचे परिणाम
एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.
एक दिवशी शेतकर्याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, "अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल." एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.
त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले.
शेतकरी कबुतराला म्हणाला, "तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल." असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले.
तात्पर्य: वाईट संगतीत राहू नये.
लहान मुलांच्या गोष्टी - छान छान गोष्टी
Marathi story ३) घोड्याला चांगलीच अद्दल घडली
एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते.
वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, "मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे. मला ते फारच जड होत आहे."
घोडा म्हणाला, "जड होवो की हलके. मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस."
घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्या मुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.
व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले.
चालता चालता घोडा मनात म्हणाला, "मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल.
तात्पर्य: इतरांना सहाय्य करा.
Marathi story for Kids ४) कोल्ह्याची फजिती
एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.
कोल्हा म्हणाला, "मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो."
"मलाही येतो." मांजर म्हणाली.
कोल्हा म्हणाला, "ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत."
"तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?" मांजरीने विचारले.
"अनेक युक्त्या!" कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, "कधी मी काटेरी झुडपातून धावतो. कधीकधी जंगलातल्या दाठ झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत."
मांजर म्हणाली,"मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे."
"अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?" कोल्हाने विचारले.
"बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत. " असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली.
शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.
मांजर मनात म्हणाली,. "बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती."
तात्पर्य: कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या.
Marathi story ५) पर्वत आणि उंदीर
एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. 'श्रेष्ठ कोण?' यावर ते भांडत होते.
पर्वत म्हणाला, "तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस."
उंदीर पटकन म्हणाला, "मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!"
पर्वत म्हणाला, "मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो."
उंदीर म्हणाला, "तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो. तेव्हा तू मला अडवू शकतोस का?"
छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला.
तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.
Marathi story ६) श्रीमंत व्यापारी
एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता.
तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला.
तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले.
एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले.
अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."
तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.
आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे."
"तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.
तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.
लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf
मंडळी लहान मुलांच्या गोष्टी आणि बोदकथा व त्यांच्या तात्पऱ्याची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील डाउनलोड बटणाचा उपयोग करावा.
Marathi Kids Story PDF Download
तर मंडळी ह्या होत्या लहान मुलांच्या गोष्टी (Marathi story for kids) व मराठी भाषेतील काही छान छान गोष्टी. आशा करतो आपण ह्या लेखातील गोष्टी वाचून आपल्या मुलांना सांगणार व या मराठी लहान बोधकथा द्वारे त्यांना योग्य बोध मिळवून देणार.
please write us your thoughts in comments about Marathi story for kids & मराठी छान छान गोष्टी . also read more stories available below...
Read More:
छोटया गोष्टींची ही माहिती खूपच छान सादर केली आहे . तात्पर्य खूप छान आहेत मुलांना नक्कीच फायदा होईल छोट्या गोष्टीं सहज वाचता येतात व समजतात .🤗🤔🥰
उत्तर द्याहटवाछान आहे
हटवालहान गोष्टी
उत्तर द्याहटवा्
छान गोष्टी आहेत. कवी शब्दात आणि तात्पर्य सहित सांगितल्याबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवामी माझ्या लहान मुलीला गोष्टी ऐकवल्या, तिला फार आवडल्या
उत्तर द्याहटवातुमच्या कथा खूप छान आहेत. मी तुमच्या कथांचा YouTube साठी वापर करू शकते का
उत्तर द्याहटवा