[जीवन परिचय] नरेंद्र मोदी मराठी माहिती | Narendra Modi information in Marathi

Narendra Modi information in Marathi

नरेंद्र मोदी हे असे व्यक्तिमत्व आहे जे देश असो वा विदेश सर्वकडे प्रसिद्ध आहेत. नरेंद्र सध्या भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. सन 2014 मध्ये त्यांना पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले होते. आज आपण नरेंद्र मोदी मराठी माहिती Narendra Modi information in Marathi मिळवनार आहोत. 


narendra modi marathi information

प्रारंभीक जीवन 

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 डिसेंबर 1950 ला गुजरातमधील वडनगर या गावी एका ओबीसी हिंदू कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव हिराबेन तर वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद मोदी असे होते. नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिति फार चांगली नव्हती. त्यांचे वडील रस्ता व्यापारी होते. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. Narendra Modi यांच्या आई एक गृहिणी होत्या. कुटुंबाला मदत म्हणून नरेंद्र मोदी यांनी लहान असताना रेल्वे स्टेशन वर चहा विकली. मोदी यांनी आपल्या लहान वयातच अनेक समस्याचा सामना केला. परंतु त्यांनी आपल्या जिद्दीने सर्व बाधाना संधि मध्ये बदलून दिले. 


शिक्षण व करियर 

नरेंद्र मोदी यांनी 1967 पर्यन्त आपले शिक्षण वडनगर मधील स्थानीय विद्यालयातून पूर्ण केले. कुटुंबाची आर्थिक स्थिति चांगली नसल्याने त्यांनी शिक्षण सोडून दिले व ते भारत भ्रमण करायला निघून गेले. हिमालय व भारतातील इतर ठिकाणी भ्रमण करून त्यांनी अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या.

या नंतर सन 1978 मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी दिल्ली यूनिवर्सिटी व त्यानंतर अहमदाबाद यूनिवर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी राजनीति विज्ञानात पदवी मिळवली. 

नरेंद्र मोदी यांच्या शिक्षकानी दिलेल्या एक इंटरव्ह्यु मध्ये म्हटले की नरेंद्र मोदी अभ्यासात सामान्य विद्यार्थी होते पण ते आपला अत्यधिक वेळ वाचनालयात पुस्तके वाचत घालवत असत. 


नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या राजनैतिक करियर ची सुरुवात कॉलेज मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरू झाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभाग घेऊन राष्ट्रीय स्वयम सेवक संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केले. 

सन 1975-77 दरम्यान लावण्यात आलेल्या आपत्काळ मध्ये आरएसएस वर बंदी लावण्यात आली या मुळे त्यांना बराच काळ लपून राहावे लागले.  

आपत्काळ च्या विरोधात नरेंद्र मोदी सक्रिय पणे उभे होते. त्या काळात सरकारचा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. 

सन 1985 मध्ये नरेंद्र मोदी हे आरएसएस द्वारे भारतीय जनता पार्टी मध्ये सामील झाले. Narendra Modi एक कुशल नेता होते. बीजेपी मध्ये त्यांच्या प्रवेशामुळे पार्टी ने जोरदार वाढ मिळवली. 

1987 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहमदाबाद नगर पालिकेची निवडणूक लढवली. व यात विजय पण मिळवली. 

पार्टीच्या अनेक कार्यामध्ये मदत केल्याने त्यांचे नाव खूप वाढत गेले. सन 1995 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने 121 सीट मिळवले. ज्यामुळे गुजरात मध्ये पहिल्यांदा भाजपा ची सरकार बनली. परंतु भाजपा सरकार काही काळच सत्तेत राहिली व सप्टेंबेर 1996 मध्ये त्यांची सरकार समाप्त झाली. 


नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 2001 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली व राजकोट मध्ये 2 मधून एक जागा जिंकली ज्यामुळे ते गुजरात चे मुख्यमंत्री बनून गेले. 7 ऑक्टोबर 2001 मध्ये त्यांनी पहिल्यांदा गुजरात चे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली व या नंतर एकानंतर एक असे 3 वेळ ते गुजरात चे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले.


नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान 

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी निवडणुक लढवली. या निवडणुकीत त्यांनी देशात जवळपास 437 रॅली केल्या, या रॅली मध्ये Narendra Modi यांनी देशाच्या जनतेसमोर खूप साऱ्या मुद्याना ठेवले. जनतेने पण नरेंद्र मोदी च्या व्यक्तिमत्वर प्रभावित होऊन त्यांना आपला प्रधान मंत्री निवडून देणीसाठी भरपूर मत दिले. व 2014 च्या निवडणुकीत भाजपा प्रचंड बहुमतांनी विजय झाली. व नरेंद्र मोदी भारताचे प्रधान मंत्रीच्या रूपात एक नवीन चेहरा बनून गेले. 


प्रधान मंत्री च्या रूपात नरेंद्र मोदी यांनी भारतात खूप विकास कार्य केलीत. त्यांनी अनेक विदेश दौरे करून जगातील इतर देशाना भारताच्या बाजूने वळवले. भारतात अनेक विदेशी कंपन्याचे निवेश होऊ लागले. भारतात एक पद्धतीने डिजिटल क्रांति घडून आली. अनेक क्षेत्रात भारताने प्रगती केली. 


नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेली जवळपास सर्वच आश्वासणे पूर्ण केली. यामुळेच 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनतेने पुनः एकदा त्यांना मागील निवडणुकी पेक्षा जास्त मतांनी आपले पंतप्रधान म्हणून निवडून दिले. देशात एक तऱ्हेने मोदी लहर आणि मोदी क्रांतीच येऊन गेली. 


Narendra Modi FAQ in Marathi

नरेंद्र मोदींचे पूर्ण नाव काय आहे?

नरेंद्र दामोदरदास मोदी


नरेंद्र मोदींची जन्म तारीख काय आहे?

17 सप्टेंबर 1950 


नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला?

वडनगर मुंबई (वर्तमानात गुजरात)


नरेंद्र मोदींचे जात कोणती आहे?

मोध- घांची- तेली (ओबीसी)


नरेंद्र मोदींच्या आई व वडिलांचे नाव?

आईचे नाव- माता हिराबेन, वडील- स्वर्गवासी श्री दामोदरदास मुलचंद मोदी.


नरेंद्र मोदींच्या भावाचे नाव?

सोम मोदी

प्रहलाद मोदी

अमृत मोदी

पंकज मोदी

वसंतीबेन हस्मुखलाल मोदी


नरेंद्र मोदी यांच्या पत्नी / बायको?

जशोदाबेन


नरेंद्र मोदींचे लग्न केव्हा झाले?

1968


नरेंद्र मोदी पहिल्यांदा गुजरात चे मुख्यमंत्री केव्हा बनले?

2001


नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान केव्हा बनले?

2014


नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान केव्हा बनले?

2019

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने