देवेंद्र फडणवीस यांची माहिती | Devendra Fadnavis Information in Marathi

देवेंद्र गंगाधर फडणवीस हे भारतीय जनता पक्षातील महाराष्ट्र राज्याचे एक प्रमुख नेते व राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांची माहिती या लेखात आपण देवेंद्र फडणवीस यांचा जन्म, जीवन, शिक्षण, विधिमंडळातील कार्य, भुषवलेली पदे, पुरस्कार, पुस्तके याबाबतची माहिती (Devendra Fadnavis Information in Marathi) जाणून घेणार आहोत.


Devendra Fadnavis Marathi

देवेंद्र फडणवीस यांची माहिती | Devendra Fadnavis Information in Marathi

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म

देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपुर येथील एका मराठी हिंदू ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर फडणवीस व आईचे नाव सरिता फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस हे कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. 


देवेंद्र फडणवीस यांचे शिक्षण

देवेंद्र फडणवीस यांचे प्रारंभिक शिक्षण इंदिरा गांधी यांच्या नावाने असलेल्या इंदिरा काॅन्व्हेंट या शाळेमध्ये झाले. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना अटक करण्यात आली. त्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षी मी इंदिरा काॅन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असे त्यांनी त्यांच्या आईला बजावून सांगितले. यानंतर त्यांचा प्रवेश सरस्वती विद्यालयात करण्यात आला. 

सरस्वती विद्यालयातील त्यांचे शिक्षण 1986 साली पुर्ण झाले. यानंतर त्यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. नंतर नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. 1992 साली त्यांना कायद्याची पदवी मिळाली. यानंतर जर्मन येथून मेथड्स ॲंड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा देखील केला. यासोबत त्यांनी 1998 साली बर्लिन येथील डहलम स्कुल मधून बिझनेस मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला.


देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंब

देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांचे नाव गंगाधर फडणवीस व आईचे नाव सरिता फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी चे नाव अमृता फडणवीस आहे. याशिवाय अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव दिविजा फडणवीस असे आहे. 


देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय जीवन

देवेंद्र फडणवीस सतरा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर ते त्यांच्या वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आले. वयाच्या फक्त २२ व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकले आणि नगरसेवक झाले. पाच वर्ष चांगल्या रितीने काम केल्यानंतर ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. साल १९९७ ते २००१ पर्यंत ते नागपुर चे महापौर होते. यानंतर ते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देखील दोन वेळा निवडून आले. 

देवेंद्र फडणवीस पुढे जाऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर ते पुढे ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 

५ वर्षाचा मुख्यमंत्री कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली. शिवसेना व भारतीय जनता पक्षाला बहुमताने विजय मिळाली. परंतु दोन्ही पक्षांच्या आपापसातील तणावामुळे शासन बनण्याअगोदरच दोन्ही पक्ष वेगळे झाले. यानंतर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षासोबत युती करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, 

विचारधारेत तफावत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आपसी मतभेद निर्माण होऊ लागले. जून 2022 मध्ये, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करत शिवसेनेच्या आमदारांच्या एका गटाचे नैतृत्व केले. व शिवसेनेने महाविकास आघाडीतून माघार घेऊन पुन्हा एकदा भाजपसोबत युती करावी अशी मागणी केली. 

एकनाथ शिंदे यांच्या नैतृत्वाखालची तयार झालेला शिंदे गट महाविकास आघाडीतून वेगळा झाल्याने उद्धव ठाकरे सरकारने विधानसभेतील बहुमत गमावल्याचे स्पष्ट झाले. वाढत्या राजकीय दबावाचा सामना करीत उद्धव ठाकरे यांनी 29 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपा सोबत युती केली व 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेली. भाजपा चे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री या पदाची शपथ घेली.


देवेंद्र फडणवीस यांनी भुषवलेली पदे

  • १९८९ साली देवेंद्र फडणवीस हे नागपूर मधील जनता युवा मोर्चाचे वाॅर्ड अध्यक्ष होते. 
  • १९९९ पासून आजपर्यंत ते विधानसभा सदस्य आहेत. 
  • १९९२ पासून ते २००१ पर्यंत सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य आणि दोन वेळा नागपूर चे महापौर म्हणून निवडून आले. 
  • १९९४ मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. 
  • तसेच २००१ मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. 
  • २०१० मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस होते.‌ 
  • २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष होते. 
  • देवेंद्र फडणवीस हे २०१४ पासून २०१९ पर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. 
  • तसेच २०१९ ते जून २०२२ पर्यंत ते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. 
  • जून २०२२ पासून ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.


देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले पुरस्कार

देवेंद्र फडणवीस यांना आजपर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांना काॅमनवेल्थ पार्लेमेंटियन असोसिएशन तर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटू साठीचा वार्षिक पुरस्कार मिळाला. तसेच पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. नाशिक येथील पूर्णवाद परिवारातर्फे राजयोगी नेता पुरस्कार मिळाला. देवेंद्र फडणवीस यांना रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय अंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत त्यांना सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार मिळाला. नागपूरच्या नागभूषण फाउंडेशन तर्फे नागभूषण पुरस्कार मिळाला. 


देवेंद्र फडणवीस यांचे आंतरराष्ट्रीय कार्य 

  • देवेंद्र फडणवीस यांनी 1999 साली होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग घेतला होता आणि सादरीकरण केले होते. 
  • अमेरिकेतील वाॅशिंग्टन आणि नॅशविले येथे यू.एस. नॅशनल काॅन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स येथे सहभागी. 
  • देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे 2006 मध्ये आयडीआयसी, युनेस्को,  डब्ल्यूसीडीआर यांच्या द्वारे आयोजित केले गेलेल्या 'डिसास्टर मिटिगेशन ॲंड मॅनेजमेंट इन इंडिया' या विषयावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण केले. 
  • चीन मध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ - ईएसएसपी यांच्या द्वारे आयोजित केलेल्या ग्लोबल एन्व्हायरमेंटल चेंज काॅंग्रेसमध्ये  ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन – इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयावर सादरीकरण केले होते. 
  •  देवेंद्र फडणवीस यांनी डेन्मार्कमधील कोपेनहेगेन येथे युरोप व आशिया मधील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे नेतृत्व केले होते. 
  • 2008 साली अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित केले गेलेल्या न्यू जनरेशन सेमिनारमध्ये  'एनर्जी सिक्युरिटी इश्युज' या विषयावर शोधनिबंध सादर केला. 
  • ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्युजिलॅंड मध्ये 2008 मध्ये गेलेल्या काॅमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन च्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे ते सदस्य होते.
  • माॅस्को येथे 2010 मध्ये भेट देणार्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्स च्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. 
  • 2011 मध्ये त्यांनी क्रोएशिया येथे 'ग्लोबल पार्लमेंटियन फोरम ऑन हॅबिटाट' मध्ये सहभाग घेतला. 
  • 2012 साली देवेंद्र फडणवीस यांनी मलेशिया मध्ये 'जीपीएच एशिया रिजनल मीट' मध्ये सहभाग घेतला. 
  • 2012 मध्ये केनियातील नैरोबी येथे 'युनायटेड नेशन्स हॅबिटाट' ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते. 


देवेंद्र फडणवीस यांची पुस्तके

लेखिका सुषमा नवलखे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांचे जीवन, त्यांनी जीवनात कसे यश मिळवले, नागपूरचे महापौर कसे झाले याबाबत माहिती दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी देखील चार मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्यातील एक पुस्तक 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे आहे. 'आत्मनिर्भर महाराष्ट्र - आत्मनिर्भर भारत' हे एक ३६ पानी पुस्तक आहे. हे पुस्तक ५ जुलै २०२० ला प्रकाशित झाले


मित्रहो वरील लेखात आम्ही आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध व जनतेच्या आवडीचे राजकीय नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांची माहिती (Devendra Fadnavis Information in Marathi) दिलेली आहे. अशा करतो कि आपणास हि माहिती उपयोगाची ठरली असेल. हा लेख इतरांसोबत शेअर करून त्यांनाही हि माहिती पाठवा. धन्यवाद


इतर लेख

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने