मराठी राजभाषा दिन भाषण मराठी | Marathi Rajbhasha din Speech in Marathi

Marathi Rajbhasha din speech in marathi: मित्रांनो मराठी भाषेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. मराठीमाती ही वीरांची भूमी आहे आणि मराठी असण्याचा आपण सर्वांना अभिमान देखील आहे. मराठी भाषेच्या सन्मानार्थ दरवर्षी मराठी राजभाषा दिन हा 27 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. यादिवशी महाराष्ट्रातील शाळा कॉलेज मध्ये भाषणाचे आयोजंन केले जाते.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी मराठी राजभाषा दिन भाषण घेऊन आलेलो आहोत. हे भाषण शाळा कॉलेज च्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचे ठरेल.


Marathi Rajbhasha din Speech

मराठी राजभाषा दिन भाषण - Marathi Rajbhasha Din Speech in Marathi

महाराष्ट्र अधिनियम 1964 नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीला घोषित केले आहे. 27 फेब्रुवारी या दिवसाला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो.

27 फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात तर साजरे केलेच जाते पण याशिवाय भारतात व संपूर्ण जगात जिथं जिथं मराठी माणसे आहेत तिथं तिथं या दिवसाला मराठी दिन म्हणून आनंदाने साजरे करतात. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळा तसेच सरकारी कार्यालयांमध्ये मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, मराठी निबंध स्पर्धा हे कार्यक्रम योजिले जातात. 

विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले होते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली नाशिक मध्ये झाला. त्यांच्या मराठी भाषेतील योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्म दिवस "मराठी राजभाषा दिन" म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रजांनी नाशिक मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. बी ए ची पदवी मिळवल्यानंतर काही काळ त्यांनी मराठी चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचे काम केले. लहान मोठ्या भूमिका पण त्यांनी साकारल्या. या नंतरच्या काळात त्यांनी विविध नियतकालिके आणि वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी खूप सारे लेखन केले. ते आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. त्यांनी अनेक नाटके, कवितासंग्रह आणि कथासंग्रह लिहिले. त्यांच्या 'नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या शिवाय अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवन लहरी इ. त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत. 

इये मराठीचीये नगरी, ब्रह्मविदेचा सुकाळू करी

अश्या शब्दामध्ये ज्ञानदेवांनी मराठीची प्रशंसा केली आहे. 

कवी सुरेश भट आपल्या कवितेत मराठीची प्रशंसा करताना म्हणतात.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,

एवढ्या जगात माय मानतो मराठी.

ज्या माय मराठीने आपल्यावर संस्कृतिक छत्र उभारले, जिने आपल्यास लहानाचे मोठे केले. या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्याला दिली. आपल्यास व्यक्त होण्यासाठी जिने शब्दाची पखरण केली. तिच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा महामंगल दिवस

मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरासाठी हळुवार आणि प्रेमळ असतात व वेळप्रसंगी जी आई मुलाच्या चांगल्यासाठी कठोर शब्दही बोलते तशीच आपली मराठी आहे. तिच्या शब्दाची शक्ती प्रचंड आहे. जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत आपण आपली मराठी भाषा विसरू नये अशी माझी इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले होते.

आज आपल्याला मराठी भाषेची संपन्नता आणि सुंदरता संपूर्ण जगाला समजावून द्यावी लागेल. मराठी भाषा एवढी सामर्थ्यवान आहे की तिला कोणावरही थोपवण्याची आवश्यकता नाही. नवीन पिढीला तिची सुंदरता समजावून द्यावी बस! तिची थोरवी अनेक माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयावर ठासवली की मराठी आपले राज्य सर्वत्र गाजवेल. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद

***

मित्रहो आशा आहे आजच्या या लेखात देण्यात आलेले मराठी राजभाषा दिन भाषण (Marathi Rajbhasha din speech in Marathi) आपणास आवडले असेल. या भाषणाला आपले मित्र मंडळीसोबत नक्की शेअर करा. आशा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने