वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची माहिती | Kusumagraj Information in Marathi

kusumagraj / vishnu vaman shirwadkar information in marathi : मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. त्यांना आपल्या प्रभावी साहित्यलेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण कवि कुसुमाग्रज यांची मराठी माहिती मिळवणार आहोत. 

कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरून आज आपण Kusumagraj Information in Marathi पाहणार आहोत ही कुसुमाग्रज यांची संपूर्ण माहिती आपल्याला खूप उपयोगी ठरेल तर चला सुरू करूया...  


कुसुमाग्रज यांची माहिती

वि वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची माहिती - Vishnu Vaman Shirwadkar (Kusumagraj) Information in Marathi

कुसुमाग्रज यांची माहिती आपण पुढील काही टप्यामध्ये जाणून घेऊया. पुढे देण्यात आलेल्या कुसुमाग्रज माहिती मध्ये आपणास कवि कुसुमाग्रज यांचे संपूर्ण जीवनप्रवास आणि जीवन चरित्र लक्षात येईल.


प्रारंभिक जीवन

कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला नाशिक मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु लहान असतांनाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतले ज्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णु वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. एकुलती एक बहिण कुसुम असल्याने त्यांनी कुसुम चे अग्रज अर्थात कुसुमाग्रज नाव धारण केले. तेव्हापासूनच शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करू लागले. 


शिक्षण आणि करीयर

कुसुमाग्रजांचे प्राथमिक शिक्षण नाशिक मधील पिंपळगाव या तालुक्यात झाले. पुढील शिक्षण त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाशिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई महाविद्यालयातून पूर्ण केले. 

20 वर्षाच्या वयात त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात प्रवेश केला. या शिवाय आपल्या जीवन काळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपला पहिला मराठी कवितासंग्रह 'जीवनलहरी' प्रकाशित केला. नंतर नाशिक मध्येच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिणे सुरू केले. धार्मिक चित्रपट सती सुलोचना मध्ये त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले. 

नंतर काही काळ त्यांनी विविध नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केले. 1942 हे वर्ष त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे होते. कारण याच वर्षी मराठी भाषेचे ध्येयवादी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचा 'विशाखा' हा कविता संग्रह स्वखर्चावर प्रकाशित केला. वि. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रजांचे वर्णन करताना लिहिले की, "कुसुमाग्रजांच्या शब्दांमुळे सामाजिक असंतोष प्रकट होतो, परंतु त्यांच्यामुळेच जुने जग नव्या मार्गाकडे जात आहे ही आशावादी श्रद्धा आहे".  

1942 च्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा जयजयकार..' ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली. या कवितेतून मराठी भाषेतील स्फुल्लिंग ज्वाला प्रमाणे बाहेर पडले. त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही. कारण रजिस्टर मध्ये कुसुमाग्रजांचे नाव वि वा शिरवाडकर लिहीले होते. 

"विशाखा" या काव्यसंग्रहानंतर त्यांनी अनेक नाटके, कवितासंग्रह आणि कथासंग्रह लिहिले. त्यांचे नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी भाषेतील ते दुसरे लेखक होते. याशिवाय त्यांनी अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवन लहरी इत्यादी प्रसिद्ध कवितासंग्रह लिहिले.


कुसुमाग्रज यांना मिळालेले पुरस्कार 

  • 1987 मध्ये कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
  • कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकाला 1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला.
  • 1985 मध्ये भारतीय नाट्य परिषदद्वारे त्यांना राम गणेश गडकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
  • 1986 मध्ये त्यांना पुणे युनिव्हर्सिटी द्वारे डि. लिट. डिग्री देण्यात आली.
  • 1988 झाली त्यांना संगीत नाट्य लेखन पुरस्कार देण्यात आला.


वि वा शिरवाडकर यांनी 1990 साली नाशिकमध्ये 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेचे कार्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आणि गरिब व दलित लोकांना मदत करणे हे होते. 

कुसुमाग्रजांच्या मराठी भाषेतील कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. 


विष्णू वामन शिरवाडकर यांचा मृत्यू

कुसुमाग्रज यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी 87 वर्षाच्या वयात नाशिक मधील त्यांच्या घरी झाला. मित्रांनो विष्णु वामन शिरवाडकर अर्थात आपले कुसुमाग्रज मराठी भाषेतील एक प्रसिद्ध कवि म्हणून आजही मराठी वाचक आणि रसिक प्रेमी जनतेच्या मनात जीवंत आहेत. आणि मराठी भाषेतील काव्यात त्यांचे स्थान कायमचे अग्रगण्य राहील. 


तर मित्रहो वरील लेखात आपण कवि कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांची माहिती प्राप्त केली. आपणास ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा व वर देण्यात आलेल्या Kusumagraj Information in Marathi मध्ये काही सुधारणा करायची असल्यास ते देखील कळवा. धन्यवाद.. 


  • Read More 
Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने