गुरुपौर्णिमा मराठी भाषणे । Guru purnima Speech in Marathi

गुरूपौर्णिमा भाषण मराठी - Guru Purnima speech in marathi : मित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु. दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी 2023 साली गुरुपौर्णिमा ही  3 जुलै ला साजरी केली जाणार आहे. 

आजच्या या लेखात आम्ही आपल्याकरीता गुरुपौर्णिमा चे मराठी भाषणे - Guru purnima speech in Marathi हे भाषण आपण आपल्या शाळा कॉलेज मध्ये वापरू शकता.


Guru purnima marathi speech 

1} गुरुपौर्णिमा मराठी भाषण - Guru Purnima Speech in Marathi

गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे 

 मोल आयुष्याचे जाणून घ्यावे

 गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे 

चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे

गुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनातील गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरूच कारणीभूत ठरतो. 

भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गुरूंची महती काहीतरी आशा पद्धतीने गायली गेली आहे. 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.

अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. 


ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घे तू' असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरु सजीव मानव रुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान कण वेचले पाहिजे. कारण शेवटी गुरुविण कोण दाखविल वाट....?


आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे आपणास पहावयास मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आई आपली पहिली गुरु असते. निसर्गातील प्रत्येक कण आपला गुरु असतो, कारण निसर्गा कडून खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सदैव शिकायला मिळतात. जसे पाणी, झाडे, वेली, पाने, फुले, पशू, पक्षी, समुद्र, नदी, त्याचबरोबर पुस्तके या शिवाय आपले नातलग, मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरूच असतात. जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी नेहमी चांगले संस्कार देतात, ते आपले गुरूच आहेत. गुरु ला वयाचे, जातीचे बंधन नसते. आताचा काळ बदललेला आहे. शिक्षण पद्धती बदललेली आहे. गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. आजपर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमित प्रभाव होता. आपल्या गुरूंचा ही आपल्यावर खूप प्रभाव असतो. 


गुरु प्रमाणे शिष्य घडत असतो. म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून गुरूचा, देशाचा, शाळेचा व आई-वडिलांच्या नावलौकिक करायला हवा.

 काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी

 देव्हाऱ्यात वात तैवत राहावी

 माझ्या सार्‍या गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी... 

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

धन्यवाद.

***

Guru Purnima speech in marathi

गुरुपौर्णिमा मराठी कविता   

छडी 

नजरेपुढे कठोर होते, नजरे आडून पाझरते.
सर, तुमची छडी अजून भविष्याला सावरते..!

पुस्तकांची हाक येते दप्तराच्या कंठातून
संस्काराच्या कंपासपेटीत आयुष्याला सामावून.
शिष्य म्हणून, युवक म्हणून, माणूस म्हणून घडवते
सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते..!

तेव्हा तुम्ही बाका वरती उभ केल नसतं जर
विचारांची पोहोच कधी गेली नसती ध्येयावर
अडथळ्यांच्या डोंगर एका क्षणामध्ये झुकवते,
सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते.!

आठवणीच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार,
शिस्तीच्या त्या गणिताला महत्त्वाचा गुणाकार
नजरे मध्ये सुरू घेऊन आभाळ व्हायला शिकवते,
सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते..!

-प्रतीक डुंबरे (Pratik Dumbre)


2} गुरुपूर्णिमेचे मराठी भाषण guru purnima speech in marathi

सर्व अतिथी मंडळी शिक्षक व विद्यार्थ्यांना माझा प्रणाम. माझे नाव मोहित पाटील आहे मी आपल्या शाळेतील इयत्ता 7 वी चा विद्यार्थी आहे. आज आपण गुरु पौर्णिमेच्या या शुभ उत्सवाला साजरे करण्यासाठी जमले आहोत. गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाते, इंग्रजी कॅलेंडर नुसार यावर्षी गुरु पौर्णिमा 13 जुलैला आलेली आहे.  


गुरुपौर्णिमेचे भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे. खरा मार्गदर्शक, एका गुरूशिवाय व्यक्तीचे जीवन पशुसमान आहे. मनुष्याला सभ्य आणि सामाजिक प्राणी म्हटले जाते. मनुष्याला सभ्य बनून समाजासोबत मिळून मिसळून राहण्याचे शिक्षण गुरु देतात.


गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय मनुष्य समजाचा भाग बनू शकत नाही. कोणत्याही बालकाच्या शिक्षणाची सुरुवात त्याच्या बालपणापासूनच होऊन जाते. असे म्हटले जाते की आई ही बालकाचा पहिला गुरु असते. आई ही बालकाला दूध पिणे, हात धरून चालणे, बोलणे इत्यादी शिकवते. आईच्या शिकवणीमुळे महान लोक जन्म घेतात. साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईचा महिमा गायला आहे. गुरुजींसाठी त्यांची आई गुरु आणि आई हीच कल्पतरू होती.


गुरुपौर्णिमा भारतासह नेपाळ व जगभरात जिथ जिथे भारतीय राहतात तेथे साजरी केली जाते. हा दिवस शिष्यांसाठी गुरु बद्दल आभार व धन्यवाद प्रकट करण्याचा दिवस असतो. आषाढ पौर्णिमेचा हा दिवस महाभारताचे रचयीता महर्षी व्यास यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. प्राचीन काळात आपल्या देशात शिक्षेसाठी गुरुकुल शिक्षणपद्धती होती. या पद्धतीत आई वडील आपल्या मुलाला लहान वयापासूनच गुरूच्या आश्रमात शिक्षणासाठी सोडून देत असत. शिक्षक विद्यार्थ्यांला शिक्षण देत असत व शिक्षण पूर्ण झाल्यावरच घरी पाठवत असत. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रत्येक वसाहतीत एक नवीन विद्यालय बनलेले आहे.


वेळेच्या या बदलत्या चक्रात विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाविषयी सन्मान ठेवणे आवश्यक आहे. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवेत व विद्यार्थ्याला आपल्या पुत्रा प्रमाणे वागणूक द्यायला हवी. आजच्या या आधुनिक युगात शिक्षक व विद्यार्थ्यांत स्नेह आणि आदराची भावना कायम ठेवणे आवश्यक आहे. धन्यवाद

गुरुशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्वकाही गुरूंचीच देन आहे
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

***


तर मित्रहो या लेखाद्वारे मी आपल्यासोबत गुरूपौर्णिमा भाषण मराठी (Guru Purnima speech in marathi) शेअर केले आहेत. आशा करतो हे गुरुपौर्णिमेचे मराठी भाषण आपणास उपयोगी ठरले असेल. या भाषणातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या स्वतः चे भाषण देखील तयार करू शकतात.


Read More

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने