नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी । Subhash Chandra Bose Speech in Marathi

नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी | Netaji Subhash Chandra Bose Speech in Marathi

मित्रांनो भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक प्रसिद्ध नाव नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे देशाच्या स्वातंत्र्यात मोलाचे योगदान आहे. नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रजांना सळो की पडो करून सोडले होते.

सुभाष चंद्र बॉस यांची जयंती ही 23 जानेवारी तर पुण्यतिथि ही 18 ऑगस्ट ला असते. या दिवशी शाळा कॉलेज मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण दिले जाते. विद्यार्थी विविध पद्धतीने आपली भाषणे तयार करून आणत असतात. जर आपणही आपल्या विद्यालयात Subhash Chandra Bose Speech in Marathi देऊ इच्छिता तर हा लेख आपल्यासाठी फारच उपयोगाचा ठरणार आहे. पुढे आपणास नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावरील 2 मराठी भाषणे देत आहोत.


marathi speech on Subhash Chandra Bose

सुभाष चंद्र बोस जयंती भाषण मराठी - Subhash Chandra Bose Speech in Marathi

(450 शब्द) 

आज दिनांक 23 जानेवारी 2024, भारतीय स्वतंत्र लढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे क्रांतिकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा हा जन्म दिवस. आज आपण नेताजी सुभाष चंद्र बॉस यांची 127 वी जयंती साजरी करीत आहोत. 

आजच्या याच दिवशी ओडिसा राज्यातील  कटक शहरातले प्रसिद्ध वकील जानकी नाथ बोस व प्रभावती देवी यांच्या घरी 1897 साली सुभाष चंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण कटक मध्येच झाले. उच्च शिक्षणासाठी ते कलकत्ता विश्व विद्यालयात पोहोचले. कलकत्यात त्यांनी 1919 मध्ये प्रथम श्रेणीत बी ए ची परीक्षा उत्तीर्ण केली. 

नेताजींच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी सरकारी नोकरी करावी. आपल्या वडिलांची इच्छा म्हणून नेताजींनी आयएएस ची परीक्षा दिली व या परीक्षेत त्यांनी चौथा क्रमांक मिळवला. परंतु देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची भावना नेताजींच्या मनात लहानपणापासून ठसलेली होती. आणि म्हणूनच त्यांनी एक वर्षाच्या आतच आपल्या नोकरी चा राजीनामा दिला. आणि स्वतःला देश स्वतंऱ्याच्या कार्यात पूर्णतः झोकून दिले  गेले.

1941 साली नेताजी जर्मनी गेले. तेथे जाऊन त्यांनी जर्मनी चा तानाशाह अडोल्फ हिटलर याची भेट घेतली व भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत मागितली. भारतातून इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौज ची स्थापना केली. त्यांनी तरुणांना आव्हान केले की "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुंगा". या नंतर 1943 मध्ये नेताजी जपान च्या मदतीने सिंगापूर ला पोहोचले. सिंगापूर मध्ये मोहन सिंह द्वारे बनवलेली इंडियन नॅशनल आर्मी ची कमान आपल्या हाती घेतली. सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर मधून रेडिओ वर संबोधन करताना गांधीजींना पहिल्यांदाच भारताचे राष्ट्रपिता म्हणून सन्मान दिला.

सुभाष चंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या भाषणात देशाच्या जनतेला एक संदेश दिला होता. या भाषणात त्यांनी म्हटले होते "बंधू आणि भगिनींनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण जे युद्ध सुरू केले आहे, हे तोपर्यंत सुरू ठेवा जोपर्यंत भारत स्वतंत्र होत नाही. धर्म पंथ आणि जात पात विसरून एकत्रित व्हा.

साल 20 जुलै 1921 मध्ये नेताजींनी महात्मा गांधीची भेट घेतली व वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभाग घेत राहिले. या दरम्यान एकदा बंगाल मध्ये महापूर आला. नेताजींनी शिबिरे लावून प्रभावित लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटणे सुरू केले. समाजसेवेच्या या कार्यासाठी त्यांनी 'युवक दलाची' स्थापना केली.

इंग्रज शासनाद्वारे जेव्हा भगत सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा नेताजी महात्मा गांधी यांच्या कडे गेले व त्यांनी भगत सिंह यांची शिक्षा रद्द करण्यासाठी आंदोलनाची विनंती केली. परंतु महात्मा गांधी हिंसेच्या विरोधात असल्याने त्यांनी नेताजी यांच्या या विनंती कडे दुर्लक्ष केले. या प्रसंगामुळे नेताजी हे गांधीजी व काँग्रेस च्या कार्यपद्धतीने नाराज झाले. 

सुभाष चंद्र बोस यांनी 'दिल्ली चलो' चा नारा दिला. परंतु 18 ऑगस्ट 1945 मध्ये एका विमान दुर्घटने दरम्यान त्याची मृत्यू झाली. नेताजींच्या मृत्युनंतर त्यांचे शरीर सापडले नाही. यामुळे त्यांच्या मृत्युच्या कारणावर आज देखील विवाद सुरू आहेत. परंतु या सर्वांमध्ये ही गोष्ट सत्य की भारतीय स्वतंत्र लढ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे योगदान मोलाचे होते. आज आपण भारतीय जी जय हिन्द ची घोषणा करतो, ते घोषवाक्य देखील नेताजींनीच दिलेले आहे. देशासाठी आपले संपूर्ण जीवन व प्राण अर्पण करणाऱ्या महान नेत्यास माझे शतश नमन..! जय हिंद जय भारत.

***


सुभाष चंद्र बोस जयंती भाषण मराठी - Netaji Subhash Chandra Bose Speech in Marathi

अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार.

आज मी तुमच्याशी एक अश्या नेत्यांबद्दल बोलणार आहे ज्यांनी मला सर्वात जास्त प्रेरित केले आहे. त्या महान नेत्याचे नाव आहे सुभाष चंद्र बोस.

सुभाष चंद्र बोस हे प्रभावशाली आणि क्रांतिकारी नेता होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात महत्वाची कामगिरी बजावली. भारतीय स्वतंत्रता युद्धात त्यांनी भारताबाहेर जाऊन आझाद हिंद फौज स्थापित केली. त्यांचे विचार क्रांतिकारी होते. 

सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओडिसा राज्यातील कटक शहरात एका बंगाली हिंदू कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस तर आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. सुभाष चंद्र बोस हे कोलकाता विश्व विद्यालयातून पदवीधर झाले. या नंतर ते इंग्लंड ला गेले व तेथे सरकारी नोकरी ची तयारी करू लागले. सिव्हिल सर्व्हिस च्या या परीक्षेत ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. परंतु देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. एप्रिल 1921 मध्ये त्यांनी इंग्लंड मधील नागरिक सेवेतून राजीनामा दिला व ते परत भारतात आले. भारतात आल्यावर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. त्यांनी बंगाल आणि बंगालच्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना एकजूट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यांचे विचार गांधीवादी विचारां पेक्षा वेगळे होते. सुभाष चंद्र बोस इंग्रजांच्या अत्याचारी शासनाच्या विरोधात सशस्त्र क्रांती चे समर्थक होते. 1939 मध्ये जेव्हा द्वितीय महायुद्ध सुरू झाले. तेव्हा इंग्रजांनी त्यांना कोलकत्यात नजरबंद केले. परंतु सुभाष चंद्र बोस हे त्यांचा भाचा शिशिर कुमार बोस यांच्या मदतीने नजरकैदेतून बाहेर पडले. अफगाणिस्तान व सोव्हिएत संघाच्या मार्गाने ते जर्मनी गेले. जर्मनीत नेताजी हिटलर ला पण भेटले. या नंतर सिंगापूर ला जाऊन त्यांनी आझाद हिंद सेनेचे गठण करण्यास सुरुवात केली.

नेताजी आपल्या आझाद हिंद फौज सोबत 4 जुलै 1944 ल बर्मा पोहोचले. इथेच त्यांनी आपला प्रसिद्ध नारा, "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" दिला.

18 ऑगस्ट 1945 ला टोकियो जाताना तैवान जवळ हवाई दुर्घटने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला, परंतु त्यांचे मृत शरीर मिळाले नाही. म्हणूनच नेताजींच्या मृत्यूच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू आहे.

***

प्रजासत्ताक दिन भाषणाचा मराठी विडियो


तर मित्रहो वर आपणास नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावरील मराठी भाषण दिलेले आहे. आम्ही आशा करतो की Subhash Chandra Bose Speech in Marathi आपणास नक्कीच उपयोगाचे ठरले असेल. वरील भाषणाला जसेच्या तसे उपयोगात घेण्याएवजी आपण त्यात आपल्या पद्धतीने योग्य सुधारणा व इतर पॉइंटस वाढवून आपले स्वत चे भाषण तयार करू शकतात.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने