पुस्तकाचे आत्मवृत्त/मनोगत निबंध मराठी | Pustakachi Atmakatha in Marathi
Pustakachi Atmakatha |
1) पुस्तकाची आत्मकथा निबंध | Pustakachi Atmakatha in Marathi (300 शब्द)
एके दिवशी मी माझे कपाट स्वच्छ करीत होतो. माझ्या आजूबाजूला अनेक पुस्तके पडली होती. त्यातच मला एक जुने पुस्तक मिळाले ज्यात महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला होता. त्या पुस्तकाची स्थिती खराब होती. मी त्याला स्वच्छ करून वाचतच होतो इतक्यात पुस्तक बोलू लागले. मी थोडा घाबरलो हे कसे शक्य आहे. पण त्याने मला धीर देत म्हटले, "घाबरू नकोस, मला तुझ्याशी फार दिवसांपासून बोलण्याची इच्छा होती मी तुला माझी आत्मकथा सांगू इच्छितो."
पुस्तक मला सांगू लागले माझा जन्म एका कारखान्यात झाला होता माझ्या पानावर महान भारतीयाचा इतिहास लिहिलेला आहे. मला या गोष्टीचा फार अभिमान आणि आनंद देखील होता. या नंतर मला एका वाचनालयात पाठवण्यात आले वाचनालय मध्ये असताना मला वाटायला लागले कि माझ्या पानांवर छापलेला इतिहास वाचण्यासाठी लोक पळत येतील, परंतु असे काहीही झाले नाही. लोकांना माझ्यात असलेल्या इतिहासात सारस्य नव्हते. मग काय मी वर्षानुवर्षे धूळ खात पडून राहिलो. मी वाट पाहत होतो कि कोणीतरी येऊन मला नेईल.
शेवटी मला वाटायला लागले कि माझे आयुष्य याच वाचनालयात धूळ खात संपून जाईल. तेव्हाच मला शोधत तू आला, मला खूप आनंद झाला. तू मला घरी घेऊन आला व माझ्या पानांवर छापलेला इतिहास मोठ्या आनंदाने वाचू लागला. मी पुन्हा आनंदित झालो मला वाटायला लागले कि मला खूप चांगला मालक मिळालेला आहे.
माझ्या इच्छेनुसार काही दिवस तर तू मला अतिशय मन लावून वाचले. पण त्यानंतर तू मला एका टेबलावर ठेऊन विसरून गेलास. तेथे माझ्यावर पाणी पडले. मी ओला झालो, पण तुझे माझ्यावर लक्ष नव्हते. तुझ्या आईने स्वछता करीत असताना मला उचलून कपाटाच्या वर ठेऊन दिले. तेव्हा पासून तर आजपर्यंत मी तेथेच पडलेलो होतो.
मला खूप वाईट वाटत होते. तेथे पडून पडून माझे पाने मोकळे होऊ लागले. मला वाटले कि लवकरच माझा अंत होईल. पण आज तू येऊन मला वाचवले. पुस्तकाला एका गुरु प्रमाणे मानले जाते. ज्याप्रमाणे तू आपल्या गुरूचा सम्मान करतो त्याच प्रमाणे माझा तसेच इतर पुस्तकाचा पण सम्मान करत जा. जर तू मला वाचून संपवले असेल तर मला आपल्या मित्रांना भेट देऊन त्यांचेही ज्ञान वाढव.
पुस्तकाने माझ्याशी साधलेल्या या संवादानंतर मी देखील पुस्तकांची योग्य देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला.
2) पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध | pustakache manogat nibandh marathi
मी एक पुस्तक आहे, ज्या रूपात मी आज दिसत आहे आधीच्या काळात मी असा नव्हतो. गुरुद्वारे शिष्यानां मौखिक ज्ञान दिले जायचे व गुरु शिष्य परंपरेने ज्ञान एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात होते. त्या काळात कागदाचा शोध लागला नव्हता.
या पद्धतीत हळू हळू अवघडपणा येऊ लागला. ज्ञानाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला कुठे तरी लिहून ठेवणे आवश्यक होते. तेव्हा प्राचीन ऋषी मुनींनी भोजपत्रावर लिहिणे सुरू केले. भोजपत्र कागदाचे प्रथम रूप होते. भोजपत्र आजच्या काळातही पाहायला मिळतात. आपल्या देशातील अतिप्राचीन साहित्य भोजपत्रांवरच लिहिले आहे. आशा पद्धतीने प्राचीन काळातील माझे रूप होते.
माझे कागदी रूप निर्माण करण्यासाठी गवत, लाकडाचे तुकडे, जुने कपडे इत्यादी गोष्टींना मिक्स करून बनवले जाते. लेखक त्याने लिहिलेली माहिती घेऊन येतो व यानंतर ती माहिती माझ्यावर छापली जाते. या साठी छापखण्यातील मशीन वापरले जातात. छापखण्यात तयार झाल्यावर माझ्या सर्व पेजेसला डिंक आणि पिना मारून जोडले जाते व अश्या पद्धतीने मी तयार होतो.
या नंतर प्रकाशक मला त्याच्या कार्यालयात घेऊन जातो तेथे माझे प्रकाशन केले जाते. प्रकाशित केल्यानंतर मला विक्रेत्याच्या हाती विकले जाते. विक्रेते आपल्या दुकानात मला विकायला ठेवतात. या शिवाय वेगवेगळ्या वाचनालयात मला पाठवले जाते. वाचनालयात दिवसभरातून भरपूर लोक मला वाचायला येतात. सध्याच्या काळात माझी मागणी खूप आहे. मला मोठं मोठ्या पुस्तकालय मध्ये सांभाळून ठेवले जाते. मला विद्याची देवी सरस्वती चे स्थान दिले जाते. ज्यांचा छंद वाचनाची आवड असतो असे सर्वजण माझे घट्ट मित्र बनतात. मी सुद्धा त्यांना ज्ञान देऊन त्याचा अंधकार दूर करतो.
जर कोणी माझी निगा न राखता मला फाडले तर मला ते आवडत नाही. बरेच लोक मला रद्दी मध्ये टाकून देतात. भाजीपाला तसेच किराणा दुकानदार मला फाडून टाकतात. माझी इच्छा आहे की मला सम्मानाने ठेवायला हवे जर तुम्ही मला वाचून संपवले असेल तर दुसरे कोणाला देऊन टाका पण माझा वापर आदराने करा. कितीतरी लोक परिश्रम करून मला तुमच्या पर्यंत पोचवतात.
या शिवाय आजकाल अनेक लोक वाचनासाठी मोबाइल चा उपयोग करतात. मोबाइल चे फायदे आणि तोटे मध्ये आहेत तासन्तास मोबाइल मध्ये वाचन केल्याने डोळ्यांना त्रास निर्माण होतो. शेवटी मला अशा आहे की तुम्ही माझ्या डिजिटल रुपाचे वाचन न करता माझ्या भौतिक रुपाचाच उपयोग करणार व मला नेहमी सन्मानाने ठेवणार. धन्यवाद
उत्कृष्ट मराठी कादंबरी ची यादी पहा येथे
विडियो पहा
तर मित्रहो हा होता Pustakachi Atmakatha marathi nibandh आशा आहे की हा निबंध तुम्हाला आवडला असेल. ह्या निबंधाला आपल्या मित्रांसोबत शेअर करून आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद
Khop chan lehetosa दादा
उत्तर द्याहटवा