मोबाईल चे फायदे व तोटे इन मराठी । Mobile Che Fayde Tote Dushparinam in Marathi

मोबाईल चे फायदे व तोटे मराठी | Mobile Chi Mahiti

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या या आधुनिक युगात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज मोबाइल आपल्या जीवनाचा एक भाग बनलेला आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे व प्रत्येकजण त्यातच व्यस्त आहे.

ही गोष्ट सत्य आहे की मोबाईल मुळे अनेक गोष्टी कमी वेळात व कमी कष्टात करता येतात. परंतु या मोबाईल चे जेवढे फायदे आहेत तेवढेच याचे दुष्परिणाम पण आहेत. आज आपण मोबाईल फोनचे फायदे (Fayde) व तोटे (Tote/Dushparinam) पाहणार आहोत.


advantages of mobile in marathi mobile che labh

मोबाइल वापराचे फायदे (Mobile che fayde in Marathi)

  • मोबाईलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. 
  • आज कालच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमुळे  घर बसल्या अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.
  • तुम्ही मोबाईल मध्ये मनोरंजनासाठी गाणी ऐकू शकतात, गेम खेळू शकतात व चित्रपट पाहू शकतात.
  • आज कालचे मोबाईल स्लिम असल्याने तुम्ही त्यांना खिश्यात ठेवून कुठेही जाऊ शकतात.
  • मोबाईल फोनच्या कॅमेराने तुम्ही फोटो, व्हिडिओ बनवू शकतात.
  • मोबाईल फोन मध्ये कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक इ. सुविधा असतात, म्हणून आता तुम्हाला या सर्व गोष्टी सोबत नेण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल फोन च्या साह्याने आपण कॅलेंडर, कॅल्कुलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक या गोष्टी वापरू शकतात.
  • कुठेही जायचे असल्यास मोबाईल मध्ये गूगल मॅप आणि GPS च्या मदतीने आपण रस्ता शोधू शकतो.
  • मोबाईल फोन मुळे बँकेत न जाता, घरबसल्या एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे पाठविणे शक्य झाले आहे.
  • मोबाईलच्या साह्याने तुम्ही ऑनलाईन अन्न देखील मागवू शकतात.
  • मोबाईल मध्ये इंटरनेट ची सुविधा वापरून कोणतीही माहिती एका क्लिक वर मिळवता येते.
  • मोबाईल मध्ये फ्लॅश लाईट ची पण सुविधा असते याचा उपयोग अंधारात फोटो काढण्यासाठी होतो. परंतु तुम्ही याला टॉर्च म्हणून देखील वापरू शकतात.
  • व्यापारी लोकांना व्यवस्थित व्यापार करण्यात मोबाईल खूप मदत करतो.

mobile disadvantages in marathi

मोबाईल वापराचे तोटे/ दुष्परिणाम (mobile che tote/ dushparinam)

  • मोबाईल फोन मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानीकारक असतात, म्हणून कामापेक्षा जास्त वेळ मोबाईल धरून बसू नये.
  • मोबाईल इंटरनेट चे भाव भरपूर आहेत या मुळे प्रती माह जास्तीचे पैसे खर्च होतात. 
  • आजकालच्या तरुणांना अति मोबाईल वापराची सवय लागली आहे, सोशल मीडियाच्या अधिक वापर केल्याने ते वाईट रस्त्याला लागू शकतात.
  • लहान मुले मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ वाया घालवतात. यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.
  • अति मोबाईल वापराने बुद्धी कमजोर आणि एकाग्रता कमी होते.
  • मोबाईल हॅकिंग मुळे गोपनीय माहिती चोरी जाण्याची शक्यता असते.
  • वाईट बुद्धीचे लोक मोबाईल कॅमेराचा चुकीचा उपयोग करू शकतात. 
  • मोबाईल तुटला तर त्यातील सर्व माहिती नष्ट होण्याचा धोका असतो.
  • मोबाईल मध्ये हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने कानाच्या समस्या होऊ शकतात.
  •  नवनवीन मोबाईल मॉडेल खरेदी करण्याचा क्रेझ वाढत आहे, ज्यामुळे आर्थिक खर्च वाढतो.
  • वाहन चालवताना मोबाईल वापरल्याने किंवा मोबाईलवर बातचीत केल्याने अपघात होण्याची शक्यता असते.
  • चार्जिंगला मोबाईल लावून गप्पागोष्टी केल्याने मोबाईल फुटण्याची शक्यता असते.
  • मोबाईलच्या अतिवापराने कुटुंबातील लोकांचा एकमेकांमधील संवाद संपलेला आहे, प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो.


विडियो पहा :



तर मित्रहो हे होते मोबाईल चे फायदे व तोटे. आशा करतो की Mobile Che Fayde Tote हा लेख आपणास उपयुक्त ठरला असेल. ह्या माहितीला इतरांसोबत ही शेअर करा. धन्यवाद..



Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने